- Get link
- X
- Other Apps
Posts
- Get link
- X
- Other Apps
🌸अनुवाद... सुप्रसिद्ध लेखिका- श्रीमती चित्रा मुद्गल लिखित *पोस्ट बाँक्स नं.203 नालासोपारा* *या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त* हिंदी कादंबरीचा अनुवाद ,त्याच नावाने - - - - *डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे व श्रीमती माधवी जोग* या द्वयींनी केला आहे.🌸 प्रकाशन सोहळा 25/02/2019ला वर्धा येथे म. गांधी अंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयात दिमाखात संपन्न झाला. अनुवाद करणे.. म्हणजे. एका कुपीतून अत्तरअलगद दुसऱ्या कुपीत भरणे होय! आशयाला धक्का न लावता..अर्थ पूर्ण निर्मिती. आणि हे कठीण काम जिद्दीने चिकाटीने हया दोघींनी पूर्ण केले आहे. मुख्य म्हणजे *मराठी भाषा दिनाच्या आसपास मराठी रसिक वाचकांना ही मेजवानी मिळणार आहे. या शुभ दिनी मराठी पुस्तक खरेदी साठी अमाप गर्दी लोटणार...आणि नव्या कोऱ्या अनुवादित कादंबरीवर उड्या पडणार... हे सर्व लक्षात घेऊन.. सोबत प्रकाशकांचे पत्रकच देते आहे..तरी..www.vijayprakashan.com या इ मेल वर संपर्क साधून, केवळ 200₹ मधे पुस्तक मिळवावे. त्यात विषय.. किंमत.. इ-मेल , आणि शिवाय फोन नंबर पण दिला आहे.. आपण प्रत्यक्ष फोनसंवाद.साधून/ इमेल वरून.. पुस्तक खरेदी करू शकता. आपली प्र...
- Get link
- X
- Other Apps
🌸 विहिण ..(वरमाईने.. ही विहीण म्हणून वधुपक्षाला दिलासा देणे..) विहीण..💐 भरल्या सागरा,ओढ सरितेची ग.. तश्शीच .. पुष्करला जोड श्रृतीची ग। विहीणबाईं .. तू कष्टी होऊ नको ग.. तुझी श्रृती च बनली माझी लेक ग। हिरव्या साडीला रेशमी किनार ग... श्रृती झाली ग जोगांची सून .ग। तिच्या वेणीत सुवर्ण फूल ग... तिला पडलीये.. *पुष्कर* ची.. भूलं ग। तिच्या भाळी... चंद्राची कोर ग.. तिच्या कानात.. निलरत्नी मोर..ग। तिच्या नाकात हिऱ्याची नथनी ग.. माझी सून.. एक लाखांत देखणी ग। तिच्या पायात रूणझुण पैंजण ग.. गौर कंठात *पुष्कर* गूंफण..ग। तिच्या दिमतीला गाडी सजली ग.. तिला कलबुर्गीला... अलगद नेणार ग। विहीणबाईं.. तू नको ढाळू आंसू ग.. तिचे . जपणार.. मी सतत .. हांसू ग। धन्यवाद🌷 उन्नती गाडगीळ🌹🙏
https://share.google/aimode/oY1GKR08XRoFm3fU0 जादूगार. ... बालक अवघा तीन वर्षांचा हा बालक सहज हाताळतो संगणक! मोबाईल मध्ये अनेक अॅप्स एका क्लिकवर आणतो मॅप्स! सहज टकटक बटणे दाबतो पूर्ण जगाला फेरफटका मारतो! क्षणात दाखवतो प्रदेश बर्फाळ तर क्षणात दाखवतो गावातील दुष्काळ!!! गाणी.. गोष्टी खेळ भारी संगणकाची जादूच न्यारी! बाल जादुगार म्हणून भाव खातो!!! सर्वांना सुख संदेश देतो! आजीआजोबांशी करतो दोस्ती माऊसशी करतो खूप खूप मस्ती! शिकतो संगणकीय गुप्तभाषा ... कवेत घेऊन फिरतो दशदीशा! आज्ञावलीला करतो सलाम... माहितीचे जाळे पसरतो गुलाम! भूक लागली कि मात्र आईचं लागते... डब्यातील हळूच लाडू देते! पुन्हा संगणकासह बसते स्वारी बाल जीवनाची रंगत न्यारी! धन्यवाद🌹 उन्नती गाडगीळ 🙏🏻
- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
💐 सागरगोटे.. सईची भुणभुण चालली होती..। "'काय ग आई.. बाहेर जायचे नाही. मैत्रिणीला बोलावयाचे नाही.. मग करायचे तरी काय?'" तिच्या आजीने गोल गोटे शोधून आणले.आणि तिच्या सह सागरगोटे..खेळण्यात रमून गेली.. बघून माझे मन पण बालपणात गेले. आम्ही खूप खूप खेळायचो... सागरगोटे, बिट्या,काचापाणी, इ.बैठे खेळ.. आता कुणी खेळते का? सागरगोटे मिळतात तरी का? बिट्या? एकेक खेळ तासनतास चालायचा.. खूप मजा यायची. सागरगोटे खेळताना.. डोळ्यांना छान व्यायाम होत असे.. वर उडवलेल्या खड्याकडे बघत,खालचा खडा हळूच ,दुसऱ्या खड्यांना धक्का न लावता उचलून ,वरचा खडा झेलायचा.. सर्व काही शिताफीने एकाच वेळी करायचे.. खूप मजा यायची.. आता परत..जुने खेळ नव्याने आले. नाही मोजावे लागत जास्त दाम.. नाही गाळावा लागत खूप घाम। नाही घालावे लागत गळ्यात गळे.. तरीही फुलतात.. आनंदाचे मळे। उन्नती गाडगीळ धन्यवाद💐
बडबडगीते..💐
- Get link
- X
- Other Apps
🌷सविताच्या नातीच्या बारश्याला.. एक अंगाई गीत मी दिले होतेच.. ते सर्वांना आवडले.ती म्हणाली.. "'नेहमीची बडबडगीते नकोत. .. उन्नती.. खास,खास तू लिहिलेली बडबडगीते दे.विशेषतः.. मालीश करताना, आंघोळ घालताना.. तिच्याआग्रहाखातर.. मी लिहिलेली बडबड गीते.... 1) मालीश करताना.. सूर्या..सूर्या.. तेज दे.. वाऱ्या.. वाऱ्या.. वेग दे.. गणराया.. बुद्धी दे..वृद्धी दे... माझ्या बाळाला मोप आयुष्य दे.. .. उन्नती गाडगीळ💐 2) सूर्य उंच गगनात.. रश्मी नाचे अंगणात। बाळा.. देती.. ऊन पाणी.. सु--मने गाती... गोड गाणी। उन्नती गाडगीळ🌹 3)जय गंगे... जय गोदाई.. जय यमुने..जय कृष्णाई.। नमन करते तुला.. सुखी ठेवी मम बाळा। उन्नती गाडगीळ🌹 4) एक सुंदर परी.. . आली माझे घरी.. परांचं पांघरूण बाळावरी.. हळूच घेते..पापा.. अन्.. म्हणते.. '"आता झोपा।" उन्नती गाडगीळ🌹 5)झू..झू.. झोपाळा.. झुलवी.. बाळ गोपाळा.. घेऊनी.. खांद्यावरी.. घेई.. उंच.. भरारी। उन्नती गाडगीळ🌹 6) जाहल्या ग तिन्ही सांजा.. देवापुढे ल...