बंध.,बांध...,बंधन..,बेधुंद....💐
🙎🏻*बंध, बांध,बंधन,बेधुंद* (हे शब्द वापरून लिही ग.. असे माझी सखी दीपाली ने सूचवले..छोटा प्रयत्न.)
बाल कैऱ्यांनी लगडलेला तो आम्रव्रुक्ष बघताच..तन शहारलं.. मन मोहरलं..वयाचं बंधन झुगारून.. मन गेले बाल्यात..
बेधुंद मनाने शिष्टाचाराचे बंध तटातट तोडले..
हळूच एका कलत्या फांदीवर झोका घेतला..
एका अनामिक धुंदीत..
हळूच एक दगड उचलला..
अन्... हूं...
लेकुरवाळी फांदी कळवळली.. हेंदकाळली.. हुंदके देऊ लागली..
क्षणात भानावर आले..
तिला कुरवाळले.. थोपटले..
वारा पण बेधुंद झाला होता..
तिचे रसरशीत शरीर बघून चवताळला होता..
त्याच्या धसमुसळेपणाने..
बाळे टपाटप.. मातीत पडली..मी पटपट
ती रेशमी पदरात बांधली..
परत मम मनाचा बांध सुटला..
सामाजिक, नैतिक बंधन गळून पडले..
मोह जिंकला..
संस्कार हरले.. मी आनंदाने पळवून आणलेल्या.. झाडाला दुखवून आणलेल्या कैऱ्या कराकरा कापल्या.. भराभरा तिखटामीठात घोळल्या..चुरचुरीत खमंग फोडणी घातली. मस्त लोणचे केले..
पांढरा शुभ्र भात,पिवळंधमकं वरण,त्यावर कणीदार तूपाची धार अन् बाजुला करकरीत ,चमचमीत कैरी लोणचे..
मस्त बेत जमला..
तोंडात घास घालणार.. तोच ..
आठवले.. ती आम्र डहाळी..डवरलेली..तिच्यावर अनिलाने केलेले अत्याचार.. ती आक्रोश करत होती.. मदत मागत होती.. मी एक स्त्री असून.. उघड्या डोळ्यांनी बघत होते..
कारण मी पण तिच्या बाळाच्या मोहात अडकले होते.. माझे पण नैतिक
बंधन गळून पडले..
माझी ना मी राहिले..
अस्सा हा वसंत.. वेडा करतो चराचराला..
रोज नव पालवी.. नवे रंग घेऊनी अवतरतो..खुणावतो.. मोहिनी अस्त्र अचूक रोखतो..बंधने तटातट तुटतात अन् बेधुंद मन धावते... रंगात रंगते..कोकिळ स्वरात न्हाते..रानगंधात वेडेपिसे होते...
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments
Post a Comment