कै.आजोबा.. पुण्यतिथी💐

♥कै.आजोजबा...पुण्यतिथी..🌹

आजोबांमुळे.. भगवद्गीता व ज्ञानेश्वरी ची ओळख व आवड निर्माण झाली.

आजोबांच्या स्पष्ट उच्चाराने..माझ्या रसनेला वळण लागले.

आजोबांच्या अंधूक दृष्टीमुळे..त्यांना वृत्त पत्रे,प्रसाद मासिक, कामकाज पत्रे, वगैरे वाचून दाखवताना.. मला वृत्त पत्रवगैरे वाचन .व लेखन..व्यासंग जडला.पत्र लेखन मर्म जाणले.

आजोबांची उत्साही व कार्यक्षम वृत्ती ने..आमच्यातील आळसाला तिलांजली मिळाली.

आजोबांच्या बोलघेवड्या व साग्रसंगीत कथन करण्याच्या गुणांमुळे..
जोग कुलाचा.. पुण्याचा.. महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचा संपूर्ण इतिहास, भूगोल ,व समाज मन.. ज्ञात झाले...
व.. समाजसेवेचे बीज मम मनी रूजले.

आजोबांच्या शिस्तबद्धतेमुळे..नियमिततेचे संस्कार झाले.

जेथे जाऊ तेथे.. नवनवीन  निर्मिती करायची.. ह्या त्यांच्यातील प्रेरणेने.. मी जोमाने.. त्यांच्या आशीर्वादाने, शुभेच्छेने..
माझ्या वयाच्या अवघ्या.. 23व्या वर्षी.. परप्रांतात...
सतत 3वर्षे धडपडत.. शाळा सुरू केली.. अर्थात तीन सहकारी पण होतेच, माझ्या बरोबर.. लढायला!
पण..स्फूर्ती दाता..व नंतर भर भरून कौतुक कर्ता.. होते.. आजोबा !!!

रोज सकाळी खणखणीत आवाजात... ते अभंग म्हणत असत..

माझ्या लग्नाच्या दिवशी पहाटे..4.30ला मला उठवले..सुरु केले..
मोगरा.. फुलला..... ...फुले वेचिताबहरु..कळीयासि..शब्दावर..त्यांच्या डोळ्यातून अश्रू रुपी..मोगरा.. टपटपला..मी..मेंदीऱंगल्या हाताने तो टिपला..

दुसरा अनुभव..

पुढील वर्षी मला.. मुलगी झाली..10दिवसानी मी घरी आले..

आजोबांच्या मांडीवर हळूच बाळाला ठेवले..

तिला.. थोपटत.. कुरवाळत.. नकळत.. चिंब भिजलेले स्वर.. उमटले..
*मोगरा फुलला..*
पणजोबा गात होते. इवली पणती (सोनाली) टुकुटुकू बघत होती. आनंद फुले टिपत होती.. हात पाय नाचवत होती..

किती नशीबवान !
जन्माला आल्यावर पहिला स्वर.. ज्ञानिया़ंचा मोगरा..
पणजोबांच्या मुखातून कानात साठवत होती..

आज सोनाली नामक मोगरा.. तेजाने फुलत आहे.. झळकत आहे.. झुलत आहे..

असा.. सुंदर क्षण देणारे..
संस्कार मेवा..सहज देणारे आजोबा..

भावपूर्ण श्रद्धांजली🌹
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme