बडबडगीते..💐

🌷सविताच्या  नातीच्या बारश्याला.. एक अंगाई गीत मी दिले होतेच.. ते सर्वांना आवडले.ती म्हणाली..

"'नेहमीची बडबडगीते नकोत. ..
उन्नती.. खास,खास तू लिहिलेली बडबडगीते दे.विशेषतः.. मालीश करताना, आंघोळ घालताना.. तिच्याआग्रहाखातर.. मी लिहिलेली बडबड गीते....

1) मालीश करताना..
सूर्या..सूर्या.. तेज दे..
वाऱ्या.. वाऱ्या.. वेग दे..
गणराया.. बुद्धी दे..वृद्धी दे...
माझ्या बाळाला मोप आयुष्य दे.. ..
उन्नती गाडगीळ💐

2) सूर्य उंच गगनात..
रश्मी नाचे अंगणात।
बाळा.. देती.. ऊन पाणी..
सु--मने गाती... गोड गाणी।
उन्नती गाडगीळ🌹

3)जय गंगे... जय गोदाई..
     जय यमुने..जय कृष्णाई.।
      नमन करते तुला..
      सुखी ठेवी मम बाळा।
उन्नती गाडगीळ🌹

4) एक सुंदर परी..
   . आली माझे घरी..
     परांचं पांघरूण बाळावरी..
हळूच घेते..पापा..
अन्.. म्हणते.. '"आता झोपा।"
उन्नती गाडगीळ🌹

5)झू..झू.. झोपाळा..
झुलवी.. बाळ गोपाळा..
घेऊनी.. खांद्यावरी..
घेई.. उंच.. भरारी।
उन्नती गाडगीळ🌹

6) जाहल्या ग तिन्ही सांजा..
देवापुढे लावा.. दिवा..
कुरकुरे..बाळराजा..
मीठमोहऱ्या उतरवा।

7) चांदण्यांचं अंगड घातलय अंगात..
चांदोबा शोधतोय चांदणी नभात।
बाळं.. खुदुखुदु हसतयं गालात..
चांदोबा फुगून दडला ढगात।
उन्नती गाडगीळ

8) पान करते सळसळ..
      पाणी वाजे खळखळ..
        वारे वाहे.. सुss ई..सुssई..
अन् बाळ रडे.. आई..आई।
उन्नती गाडगीळ🌹

9) ये ग ये चिऊताई खेळायला..
मणी देते मोजायला..

ये रे ये.. काऊ खेळायला..
साबण देते.. स्नानाला।

ये रे ये.. हत्ती.. खेळायला..
टब.. देते.. डुंबायला।

ये रे ये माकडा.. खेळायला..
ढोलकं देते. . बडवायला।

ये रे ये.. भू--भू खेळायला..
बाबागाडी देते.. फिरायला।

ये ग ये हम्मा खेळायला..
मँगी देते.. चरायला।😀

ये ग ये मनीमाऊ खेळायला..
माऊस देते.. खेळवायला।☺

ये रे ये राघू खेळायला..
मोबाईल देते बोलायला।😊

ये रे ये टेडी खेळायला..
झुला देते.. झुलायला।

सारे मिळून खेळुया..
आजीच्या कुशीत झोपुया।

धन्यवाद💐
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme