गरज आहे का?

गरज आहे का ???
काल श्री. गणेशाची सुबक मुर्ती मनात साठवत,मंदिरातून बाहेर पडले..
 ... वर्षा नर्तनानंतरचा मंद वारा.. ओलेती झाडे.. त्या तून ठिबकणारे थेंब
मनाला सुखवत होते...
मुलांच्या खेळाला उधाण आले होते..
.... ... हे आनंद क्षण वेचायला.. त्या मुलांच्यात मिसळायला... त्या अडीच वर्षीय बालकाची धडपड चालली होती...

....पण.. त्याची सुविद्य माता.. त्याला खेचत.. ओढत.. ट्यूशनला नेत होती.. त्याचा संपूर्ण असहकार होता.. तो हट्टून.. अडून बसला .. अन् ही माता..
... सकाळी तीन तास शाळा.. दुपारी ट्यूशन.. सायंकाळी.. संस्कार वर्ग..
या दुष्ट चक्रात त्याला अडकवत होती...

खरचं गरज आहे का...
बाल वयापासूनच.. सर्व गुण संपन्न तेचे ओझे त्या जीवावर लादायची?
... खरचं गरज आहे का...
सतत क्लास.. मधे अडकवून.. सुशिक्षित मनामागची असमर्थता दाखवण्याची ?
.. .. खरचं गरज आहे का... .. बालमन मोडून.. स्पर्धा.. इर्षा.. तुलना..चक्रात गुंतून..  वारेमाप पैसा.. खर्च करण्याची?

खरचं.. गरज आहे का...
मुलाला.. आपल्या तालावर.. नाचणारं खेळणं बनवण्याची ?
... खरचं गरज आहे का...
बाल वयापासूनच.. त्याला.. अमीष दाखवण्याची...???
अरे... बागेतली इवली कळी... तिचे फूल होण्यासाठी.. तीन चार दिवस वाट बघावी लागते..
... अगदी तसेच आहे...
किती आटापिटा केला.. दुसऱ्या वर्षी शाळेत घातले तरीही कोणतीही शाळा...
योग्य वेळी.. म्हणजे सहा पूर्ण झाल्यानंतरच पहिलीत घेणार...
तरी किती ताण द्यावा..
याचा विचार व्हावा..
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme