Posts

Showing posts from June, 2018

रे..पावसा....💐

तन माझे  लाजरे ... मन माझे  बुजरे ... धिटाई देऊन जा ...रे पावसा .. धिटाई देऊन ... जा ....। वय माझे कोवळे ... डोळे माझे  भोळे ... भले.. बुरे... शिकवुन जा ... रे..पावसा.. भले बुरे शिकवुन जा... । अंतरंग ...सारे ... षड् रिपुने .. भरे ... सारे दोष पुसून जा .. रे .. पावसा ... सारे दोष पुसून जा ... । तन बने यंत्र ... मन बने तंत्र ... कष्ट शिकवुनी.. जा.. रे.. पावसा ... कष्ट शिकवुन... जा....।। उन्नती गाडगीळ 🙏

प्लास्टिक..💐

🎽प्लास्टिक.. प्लॅस्टिक होते नवे..नवे.. सर्वांना वाटे.. हवेच ..हवे। बाटलीतून दुध बाहेर पडले.. प्लास्टिक पिशवीत जाऊन बसले । तेल डब्यातून टप..टप..गळले.. मोहक आवरणात लपून बसले। Fast Food चा आला जमाना.. प्लास्टिक ने भरला खजाना। जाहिरातींनी केला सुळसुळाट.. प्लास्टिक ने घातला..थयथयाट। आकर्षक रंगांची केली भुलावण.. विषारी वायूंची झाली पखरण। प्रदूषणाची विखारी पसरण.. रोगराईची त्यात लागवण। प्लास्टिक ने केला प्राण्यांचा घात.. मनुष्य प्राण्यावर केली मात। अश्या या प्लास्टिकला सारे हटवा.. स्वच्छ.. सुंदर.. भारत.. बनवा। उन्नती गाडगीळ🌹🙏

आगीन गाडी..💐

आगीन गाडी... गर्द हरित झाडी.. रेशमाच्या लडी.. तेजाने मारली दडी.. काळोखाची उभी गुडी... धाड्.. धाड्.. चालली.. आगीन गाडी!!! धरेशी..गूजत.. धारांशी.. झगडत.. वाऱ्याशी.. झोंबत.. लचकत.. मुरडत.. धाड..धाड.. चालली.. आगीन गाडी!!! गोबरे गाल फुगवत.. गोल डोळे वटारत... इवले नाक उडवत.. फुरफुरत.. शिट्टी मारत.. धाड..धाड.. चालली.. आगीन गाडी !!! थांब्यावर थांबत.. नावा (लोक)सोडत..घेत.. जिद्दीने.. मार्ग आक्रमीत.. मस्तीत.. मजेत.. धाड्..धाड्.. चालली.. आगीन गाडी!!! वडा-पाव चाखत.. चहाचा भुरका मारत.. आनंद उधळत.. धुराळा उडवत.. धाड.. धाड.. चालली आगीन गाडी !!! उन्नती गाडगीळ💐

कै.आजोबा.. पुण्यतिथी💐

♥कै.आजोजबा...पुण्यतिथी..🌹 आजोबांमुळे.. भगवद्गीता व ज्ञानेश्वरी ची ओळख व आवड निर्माण झाली. आजोबांच्या स्पष्ट उच्चाराने..माझ्या रसनेला वळण लागले. आजोबांच्या अंधूक दृष्टीमुळे..त्यांना वृत्त पत्रे,प्रसाद मासिक, कामकाज पत्रे, वगैरे वाचून दाखवताना.. मला वृत्त पत्रवगैरे वाचन .व लेखन..व्यासंग जडला.पत्र लेखन मर्म जाणले. आजोबांची उत्साही व कार्यक्षम वृत्ती ने..आमच्यातील आळसाला तिलांजली मिळाली. आजोबांच्या बोलघेवड्या व साग्रसंगीत कथन करण्याच्या गुणांमुळे.. जोग कुलाचा.. पुण्याचा.. महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचा संपूर्ण इतिहास, भूगोल ,व समाज मन.. ज्ञात झाले... व.. समाजसेवेचे बीज मम मनी रूजले. आजोबांच्या शिस्तबद्धतेमुळे..नियमिततेचे संस्कार झाले. जेथे जाऊ तेथे.. नवनवीन  निर्मिती करायची.. ह्या त्यांच्यातील प्रेरणेने.. मी जोमाने.. त्यांच्या आशीर्वादाने, शुभेच्छेने.. माझ्या वयाच्या अवघ्या.. 23व्या वर्षी.. परप्रांतात... सतत 3वर्षे धडपडत.. शाळा सुरू केली.. अर्थात तीन सहकारी पण होतेच, माझ्या बरोबर.. लढायला! पण..स्फूर्ती दाता..व नंतर भर भरून कौतुक कर्ता.. होते.. आजोबा !!! रोज सकाळी ...

