अंतरातील जखम ...💐

🍁अंतरातली जखम...
1977.. माझ्या नणंदेचे लग्न ठरले होते. आम्ही मदत म्हणून काही रक्कम दिली होती.. पण ती अपुरी ठरली.. आमच्याही लग्नाला 3वर्षे झालेली.. छोटे बाळ.. मी तेव्हा न कमावती.. मोठे खर्च..
पैसे कोठून जमवावे...
मग.. ..
मी माझ्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून माझ्या सासुबाईनाा दिल्या..... नणंदेचे लग्न पार पडले....

पण.. माझ्या लग्नात माझ्या आईवडीलांनी या बांगड्या मला दिल्या होत्या...

आता वडील काय म्हणतील ?  ही मला भीती वाटत होती. .आईला मी सांगितले.. पण.. वडिलांना...

एक दिवस मी हळूच पण ठामपणे वडिलांना सांगितले..
" नाना , Sorry.. तुम्ही मला दिलेल्या सोन्याच्या बांगड्या मी नणंदेसाठी माझ्या सासुबाईंना दिल्या.
मी सध्या कमावती नाही..
मी काय करणार होते?
पण.. मी शिक्षण पूर्ण झाले की नोकरी करून, बांगड्या परत मिळवीनच !!!"
माझे वडील.. खाली मान घालून डोक्यावर हात फिरवत विचारात बुडून गेले...
मी अन् आई दोघीही मनातून घाबरलो. आई माझ्या कानात कुजबुजली..
" आता भडका उडणार!".
*** ***
काही क्षणातच वडील शांतपणे म्हणाले...
"अग बांगड्याच ना? निर्जीव वस्तू ग...
1948 मध्ये.. रझाकारांच्या धुमश्चक्रीत ...आमची शेती वाडी.. बैल जोडी जाळली गेली!!
भरले घर लुटून नेले...
आजही ते खिलारी बैलजोडी .. मी विसरु शकत नाही...माझा संताप संताप झाला.. तेव्हा पासून मी उद्ध्वस्त झालो..
आनंदाने मांडलेल्या खेळाचा एका क्षणात खेळखंडोबा झाला...

उन्नती , तू निदान शुभ कार्यासाठी बांगड्या दिल्यास.. देव तुझे भले करो...

मी..कुणाचे काय वाईट केले होते ग...
की.. माझी बैलजोडी.. माझ्या पासून न्यावी.. जाळावी... अन् हे मी चूपचाप  ऐकत रहावे...
वगैरे.. वगैरे...
अंतरात दाबून ठेवलेली जखम  शब्द रुपांनी भळभळत होती..

आई अन् मी पुतळे बनून ऐकत होतो...
वडिलांनी कोवळ्या वयात क्रौर्य पाहिले.. हिम्मतीने झेललं. .
त्यांच्या शब्दांशब्दातून..
त्यांचे मनोधैर्य.. प्रखर आशावाद.. व ..
देवाने भरभरून दिले, तरी दैव क्षणार्धात होत्याचं नव्हते करते.. खंत न करता.. तुटून न जाता..
मन खंबीर करायचे..
नाही कधीच रडायचे..
जीवनाशी सतत लढायचे।
ही त्यांची व्रुत्ती.. आज त्यांच्या जयंती निमित्त मी सर्वांसमोर मांडली !!!
आज त्यांच्या स्मृती ला विनम्र अभिवादन🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme