Posts

Showing posts from January, 2020

एक Rhyme

श्री.अमोल च्या मागणीनुसार.. त्याच्या छोट्या मुलीसाठी इंग्रजी रचना देत रहा.. मी प्रयत्न करते.. देते..जमले तर देते...चू.भू.द्यावी.. घ्यावी..💐 Bird 's nest is on a tree.. In that nest , babies three !!! So ... Don't cut tree.. Leave them free.. Thanks.. Unnati Gadgil🌹🙏

घर दोघांचे..

♥घर.. दोघांचे... एक चौकीदार... खाली मान घालून निमूटपणे काम करत असे.पण.. घरात मात्र शिरजोरी.. स्वामित्व गाजवायचा.. खोपट्यात राह्यचा.. पण आव.. बाजीरावाचा! पत्नी बिचारी दोन मुलांना संभाळत.. सटर..फटर शिवणकाम करत फाटक्या संसाराला ठिगळे जोडायची!!! एकदा ती बाळाला भरवत असता..बाळाला ठसका लागला, जीव घाबरा झाला.. बाळाच्या टाळूवर फुंकर घालत पत्नी म्हणाली.. " जरा.. पानी द्या प्यायाला." तो गुरकावून म्हणाला.. " ते माझं काम नाय !" ती पण चिडून.. " अवो, बाळाचा जीव घाबरा झालायं..अन् पोर दोघांचे हाय ना  वं? मग काम माजं एकटीचं कसं व ?" त्याने दणकन् तिच्या कमरेवर लाथ मारली अन् निघून गेला... साहेबांच्या घरी गेला.. साहेब.. त्यांच्या छकुलीस मांडीवर घेऊन बाटलीने दूध पाजत होते. ... ते बघून तो अवाक झाला. साहेब सहजपणे म्हणाले.. " घर दोघांचे आहे. मूल दोघांचे. हासत..खेळत वाढवायचं!" संध्याकाळी तो खोपटात गेला. बायको दूर नळावर पाणी आणायला गेली होती. .. डोईवर घडा.. अन् खाकोटीस.. बाळ !!! त्याने धावत जाऊन बाळाला कडेवर घेतले. बायको.. बाळाला पाजत होती...

पार्टी..💐

♥पार्टी.. मंजिरीचा मेसेज... काकू , Pl.आमच्या घरी या.अनन्या रुसली आहे... मला खूप काळजी वाटते. एक तासात मी तुम्हाला न्यायला येऊ ? मी हो म्हणले. मन विचारात पडले.. हात कामात गढले. भराभर पुडींग केले अनन्या साठी !!! मंजिरी सह तिच्या घरी गेले. इ. 11 वीतली उमलती कळी रुसली होती.. एरवी .. आssजी करत गळ्यात पडणारी अनन्या.. गाल फुगवून तोंड फिरवून बसली होती... मी तिचा गालगुच्चा घेत हळूच विचारले.. त्या .. वेड्या भास्कराने आज जोरदार चटका दिला का? का.. त्या खट्याळ अनिलाने शीळ घालून जोरदार झोका दिला माझ्या कळीला? ऐकताच ती पटकन माझ्या कुशीत शिरली.. मुसमुसत म्हणिली.. आजी, ती अर्चूटली.. म्हणाली.. New year party. . माझ्या घरी करू.प्रत्येक मुलीने आपला खास.खास B.F. घेऊन यायचे. पांढरा चमचमता ड्रेस.. शूज.. पर्स .. सारे नवे नवे शिवाय 500रू. घेऊन येणे. Pair dance.. games.. music.. मस्ती.. धमाल... मला B.F. खास नाही. म्हणून ती मला बावळट म्हणाली .अन् आई म्हणते ..."एवढा खर्च नाही करायचा. आजी..मी बावळट आहे का?" B. F.. कसा शोधू?अन् म्हणे.. त्याच्या कडूनgift उकळायचे!!! मी ति...