लक्ष..लक्ष..बालके💐

लक्ष लक्ष बालके या जगती ... दृष्टि विना .. चाचपडती । केवळ काळोख हाच सोबती ... ना .. ओळखती .. जन्म दाती । फूल नाहीं गंधा विना , मूल नाहीं आईविना ... तद् वत् जन्म नाहीं .. मरणाविना । का बरे दहन करावे .. दोन नयनांचे ? त्या आधीच स्मरण करावे .. दृष्टि हीनांचे ! करता .. नेत्रदानाचा विचार ... होईल एक स्वप्न ... साकार ! गुंफुया नेत्रदात्यांची साखळी ... खुलवुया नेत्रहीनांची पाकळी। उन्नती गाडगीळ 🙏

पहिला नंबर...💐

♥पहिला नंबर.. मागील आठवड्यात, माझ्या एका कथेला पहिला क्रमांक मिळाला.. बक्षीस समारंभास या..असा एक फोन.. व.. एका ..पाककृती स प्रथम बक्षीस मिळाले.. तारीख कळवतो.. दुसरा फोन.. अन्  परवा.. ह्यांच्या एका स्नेह्यांना आम्ही भेटायला गेलो होतो.. त्यांच्या पत्नी चे निधन झाले म्हणून... ते स्नेही.. पत्नी च्या आठवणी काढत असता..सहजपणे म्हणाले.. " काय सांगू.. मी सर्व बाबतीत सतत पहिला क्रमांक.. बक्षिसे मिळवत होतो.. पण..51वर्षाची साथ एका.फटक्यात सोडून .. वर जाण्यात मात्र पहिला नंबर तिने पटकावला.. मला एकदम धस्स झाले! माझ्या डोळ्यांसमोर.. सगळी माझी पहिला नंबर मिळवलेली बक्षिसे( कथा, काव्य, नाटके,पाककृती, अंताक्षरी, खेळ ,उत्तम व्यवस्थापन वगैरे ) गरगर फिरायला लागली. मी कल्पनेनीच थरथरले.. घामाघूम झाले!!! कोटी कोटी देवांना.. .साधुसंतांना..म्हणाले.. " मी कधीच पहिला नंबर यावा..बक्षीस मिळावे.. अशी इच्छा ठेवून.. नवस..सायास करून.. धरणे धरुन.. लेखन केले नाही. किंवा पाककृती केली नाही.. सहज... करत गेले.. सहज.. बक्षिसे मिळत गेली..प्रथम क्रमांक मिळत गेला.. पण.. आज मात्र... मी.. प्रथमच....

अ.ल.क....एक साहित्य प्रकार..💐

#अ.ल.क. --- सजग मन.. 1) टळटळीत उन्हात... वाढत्या पेट्रोल भावांना ...भाव न देता..अथवा कामटाळूपणा न करता ,सरळ.. ट्रींग..ट्रींग.. घंटी वाजवत.. मजेत शीळ घालत..माधवने मजेत कार्य भाग तर साधलाच..अन् प्रदूषण रोखून बचत केली. 2) उन्हाळी सुटीत.. लताने झरझर शिलाई मशीन चालवून, भरभर सुबक शंभर बटवे व पिशव्या तयार करून, अधिक मासी दान केले . प्लँस्टिक हटाव मंत्र स्वतः जगला व इतरांना दिला. 3)बिट्टूला मँगी खूपच आवडते,पण त्यात पोषणमूल्य अभाव.. हे जाणून.. सुमेधाने मेहनतीने, युक्तिने,..साबुदाणा, रवा,गहू,पोहे इ.धान्याच्या कुर्डया बनवून.. कडकडीत उन्हात खडखडीत वाळवून त्यांची मँगी बनवून त्याला दिली. निग्रहपूर्वक आग्रहाने पोषक व घरगुती आहाराची आवड निर्माण केली. 🌱*अ.ल.क* म्हणजे.. अतीव लघु कथा.. एक ते तीन वाक्यात ..आशयपूर्ण..संदेश देणे. उन्नती गाडगीळ 🌹🙏