टपली...💐
🙎🏻टपली... मंदिराबाहेर ठेवलेली पायताणं भिजली.. त्या बरोबर माझ्या अंतरातील मिजास... उफाळून जीभेवर आली.. हळहळली.. चडफडली.. अन् पुटपुटली... " छीsss आता माझे तलम.. मलमली मोजे ओले होतील ना ! " समोर.. फूटपाथवर.. मोडक्या.. विटक्या छत्रीखाली.. काटका.. फाटका.. तरूण व्रुत्तपत्र, पुस्तके विक्रेता.. पुढ्यात पुस्तके मांडून बसलेला.. क्षणात.. अवखळ वावटळ आली.. धारा न्रुत्य सुरू झाले.. त्याची छत्री उडाली.. वर्षाराणीने पुस्तकांना अम्रुत पान दिले... तो..काटका.. फाटका असून.. न चडफडता.. हासत.. हासत.. फाटक्या कपड्यात पुस्तके बांधून झाडाखाली.. दुकान थाटले.. Great !!! माझ्यातील मिजासीला.. गुर्मीला.. रडतराऊ व्रुत्तीला .. क्रुतीने .. टपली.. मारली !!! 🐤 असाच एकदा.. आडदांड.. द्वाड .. वारा.. गवाक्षातून.. भसकन.. आत शिरला.. अन् क्षणार्धात... माझ्या मौल्यवान.. फुलदाणीचा चक्काचूर झाला.. मी.. हुंदकत.. काचा गोळा करत राहिले.. इवली.. चिऊताई टकारून माझ्या कडे बघत होती.. वाऱ्याने पडलेले तिचे घरटे.. त्यातीलच .. काडी काडी.. वेचून.. माझ्या गच्चीत.. आडोशाला बांधत होती.. फडफडत होती.. चिवचिवत हो...