🙎🏻बालिका घट (सुरक्षा?) नेत्राने विनंती केली, " मँडम, लेक दोन वर्षांची झाली, खूपच धाकधूक वाटते. जरा यावर लिहा ना..'" दुसऱ्या.. तिसऱ्या वया पासून मेंदूतील लिंबीक सिस्टीम मुळे भावनांचे नियंत्रण होऊ शकते.त्यामुळे लेकीला अवयवांची ओळख करून द्यावी. व ... ' हे ' इंद्रियं अतीव महत्त्वाचे ,म्हणून च त्याची स्वच्छता, नियमितता, आरोग्य व संरक्षण जरुरी. हे सांगावे. ज्ञान व भान जरुरी.. मुख्य म्हणजे आम्ही तुझे माता.. पिता.. आमच्या शिवाय कुणी मांडीवर घेणे, पापा घेणे, चिमटे काढणे,कपड्याला हात लावणे, आमीष दाखवणे काही केले तर जोरदार विरोध कर. एक ठोसा दे. ढकलून दे. जास्त जवळ कुणाच्या जायचे नाही. शिष्ट म्हणले तरीही चालेल. पण बेटा, तनमन पवित्र राख. "असे शिक्षण देणे आवश्यक. काही वेळा आप्तच अगदी रक्ताचे नातेवाईक सुद्धा गैर वागतात. व वैर साधतात... मुलं ..एखाद्या नात्याला नाकारत असेल तर मुलीचे कौतुक करावे.. व ते नाते तोडावे , वत्सलता व वैषयिकता यातील फरक ओळखायला शिकवावे... झोपेत दात खाणे, बाहेर एकटी जायला घाबरणे, किंचाळणे, थरथर कापणे,तहान.. भूक.. झोप चक्र बिघाड.. असे...