अंतरातील जखम ...💐
🍁अंतरातली जखम... 1977.. माझ्या नणंदेचे लग्न ठरले होते. आम्ही मदत म्हणून काही रक्कम दिली होती.. पण ती अपुरी ठरली.. आमच्याही लग्नाला 3वर्षे झालेली.. छोटे बाळ.. मी तेव्हा न कमावती.. मोठे खर्च.. पैसे कोठून जमवावे... मग.. .. मी माझ्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून माझ्या सासुबाईनाा दिल्या..... नणंदेचे लग्न पार पडले.... पण.. माझ्या लग्नात माझ्या आईवडीलांनी या बांगड्या मला दिल्या होत्या... आता वडील काय म्हणतील ? ही मला भीती वाटत होती. .आईला मी सांगितले.. पण.. वडिलांना... एक दिवस मी हळूच पण ठामपणे वडिलांना सांगितले.. " नाना , Sorry.. तुम्ही मला दिलेल्या सोन्याच्या बांगड्या मी नणंदेसाठी माझ्या सासुबाईंना दिल्या. मी सध्या कमावती नाही.. मी काय करणार होते? पण.. मी शिक्षण पूर्ण झाले की नोकरी करून, बांगड्या परत मिळवीनच !!!" माझे वडील.. खाली मान घालून डोक्यावर हात फिरवत विचारात बुडून गेले... मी अन् आई दोघीही मनातून घाबरलो. आई माझ्या कानात कुजबुजली.. " आता भडका उडणार!". *** *** काही क्षणातच वडील शांतपणे म्हणाले... "अग बांगड्याच ना? निर्जीव वस्तू ग......