दर्पोक्ति...
🌸 दर्पोक्ति...
चार दिवसांपूर्वी माझ्या मैत्रीणीची सख्खी बहिण माझ्या घरी आली होती..
अर्थातच मी .. सतत आत्ता ती हवीच होती.. वगैरे.. तिची आठवण काढत होते...
तिच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले.पटकन..ती म्हणाली..
"' तुझी मैत्रीण आहे ती. पण स्पष्ट करते.. तिच्याशी संबंध ठेवू नको. अत्यंत दूष्ट आहे ती..ती अशीच वागली.. तश्शीच वागली..हे शोभलं का तिला..
आम्ही संबंध तोडले आहेत.."'
मला खूप हसू आले...
मी तिला विचारले..
""तू स्वतः च्या डोळ्याने काही पाहिलेस? स्वतःच्या कानाने काही ऐकलेस?त्या वेळी तू जाऊन मदत केलीस?..
ती पण आजारी च होती. सर्वच संकट तिने एकटीने च झेलले..तुम्ही तिच्या मनाचा विचार केला?
आणि तू स्वतः तुझे आईबाबा अनेक वेळा तिच्या घरी जात होतात. सतत .--
तुला स्वतःला तिचा कधी वाईट अनुभव आला आहे?
अग.. कोण..कुठली माणसे सतत तिच्या कडे जात येत असतात. कुणालाही ती दुष्ट,कपटी वाटत नाही..हो ना?
तिने कबूल केले. ..
हो.. आम्हाला कधीच वाईट अनुभव आला नाही....
मग मी समजून चुकले..
या माझ्या मैत्रीणीच्या बहिणीची ही दर्पोक्ति आहे..
तिला.. बहिणीचे यश बघवत नसेल..
बहिणीच्या कर्तृत्व वर ती जळत असेल..
*स्व..* कुरवाळत असेल.स्वतः चा ठमकारा मिरवायचा असणार
किंवा..
सांपत्तिक वाटा मिळावा म्हणून तिला बहिणीचा काटा काढायचा असेल..
म्हणून.. सांगते आहे..
माझी बहिण अश्शी आहे.. तश्शीच आहे..
पण..
काही झाले तरी.. मी मला जोपर्यंत कुणाचा वाईट अनुभव येत नाही.. तोपर्यंत मी नातेसंबंध /मैत्री बंध.. तोडत नाही..
मला तिच्या शब्दा..शब्दांत दर्प आढळला..
चालायचच..
जीवन बागेतील सर्वच फुले परिमलत नाहीत तर काही फुले..दर्प.. सोडतात..
आपण परीक्षक व्हावे..
अनुभवावे.. कुणाच्या सांगण्यावरून मैत्र बंध का बरे तोडावे..?
धन्यवाद🌸
उन्नती गाडगीळ🙏🌹

Comments
Post a Comment