बडबडगीते..💐
🌷सविताच्या नातीच्या बारश्याला.. एक अंगाई गीत मी दिले होतेच.. ते सर्वांना आवडले.ती म्हणाली.. "'नेहमीची बडबडगीते नकोत. .. उन्नती.. खास,खास तू लिहिलेली बडबडगीते दे.विशेषतः.. मालीश करताना, आंघोळ घालताना.. तिच्याआग्रहाखातर.. मी लिहिलेली बडबड गीते.... 1) मालीश करताना.. सूर्या..सूर्या.. तेज दे.. वाऱ्या.. वाऱ्या.. वेग दे.. गणराया.. बुद्धी दे..वृद्धी दे... माझ्या बाळाला मोप आयुष्य दे.. .. उन्नती गाडगीळ💐 2) सूर्य उंच गगनात.. रश्मी नाचे अंगणात। बाळा.. देती.. ऊन पाणी.. सु--मने गाती... गोड गाणी। उन्नती गाडगीळ🌹 3)जय गंगे... जय गोदाई.. जय यमुने..जय कृष्णाई.। नमन करते तुला.. सुखी ठेवी मम बाळा। उन्नती गाडगीळ🌹 4) एक सुंदर परी.. . आली माझे घरी.. परांचं पांघरूण बाळावरी.. हळूच घेते..पापा.. अन्.. म्हणते.. '"आता झोपा।" उन्नती गाडगीळ🌹 5)झू..झू.. झोपाळा.. झुलवी.. बाळ गोपाळा.. घेऊनी.. खांद्यावरी.. घेई.. उंच.. भरारी। उन्नती गाडगीळ🌹 6) जाहल्या ग तिन्ही सांजा.. देवापुढे ल...