गोमाता
🌷 आम्ही अमदाबादला होतो, टुमदार घर.. मागे पुढे आंगण.. बाग बगिचा... एक दिवस दुपारी ४ वाजता .. एक गाय... अचानक मान हालवत .. बागेत घुसली . दुरंगी बोगनवेलीच्या कमानी खाली उभी राहिली ! गाभण होती ! आर्त हंबर .. चौखुरांची थरथर ... कारुण्यमय नजर ... भारलेली... भारावलेली... चुकलेली.. घाबरलेली... अस्वस्थ ... माझ्या सासुबाईनी ओळखले... लवकरच ती माता बनणार ! मी तिला बादलीभर पाणी दिले... घरातील अन्न दिले . सासुबाई ... एक माता... होणा-या गौ मातेला धीर देत होती ! त्या तिच्या पाठीवरुन हात फिरवत होत्या ! तिला वेदना सोसवत नव्हत्या...आम्हाला बघवत नव्हत्या ! दोघींनीही जप सुरु केला ... माझे दोन वर्षीय लेकरु पायात घोटाळत होते! आर्त हंबर ... अश्रू बघून बावर ले होते ! आजीला चिकटले होते! अन् त्या गायीचे वासरु बाहेर यायला धडपडत होते ! सासुबाई च्या सूचने नुसार मी गायीसाठी खिचडा केला ! एकदाचा देव पावला ! तिने एका गोंडस वासराला जन्म दिला ... मी व सासुबाई बाईनी आनंदे टाळ्या वाजवल्या ! देवापुढे गुळ खोबरे ठेवले ... ते वासरु काही वेळातच टुकु टुकु बघु लागले व टुण टुण उड्या मारु लागले! माझे कोकरु पण न...