कुलदीपक💐

💥/🌙कुलदीपक..

घराघरातील कुलदीपक उच्च शिक्षण घेतात.उच्च पदं भुषवतात.थाटामाटात उच्च शिक्षीत मुलीशी विवाह करतात...

पसारा वाढल्या की..तिला विश्वास देतात..
तू घरचे बघ.मी आहे खंबीर..

हळूहळू तिचेही वय वाढते.
त्याच्या आकांक्षा, ध्येय, इगोज,वाढत जातात.

त्या बरोबर थोडा अहंभाव.. वाढतो.तिला गृहीत धरून अर्थिक मनमानी/ कारभार सुरू होतात.

नोकरी ची धरसोड, कुठल्यातरी न झेपणाऱ्या.. स्कीम, धंदे, व्यसने यात लोभाने  गुंतवणूक.. केली जाते. चंगळवाद ,ईर्षा.. स्पर्धा, मत्सर इ.मुळे तन-मन-धन सर्व बाजूने पाय खोल खोल जातो.

बिनदिक्कत हात पसरले जातात... नात्यात/मैत्रीत दुरावा निर्माण होतो.

एकच एक कला येते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीत कमीपणा वाटतो. पर्याय कमतरता, न्यूनगंड.
अन् तो कळू नये म्हणून लपवाछपवी,आततायी पणा,सर्वच..

पत्नी ची आतल्या आत..तडफड,कुतरओढ,स्वप्नांचा चक्काचूर, अर्धवट वयाच्या मुलांचे कोमेजणे,

ऐनउमेदीत मुलाने नोकरी सोडून दिली.. एक ना धड वृत्ती बघून आई बाबांचे उद्ध्वस्त होणे, स्वतः ला,घरादाराला नैराश्य येणे.

हे सर्व अविचाराने होते.पत्नी वर विश्वास ठेवून ,विचार विनिमय करून निर्णय घेतला.. तर घरचा कुलदीपक काजळगार नाही.

 वादळ निर्माण केले तर ते शमविण्याची ताकद पण हवी. आपल्या कर्तृत्वावर कुटुंब अवलंबून आहे. त्यांचा आपल्यावर विश्वास आहे. त्याला तडा गेला तर कुटुंबाला तडाखा बसतो.ही जाणीव हवीच.

पूर्वी.. एकदा माणूस चिकटला की 30/35वर्षाची निश्चिंती असे.त्या वृत्ती ला नावे ठेवली जातात.

पण.. घरा घरातील कुलदीपकांनी.. हे ही लक्षात घ्यायला हवे.. की सततच्या धरसोडीने काही साधले जाते का?

साधले तर आणि तरचं नाते सांधले जाणार ना!!!

तरी परस्पर विश्वास ठेवून, इगो.. ला .. गोss(go) म्हणून अनेक पर्याय(व्यवसाय भिमुख शिक्षण) असतील, कष्ट करण्याची ताकद असेल तरच .. वादळे अंगावर घ्यावी.  काजळी दूर सारून विश्वास नामक तेल घालून.. कुलदीपक उजळो.
हीच प्रार्थना!

उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme