Posts

Showing posts from April, 2018

मुहूर्त गान.. विवाह/मुंज..💐

मुहूर्त गान...(विवाह/मुंज) श्री. गणेशा आवाहन, मस्तक लवून, कुलस्वामिनीला विनवू,मनोभावे वंदून। अत्तराचा घाला सडा,चंदनाचा लावा टिळा.. माऊलीला हिरवा चूडा,काळी पोत माळा गळा। उपनयन सोहळा, बटूचा आगळा.. मुहूर्ताची झाली वेळा,वसंत आला..आला।। पाच घरच्या सुवासिनी, आल्या नटुनी,थटुनी.. द्विकुली आनंद.. वाहे दुथडी भरुनी। पीत वर्ण सोनसळा,जर्द हळदीचा पिवळा.. पहिला मान उखळा.. उधळे सोनसळा। लाल शालू नेसुनी बसली,मिरचीबाई माझी रुसली.. दुसरा मान देऊया तिला.. लाल लाल रंग उधळी। पांच खिरी कराया, आल्या ग माहेरवाशिणी.. टकटक जोडवी.. वाजती ग अंगणी। लाडू गोल वळाया,सजल्या कुवारणी... औक्षणा सज्ज.. माता..मीनाराणी। मुसळाला कुंकू लावा,फोडुया सुपारी.. अंगतपंगत करुया.. भरदूपारी। चटपटीत मुगवड्या,करा..झरा झरा.. आजी..आजाच्या डोळा.. आनंद धारा। उन्नती गाडगीळ 💐

मातृभोजन..💐

👏मातृभोजन..👏 बटू चे मातृभोजन,काय वर्णावा थाट, चांदीचे ताट, अन् चंदनाचा पाट । कमलवेलींची रेखली..रांगोळी... सभोवती सजल्या.. लेकुरवाळी। अष्टवर्ग्याचा आज मान..खास..खास.. चंदन,केवड्याचा दरवळे.. सूवास। चंदेरी वाटीत शोभती पाच खीरी.. साजूक तूपाची धार..साखर भातावरी। फेणी, जिलेबी, श्रीखंड पुरी,करंजी अन् बासुंदी.. घीवर,चिरोटे, खवा पोळी,आणि नाजूक बुंदी। दोन्ही आज्या.. मायेने भरवती..बाळा.. सोडून दे बाळा.. आता तू..वेडा चाळा। आत्या, मावशी, काकू,मामी..देतील गोड घास.. सातत्याने धरी.. बाळा..विद्येची कास। नाचत..मुरडत करवली येई..ठेक्यात... अमृताचा घास भरवी.. भावाच्या मुखात। जरतारी पैठणी लेवुनी, सज्ज माता मीना.. सुवर्ण घास..पुत्रा.. भरवुनी.. अर्थ देई जीवना। पुढील जीवनी सेवन कर.. सर्वज्ञानाचे घास.. सार्थ होईल जीवन.. यश,किर्ती लाभो..खास..खास। बटू चे मातृभोजन.. काय वर्णावा थाट.. आशीषसुमनांनी.. उजळो.. जीवन वाट।। उन्नती गाडगीळ🙅

कैरी ही..💐

कैरी ही कोकणातली ... भलतीच बाई ... नखरेल । वसंताने हिरवी साड़ी नेसवली ... भरारा .. सोडून .. केशर ल्यायली । जेंव्हा करकरीत कच्ची , गुमानं दगड खाते, आता रसरशीत पक्व , गुर्मित ' भाव ' खाते । तेंव्हा निमुट बसायची भर बाजारात ..... आता न्हाते गंधात ... बसते विमानात । ही बाई वाढवते ... देशाची ' शान ' ... परदेशात उंच .... कोकणची मान ! ओलेत्या नेत्राने देऊया तिला .. निरोप .... हासत खेळत रुजवुया नवे ... रोप !!! उन्नती गाडगीळ 🙏

प्रश्न... प्रश्न... प्रश्न..💐

🐤सकाळी..एकामागोमाग एक कामांची माळ..ओवत होते खरी..पण,नजर.. दाराकडे..९ वाजले..वर्तमानपत्र..नाही..मन बेचैन ! शेजारी..चार विद्यार्थी..राहतात.. परप्रांतीय.. आन्टी..आन्टी..करत नाते जोडतात..जीव लावतात.. आज द्राक्षाचा...साल्सा..केलेला..बाऊल मधे..घेऊन..त्यांची..बेल..वाजववली..yessss.. ऐकून..आत गेले.. Good morning..झाले..ओssहो! क्या रंग है..क्या..खुशबू..झाले}.. पण..मला.. तेथे..निराळेच रंग..ढंग दिसले.. चार मुले..चार..मुली..नशेत चूर..तारवटलेले..डोळे..सर्वांचेच तोकडे कपडे..दंड..मांड्यावरचे टँटू..सिगारेटची थोटके..ग्लासेस..सारैच... ... .. मी झटकन...निघाले..विचारले.. पेपर..नही..आया..? एक म्हणाला.' पेपर वाला..साला.. बदमाश.. Home delivery charges..बढाया न..तबसे बंद किया ।- दूरून पोटाला चिमटा घेऊन ,सोनं.गहाण ठेवून पालक..मुलांना..पैसे..पाठवतात..शिक्षणासाठी..का..व्यसनासाठी..पेपर..महाग का दारू ? प्रश्न ..प्रश्न अन् प्रश्न.... उन्नती गाडगीळ 🙏

बेगमी...💐

*******  बेगमी ******* इवल्या मु्ंग्या ... उन्हाच्या झळा सोसत अव्याहत अन्नाची बेगमी करतात !!पिलासाठी !!! तद् वत उन्हाळी सुटीत शाळकरी मुलांची नव वर्षाची पुस्तके पालकांनी अभ्यासावी ! सर्व विषयाच्या ट्यूशन ... पैशाचा अपव्यय तर होतोच व साचेबद्धता , निरसता येते . विशेषत: भाषा!!! सखोल अभ्यास, काव्य अंतरंग फुलवणे , स्व शब्द रुप देणे , संदर्भ अभ्यास हे सर्व जरुरी, ! तसेच पुढील वर्षाच्या स्पर्धांच्या दृष्टि ने गाणी,कविता, नाटुकली , संवाद, यांची जमवाजमव सुटीत करुन ठेवावी ! प्रकल्प, सहली इ. साठी चे साहित्य, कला साहित्याची पुर्वतयारी असली की शालेय दिवसात हासत , खेळत , शिकवणे सहज सोपे होते! आपली नोकरी संभाळून मुलांचा अभ्यास घेता येतो ,कला.. गुण वर्धित करताना , घरादाराची चिडचिड , धावपळ होत नाहीं! सुटीतील पालकांच्या अभ्यासाने मुलाचे व्यक्तिमत्व तर उजळतेच अन् ममत्वाचा स्पर्श व शब्द मुलांच्या मनावर जास्त व चिरतम ठसतो ! आपल्या शिक्षणाचा , कलागुणांचा ओलावा मुलांना मिळतो , अन् बालतरु छान , हासत ,खेळत फोफावतात ! या उलट सतत क्लास ला जाऊन मुले रुक्ष बननतात सुशिक्षित पालक हतबल वबनतात ! बघा बरं प्र...

सुट्टीत अभ्यास ???

🌺सुट्टीत अभ्यास??? चंदन ची तक्रार.. " ए आजी, बघ ना ग.. आईबाबा सुट्टीत सुद्धा मला कुठल्यातरी क्लासला अडकवतात.. तू सांग ना ग त्यांना..." त्याच्या आईबाबाचा सूर.. " अभ्यास इतका प्रचंड वाढला आहे, अन् एखादी foreign language नको का शिकायला?" मी म्हणाले, " रजू , तू स्वतः जँपनीज अथवा स्पँनीश चा क्लास लाव.. रोज त्याच्या समोर नवनवीन शब्द.. वाक्ये.. वापर.. गमती जमती सांग. म्हणजे त्या भाषेत त्याला *रस* निर्माण होईल अन् मग तो आपसूकच त्या भाषेत पारंगत होईल. प्राथमिक शिक्षण नेहमी पालकांनी द्यावे. तिला ते पटले. तिचा दुसरा प्रश्न.. शालेय अभ्यास ग.. त्याचे काय? मी सांगितले.. " हे बघा, तुम्ही दोघेही उच्च शिक्षीत आहात. मुलांच्या सुट्टीत.. पुढील वर्षाची पुस्तके तुम्ही उभयतांनी वाचून, नोट्स काढून ठेवा.. आपल्याला एकदा आकलन झाले की समजावणे सोपे जाते.जून पासून .. दोघांनी मिळून विषय वाटून घेऊन जाता.. येता.. काम करता..करता.. मुलांचा अभ्यास घेता येतो. मी तरी बाई असेच केले. शिकवणी लावावी लागत नाही.. अर्थ बचत, वेळ बचत साधते. तिला ते पटले. उन्नती गाडगीळ 🌹🙏

त्याला .. ही वळण लावुया...💐

👭 ' त्याला ' ही हे वळण लावुया.. घरातील मुलगी वयात आली की आपण  तिचे कौतुक तर करतोच पण.. डोळ्यात तेल घालून जपतो..जागता पहारा ठेवतो.. पण.. मुलगा वयात आला की मात्र .. आपण फक्त त्याचे शिक्षण, करिअर, इ.बाबतीत लेक्चर्स देत रहातो. पण.. नैतिक संस्कार या बाबतीत विशेष लक्ष घालत नाही. मुलगा.. कुठे जातो..भटकंती, वाहनांचा वेग, मित्र,व्यसने, पैसे वापर, बेहिशेबी वर्तन, अन् महत्त्वाचे म्हणजे.. त्याची  मुलींशी मोकळीक...जवळीक... या बाबतीत मित्र बनून त्याच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. त्याला सांगावे.. तू उद्याचा .. पिता... आहेस. समाजात तुला प्रतिष्ठित स्थान.. मान.. मिळवायचा आहे. त्यासाठी.. तुला तुझे तन.. मन पवित्र ठेवणे आवश्यक.हे संस्कार जरुरी. एक पुरुष.. भ्रमर.. अनेक स्त्रीयांचा.. फुलांसम सहज चोळामोळा करतो..असुरी आनंद मिळवतो.पण त्याला हे समजत नाही की तो आनंद क्षणिक असतो. तो अनेक रोगांची शिकार बनतो! मनाने कमकुवत,भ्याड,लाचार, बनतो.समाज नजरेतून उतरतो.भ्रष्ट एकाकी जीवन जगतो !मुख्य म्हणजे.. बहुस्पर्शी वर्तनाने.. त्याच्या मुलांना  अनेक व्याधी जडतात!!! हे सारे मुलांना समजा...

पैसा झाला मोठा..💐

⭐पैसा झाला मोठा... खूप वर्षांपूर्वी एक गोष्ट वाचली... कै. लाल बहादूर शास्त्री यांच्या कुटुंबातील एका सदस्यांनी एका बागेत झाडावरून खाली पडलेले दोन आंबे घरी आणले. ते बघताच लाल बहादूर शास्त्री संतापाने लाल झाले...त्यांच्या मते.. आंबे पडलेले असले तरीही त्यावर हक्क.. त्या बागेच्या मालकाचाच!!! त्या मालकाच्या परवानगी विना घेणे.. एक प्रकारे चोरी च !!! ते अंबे परत करायला लावले !!! याला म्हणतात न्याय!!! त्याप्रमाणेच.. शिवाजी, शास्त्री, टिळक,इ. प्रभुतींचे न्याय दान प्रसिद्ध आहे. न्यायालयाविना सुद्धा सच्चा न्याय देण्याची व्रुत्ती एक आदर्श निर्माण करते.. पण.. आता.. प्रगतीपथावर.. बेफाम वाहने चालवून अजाण जीवांचा चक्काचूर करणे... बेछूट पणे बंदुकीच्या फैरी झाडणे.. अन् बिनदिक्कतपणे ⭐म्हणून वावरणे... याला काय म्हणावे? जामिनावर  सुटणे.. म्हणजे निर्दोष ठरतो का? सिनेसृष्टीतील स्वतःला ⭐समजणारे.. त्याला हार तुरे घालून स्वागत करतात? पेढे वाटतात?जल्लोष करतात?आनंदाने नाचतात? जरा ही नाही वाटत नाचक्की ?.. नाही खंत? नाही खेद? अख्ख्या सिनेजगताला.. खुपायला हवा *सल* खाली जायला हवी ...

दोघी बहिणी..💐

👭दोघी बहिणी.. एका बहिणीने विवाहापूर्वी.. परदेशीय कोर्स केला,जगाचा इतिहास.. भूगोल आत्मसात केला. विविध परदेशी भाषांचा अभ्यास केला. पासपोर्ट काढून ठेवला. मनात जबरदस्त इच्छा.. पती परदेशस्थित असावा.. जगप्रवास घडावा.. वगैरे.त्या द्रुष्टीने स्थळे बघणे पण चालू होते. पण.. अचानक एक दिवस गल्लीतील च सुशिक्षित मुलाला पसंत केले... अगदी मजेत.. आनंदात.. सुखात सारे चालू आहे. दुसरी बहिण... तिच्या मनात.. मोठ्या बहिणीप्रमाणेच आपल्याला ही.. एकाच गावात स्थळ मिळावे.. शक्यतो.. गाव सोडून जायचे नाही.. वगैरे.. अन् अचानक तिला परदेश स्थित पती मिळाला..तेथेही सतत फिरणारा..घरे बदलणारा..ती पण त्याच्या मागोमाग देशोदेशी फिरत रहाते.. अगदी मजेत.. आनंदात.. आपण एखादी सरळ रेषा आखून,त्यावरूनच चालायचे असे ठरवले तरी नशीब वळणे घ्यायलाच लावते.. अन् त्या वळणवाटा .. जीवनाला वळणदार बनवतात.. जेथे आपले दाणा..पाणी.. आहे.. तेथे.. जातो मानव प्राणी !!! उन्नती गाडगीळ🌹🙏

तोडगा...💐

🌸तोडगा.. मागील वर्षी याच दिवसात.. एक व्रुद्ध स्त्री.. उंच, धिप्पाड, नऊवारी साडी.. ओचा सोडलेला..पदर खोचलेला.. भाळी बुक्का.. गळ्यात तुळशी माळ..कष्टाने रापलेला चेहरा..कणखर.. दणकट!!! मला विचारले.. " ताई, मला बी घ्यावा ना तुमच्या भजनात?" काळ्या भोर डोळ्यात आर्जव होते.. मी संमती दिली.. सुमा ताई यायला लागली.. माझ्या लक्षात आले की या ताई लिहीत नाहीत. अन् भजन, हरिपाठ.. सारे झाले तरीही रात्री आठ पर्यंत मंदिरात बसून असतात. मी विचारताच त्या म्हणाल्या.. " ताई, मी  तीस आणि दोन वर्षे माळीण काम केले. कष्ट मोप होते पन् पगार बी मिळत होता. 7 महिने झाले मी रिटायर झाली.. अन् आता चोबीस तास घरात असते मग.. "माझी सून अश्शीच हाय..तश्शीच हाय !तिने मला ह्येच नाय दिलं.. त्येच नाय दिलं..मुद्दाम च अशी वागते.. असे इचार सुरू झाले. रोज खटके उडू लागले.. अगदी शिवीगाळ सुरू झाली.. मग इचार केला.. मी नोकरीत असताना.. हीच सून लै गुनाची वाटत होती.. म्हणजे.. लक्षात आले.. घरापासून दूर रहावे, अ़ंग काढून घेतले.. लै अपेक्षा नाही ठेवल्या की समदं सुरळीत चालतय बगा ! मी रातला आठला घरला जाते. !...

पटापट.. पण..रुचकर..💐

🌺काल आमच्याकडे ह्यांचे एक मित्र फराळाला आले होते.. त्यांना दुधाचे पदार्थ वर्ज्य...मग.. सहज सोपा खालील पदार्थ केला. त्यांना तर खूपच आवडला. ते घरी गेल्यावर त्यांच्या पत्नी ने फोनवरून पाककृती विचारली..  --- -- -- *रस भगर* --- -- साहित्य..1वाटी वऱ्याचे तांदूळ (10..15मिनिटे आधी धुवून निथळत ठेवले) 1च. साजूक तूप, चार..पाच ग्लास ऊसाचा ताजा रस, किंचीत गुळ, लिंबू रस,नारळ चव, लवंग, दालचिनी,वेलची पूड,केशर, बदाम,पिस्ता, बेदाणे, वगैरे. क्रुती.. तुपावर लवंग व वऱ्याचे तांदूळ भाजून घेणे,त्यात नारळचव, ऊसाचा रस.. हवा असेल तसा तसा व सर्व साहित्य घालून.. ढवळून.. वाफा आणाव्यात.. शिजल्यावर.. वरुन किंचीत तूप सोडावे.. पातळसर/घट्ट जशी हवी तशी भगर करावी. वयोवृद्धांना.. ऊसाचा रस जास्त प्रमाणात घालून पातळसर छानच!!! काल खूप वर्षानी वरील पदार्थ केला.. अन् आईची आठवण झाली.. तिच्या साठी मी .. तांदूळ मिक्सरमधून काढून.. तो रवा .. तुपावर परतून.. कधी ऊसाचा रस तर कधी आंब्याचा रस.. दूध घालून पातळसर पायसम् करत असे.. ती पण आवडीने सेवन करत असे. उन्नती गाडगीळ 🙏🌹

बंध.,बांध...,बंधन..,बेधुंद....💐

🙎🏻*बंध, बांध,बंधन,बेधुंद*  (हे शब्द वापरून लिही ग.. असे माझी सखी दीपाली ने सूचवले..छोटा प्रयत्न.)  बाल कैऱ्यांनी लगडलेला तो आम्रव्रुक्ष बघताच..तन शहारलं.. मन मोहरलं..वयाचं बंधन झुगारून.. मन गेले बाल्यात.. बेधुंद मनाने शिष्टाचाराचे बंध तटातट तोडले.. हळूच एका कलत्या फांदीवर झोका घेतला.. एका अनामिक धुंदीत.. हळूच एक दगड उचलला.. अन्... हूं... लेकुरवाळी फांदी कळवळली.. हेंदकाळली.. हुंदके देऊ लागली.. क्षणात भानावर आले.. तिला कुरवाळले.. थोपटले.. वारा पण बेधुंद झाला होता.. तिचे रसरशीत शरीर बघून चवताळला होता.. त्याच्या धसमुसळेपणाने.. बाळे टपाटप.. मातीत पडली..मी पटपट  ती रेशमी पदरात बांधली.. परत मम मनाचा बांध सुटला.. सामाजिक, नैतिक बंधन गळून पडले.. मोह जिंकला.. संस्कार हरले.. मी आनंदाने पळवून आणलेल्या.. झाडाला दुखवून आणलेल्या कैऱ्या कराकरा कापल्या.. भराभरा तिखटामीठात घोळल्या..चुरचुरीत खमंग फोडणी घातली. मस्त लोणचे केले..  पांढरा शुभ्र भात,पिवळंधमकं वरण,त्यावर कणीदार तूपाची धार अन् बाजुला करकरीत ,चमचमीत कैरी लोणचे.. मस्त बेत जमला.. तोंडात घास घालणार.. तो...

प्रसन्न पहाट..💐

🍀 प्रसन्न पहाट...चिमण्यांचा चिवचिवाट...लुकलुकते चिमण डोळे वाट बघत होते...मी रोजच्या प्रमाणे एका वाटीत तांदुळ व एकात पाणी भरुन त्यांच्या समोर ठेवले... अन् सुई दोरा घेऊन बसले... हासरी ...गोजिरी प्राजक्ताची परडी बघून मम मनाची दुरडी आनंदे भरली... सर सर शुभ्र फुले माळताना...निर्जीव दोरा सुद्धा रंगीत होत होता !!! काही नासकी...कुजकी...तुटकी...फुले वगळून मी हार गुंफले.... असच असत का जीवन ? जीवन मालिका साकारताना... काही आप्त... सुप्त तेने ...पाय ओढतात...बदनामी करतात... जळफळाटाने..तळतळाट देतात... स्वत:ची टिमकी मिरवताना...दुस-यास बदनाम करतात..चिखलफेक करतात... नवीन वर्षी ...नासकी ..कुजकी...फूलें ( व्यक्ति ) वगळून...जीवन माला... शुद्ध ...सुंदर ...प्रदूषण विरहीत ..बनवुया ... चिमण्या... उलट्या सुलट्या गिरकत..ठुमकत... तुरतुरत...फडफडत...डोळे मिचकावत ... चिवचिवत.. मातीत सांडलेले दाणे टिपत होत्या..जराही माती...खडेर...कचरा..न लागु देता... नीर क्षीर विवेकी वृत्ति ..कशी धरावी... अचूक काय ..कसे टिपावे...ते सांगत होत्या...हासत खेळत...पाठ...देत होत्या ... उन्नती गाडगीळ 🌷 🙏