Posts

Showing posts from December, 2017

बोन्साय.. कथा...💐

#कथा स्पर्धा.. # बोन्साय.. कौटुंबीक.. सामाजिक. मी सज्जात उभी राहून ,समोरच्या गच्चीत बघत होते... " हं.. हापस जोरात! अस्सा.." " हो थोडा मागे.. घे.. डावीकडे !हं.. बास्स !" " सोड सैल ! खेच.. खेच .. जाऊदे अजून उंच!" वगैरे उद्गार आसमंतात घुमत होते.. दोन पतंग.. नील, धवल,विशाल आकाश पटलावर ..वाऱ्यावर झुलत.. रश्मींना चूंबत.. नाचत ,थरथरत बाचाबाची करत होते. मी मोहरले. तेवढ्यात.. फोन रूणझुणला.. रमा आनंदाने... " उद्या सकाळी लवकर निघायचे हं! शेतघर.. भेट.." ठरल्याप्रमाणे .. गणपती बाप्पा मोरया.. घोषात आम्ही गाडीत बसलो.. काळीभोर डांबरी सडक हिरवीगार किनार लेऊन वळवळत होती.. जगजित सिंगच्या मखमली सूरांवर मने तरंगत होती. कच् कन् गाडी थांबली.. खाली उतरलो. उंच उंच भुरे..गहिरे.. हिरवे डोंगर,जणू स्थितप्रज्ञ योगी! हिरवेगार मळे.. जणू पाचूची खाण! गगनचुंबी ताड.. माड.. लेकुरवाळ्या .गर्भ. भाराने वाकलेल्या वेली..लपेटलेलं धुकं.. गारठलेले दवबिंदू.. त्यावर नाचणारी सुवर्ण रश्मी.हरित सळसळती पाने . रसरशीत फळे... रंगीत गंधीत फुले.. गुणगुणते भुंगे अन् भिरभि...

B.F..💐

♥B.F. मंजिरीचा मेसेज... काकू , Pl.आमच्या घरी या.अनन्या रुसली आहे... मला खूप काळजी वाटते. एक तासात मी तुम्हाला न्यायला येऊ ? मी हो म्हणले. मन विचारात पडले.. हात कामात गढले. भराभर पुडींग केले अनन्या साठी !!! मंजिरी सह तिच्या घरी गेले. इ. 9 वीतली उमलती कळी रुसली होती.. एरवी .. आssजी करत गळ्यात पडणारी अनन्या.. गाल फुगवून तोंड फिरवून बसली होती... मी तिचा गालगुच्चा घेत हळूच विचारले.. त्या .. वेड्या भास्कराने आज जोरदार चटका दिला का? का.. त्या खट्याळ अनिलाने शीळ घालून जोरदार झोका दिला माझ्या कळीला? ऐकताच ती पटकन माझ्या कुशीत शिरली.. मुसमुसत म्हणिली.. आजी, ती अर्चूटली.. म्हणाली.. " Xmas party. . माझ्या घरी करू.प्रत्येक मुलीने आपला खास.खास B.F. घेऊन यायचे. पांढरा चमचमता ड्रेस.. शूज.. पर्स .. सारे नवे नवे शिवाय 500रू. घेऊन येणे. Pair dance.. games.. music.. मस्ती.. धमाल... मला B.F. खास नाही. म्हणून ती मला बावळट म्हणाली .अन् आई म्हणते..."एवढा खर्च नाही करायचा. आजी..मी बावळट आहे का? B. F.. कसा शोधू?अन् म्हणे.. त्याच्या कडूनgift उकळायचे!!! मी तिला सांगितले....

काळ... काम... वेळ...

🍎काळ..काम.. वेग.. कँरमच्या स्पर्धा .. सारी तयारी झालेली.उत्साही प्रेक्षक ,कुशल परिक्षक सारेच वाट बघत होते.. पण.. स्पर्धक विजयचाच पत्ता  नव्हता.. मी वर्षाला फोन केला.. ती रडव्या स्वरात म्हणाली..." मँडम , काल आँफीसमधेच विजयला खूप गरगरायला लागले,पोटात असह्य वेदना झाल्या.. हाँस्पिटल मधे आहोत आम्ही.. सोनोग्राफी.. अनेक चाचण्या.. या साखळ्यात अडकलो आहोत.. Sorry! विजय.. उच्च पदस्थ बँक अधिकारी! पूर्वी फक्त l.Tक्षेत्रात  कामाचे तास, वेळ आणि काळ यांचा मेळ नसे . पण आता मात्र सर्वच क्षेत्रात..  कामाचे तास फक्त8 तास हे गणित इतिहास जमा झाले. आता.. किमान 12तास काम अन् 3तास प्रवास !!! त्यामुळे शरीरातील गरजेनुसार खाणे..पिणे.. विश्रांती.. न  होता.. सोयीस्कर वेळी .. जे मिळेल ते.. खाल्ले जाते. चौरस.. समतोल ऐवजीं.. निरस.. घातक..बाधक अन्न ढकलले जाते. पचनशक्ती चा ताल बिघडतो.. तोल ढासळतो! अनियमिततेने कौटुंबीक जीवन  विस्कळीत होते. मुले दुरावतात. चिडचिड होते. नैराश्य येते. व्यसन वाढतात. रोग जन्म घेतात. खंत ही आहे.. की भारतात ,प्रबळ मनुष्यबळ असून सुद्धा.. काळ.. क...

ठकास ठक..💐

💃🏾 ठकास..ठक.. विमानात तरुणीचा विनयभंग.. हा विषय सध्या .. तव्यावर आहे... प्रसारमाध्यमांना.. एक च्युइंग गम मिळाले आहे. पाठीमागच्या सीट वरुन.. पुढे बसलेल्या तरुणीला स्पर्श करणे.. निंद्य वर्तन!!! पण... ठकास .. ठक होणे गरजेचे. फटकारुन.. तिरस्काराने बघून.. उपयोग झाला नाही तर..पीन टोचणे.. चिमटे काढणे.. त्याचे पाय खेचणे..स्वत:च्या वहाणेचा वापर करणे.. मागे कुणी अधम ग--धडे असेल तर मुलींनी निधडे पणाने सामना करायलाच हवा!! प्रत्येक आईने प्रत्येक वेळा.. शांता माता न राहता.. दुर्गा माता बनायलाच हवे! मुलांना.. मुळाक्षरांबरोबरच स्वसंरक्षणाचे धडे द्यायलाच हवे!! त्याचबरोबर धारदार शस्त्रे न वापरता.. नजरेत.. वाणीत.. क्रुतीत .. .. जरब असावी..कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे .. स्पर्श करण्याची! प्रत्येक वेळी कराटेच शिकले पाहिजेत असे नाही. दोन बाहु सरसावले की.. चार हात येतात मदतीला! पत.. संभाळणे जरुरी आहे.. पण.. कुणी पातळी सोडली.. तर.. स्त्रीत्वाचे रक्षण करणे आवश्यक आहे. स्त्री घाबरट आहे कळले, तर तो जास्त... चेकाळतो! वेळेवरच इंगा दाखवून.. शिवाय तक्रार दाखल केली... तर.. बातमी..सद्य स्त्र...

खिचडी...💐

♥ खिचडी.. एक अप्रूप...* बोळकं पसरत..हासणारं ,धावणारं  अवखळ बाळ.. अन् त्याच्या मागे.. चंदामामा दाखवत.. काऊ चिऊची गोष्ट सांगत .. मऊ.. मऊ खिचडी मायेने भरवणारी आई... शाळेतून.. काँलेजातून.. दमून भागून आल्यावर... अरबट.. चरबट.. खाणे झाल्यावर.. परीक्षांचे अवघड गड चढताना.. सहल, कँम्प फायर, ट्रेकींग.. सायकलींग.. स्विमिंग.. हुरडा पार्टी.. खेळ.. भांडण तंटा.. कंटाळा.. आळस.. पैशाची चणचण.. तापाची फणफण.. उन्हाची रणरण.. पावसाची रुणुझुण.. अनवाणी वणवण.. ते.. वार्धक्य.. सर्व प्रसंगी सौख्य देते .. साथ देते.. संगतदेते.. रंगत वाढवते .. ती.. खिचडी!!! भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतिक.. खिचडी!!! सर्व अन्नघटक.. भाज्या.. फळे.. पाने फुले.. मसाले.. षड्रस.. स्वतःच्या अंतरात सामावते.. पौष्टिक मूल्य, समाधान.. आनंद देते ती खिचडी!!! अशी ही साधीसुधी.. तर कधी शाही मेजवानी खिचडी बनली आहे.. ग्लोबल.. दिल्लीत.. इंडिया गेटजवळ 800 किलो खिचडी वर साजूक तूपाची फोडणी घालून तिला  ब्रँडेड रुपडे दिले.. साक्षात.. खाद्य संस्कृती चा ब्रँड अँम्बेसेडर.. संजीव कपूर ने !!! संजीव कपूर.. एक अजब रसायन!!! युव...

दुसरी मुलगी💐

🌹दुसरी मुलगी 🌹 आज एका सखीने सांगितले.. दुसरी मुलगीच.. या विषयीच्या तुझ्या भावना.. स्पष्ट .. स्पष्ट लिही... 🌺12 डिसेंबर 1978 या दिवशी दुपारी 12.12 मला दुसरी मुलगी झाली... गोल गरगरीत.. गोड.. गोड..गुलाबी .. लालसर .. मऊ मखमली जणू लोकरीचा गोळाच ..काळे कुरळे जावळं..अन् काळेभोर चिमणे डोळे.. बघून मी हरखून गेले.. मुळात माझा स्वभाव रडण्याचा नाही.. अन् कुणाच्या जन्माचे दु:ख करण्याचा तर नाहीच नाही... पण.. नात्यात मात्र.. ," दुसरी मुलगीच?" " अन् ती सुद्धा 12 वाजता?म्हणजे चांगलेच 12वाजणार!" असे कुजके..नासके सूर उमटले. पण.. कुजकी.. सडकी नाती.. काटेरी.. विखारी पाती समजून मी दुर्लक्ष करते... आम्हा उभयतांवर..माझ्या सासऱच्या अर्थिक जबाबदाऱ्या होत्या.म्हणून मानसिक ताण होता. माझ्या दोन्ही लेकींमुळे  नव्हता.. Airport colony सारख्या प्रशस्त जागेत दोघींची सशक्त वाढ झाली. सर्वच बाबतीत दोघी अग्रेसर होत्या.. आहेत.. कमतरता कसलीच नव्हती. दुसरी मुलगी.. म्हणून भेद कधीच झाला नाही. दोघींनाही अर्थिक.. शारीरिक.. शैक्षणिक बाजूंनी मजबूत नवरे मिळाले... आणि गोजिरे सशक्त मुलगे झाले.....

वेणी...💐

🙎🏻काल सकाळी सात वाजता मी जोशी यांच्या घराची बेल वाजवली.. दार सात वर्षाच्या साहिलने उघडले..व म्हणाला.. "आजी, बाबा ताईची वेणी घालतोय ". मी आश्चर्याने आत जाऊन बघतच राहिले... त्याचा बाबा.. संदीप म्हणाला... " काकू, सारिका(पत्नी) सकाळी6-30 ला बाहेर पडते. त्या आधी स्वराला (लेकीला) उठवून ती वेणी घालणे.. रडारडी.. अन् बालमनावर अन्याय नाही का? मग मी शिकून घेतली.. वेणी घालणे.. मी या 10वर्षी य चिमुची वेणी घालतो व 9वाजता त्या दोघांना बस मधे बसवून मी कचेरीत जातो. मी कौतुकाने बघत होते.. स्वराचे सारे केस उलटे फिरवून एक बारीक सरळ रेषा.. मग छोटी तिरपी रेषा अन् परत मानेपर्यंत सरळ रेषा साकारत घनदाट कुंतलांचे दोन समान भाग केले. एक भाग मुठीत धरून ,कानावर, कपाळावर केस नाहीत ना..याची खात्री करून एका भागाचे परत तीन भाग करून.. एकात एक पेड गुंफत छान तिपेडी वेणी तयार केली. मधे.. मधे.. वरचा पेड दाबून वेणीला सरळ रुप देणे.. नंतर लाल रिबीन.. मध्यावर धरुन तीन पेडात तिला चपखल गुंफणे.. गाठ मारणे.. नंतर वेणी दुमडून रिबीनीचे सुबक फूल तयार करणे. तशीच दुसरी वेणी घालणे. अन् ही सारी कला साधताना, ति...