Posts

Showing posts from May, 2018

नील..मखमली.. दुलईत..💐

नील मखमली दुलईत ... उषेला लागली डुलकी । बाळ रवि ने रांगत .रांगत उघडली सोनेरी खिडकी । रश्मि ने नाचत नाचत ... घेतली धरेवर गिरकी । अनिलाने शीळ घालत .... कळ्यांची घेतली फिरकी । फुलांनी खुद्कन् हासत ... पहाटेवर मारली टिचकी । उन्नती गाडगीळ 🙏

सूर्य.. गेला अस्तास...💐

सूर्य गेला अस्तास ... वाट झालीया धूसर ... डोळा काही दिसना ... साजण माझा येईना ।    जीव माझा कासावीस ...     मनी एकच ध्यास ...     वेळ सरता सरना ...     साजण माझा येईना  । सुस्त झाली धरा ... चंद्र एकला हासरा ... परि मोद मना वाटेना ... साजण माझा येईना  । उन्नती गाडगीळ 🙏

रसिक ता...💐

🤰🏻माझी नात.. कुरकुरत होती.. , " ए. आजी.. बघ ना ग.. केवढा.. अभ्यास.. कसा करणार ग.. सतत सारे कटकट करतात ,बघ !" --- मी तिला जवळ घेऊन म्हणाले, " अग. आज बट्रांड रसेल यांचा जन्म दिन !!! अवघ्या 18व्या वर्षी.. त्यांनी.. जर्मन, फ्रेंच, इटालियन, ग्रीक, लँटीन,इ. अनेक भाषा आत्मसात केल्या.. रोज 5तास सतत लेखन. व 4तास सतत वाचन.. अखंड चालू होते. त्यांचा.. एकेक .. उच्चार.. कानात साठवण्यासाठी.. त्यांच्या भाषणाला..कमीत कमी 30000 लोक उपस्थित असत.. अन् ते सलग दोन तास ओघवती शब्द माला गुंफत !इतके ते लोकप्रिय होते. ते.. गणिती, विचारवंत, तत्त्वज्ञ, प्रज्ञावंत, मानसशास्त्रज्ञ ,वक्ता, शिक्षक, लेखक, समाजसुधारक.. किती.. किती .. सांगू ? बेटा... अनेक विद्या.. कला प्राप्त करण्यासाठी व्यासंग हवाच ! वाचन.. लेखन.. चा बाऊ न करता.. तू.. त्याच्या अंतरात शीर.. मग.. बघ.. तुला जाणवेल..की..प्रत्येक विषयाचा अगदी छोटासा.. तुकडा.. आत्मसात करायचा आहे.. तुमचे एकही पुस्तक.. 500पानी नाही.. अन् कोणताच पेपर.. एकावेळी..100मार्कांहून जास्त नाही !!! आपण .. रसेल.. होणे शक्य नाही.. पण रसिक तर होऊया.. प्रत्येक वि...

Bad boys...💐

👭श्री. महेशजींचा Bad boys.. या विषयी ह्द्य लेख वाचला. या मुलांना आपण.. रोडरोमिओं.. मवाली.. टपोरी.. असे संबोधतो. .. पण.. त्याच मुलांच्यातील धीटाईने मदत करण्याची वृत्ती मला आढळली.. एक प्रसंग.. ... माझी मुलगी असेल तेव्हा 16..17 वयाची!!! मला म्हणाली, " रपरप पाऊस पडतो आहे.. काल भजी झाली, आज खमंग थालीपीठे कर. मी कांदा, मेथी चिरुन देते.'" मी म्हणाले, " अग भाजणी गिरणीत आहे, बाई उद्या दळण आणतील. मग उद्या करुया." लगेचच म्हणते कशी.. " मी आणते दळण!तू थालीपीठ कर! " मला खूपच कौतुक वाटले. दळण आणायला मी मुलींना कधीच सांगितले नाही!  एक मोठा डबा कमरेवर ठेवून ,घरभर ठुमकत ,चालत राहिली.. म्हणाली.. "So... Thrilling!!!" घरभर डबा वाजवत ,हासत, खिदळत, नाचणे चालू होते.. मुली घरात असल्या की घर ही घुंगरू बांधते.. नाचत रहाते खरे!!! मग हळूच म्हणाली.. " मी पिशवीतून डबा आणणार.. " ती गेली.. मी बाकी कामात व्यस्त.. मुंबई चा पाऊस.. बेशिस्त.. अस्ताव्यस्त!!! कोसळत होता.. अर्ध्या तासाने ती आली.. नखशिखांत चिखलाने,घाणीने माखलेली..रडवेली ....

चि.बटूस... स.आशीर्वाद💐

👨‍🌾चि. बटूस.. सप्रेम आशिष.. आज.. तुझी मुंज..व्रतबंध.. म्हणजे.. शोडषोपचारे पंचमहाभूतांची पूजा करून.. वैश्विक नाते जोडणे.. अध्ययन काळात.. संयम व स्वावलंबन धारण करणे. नादमय श्वास व तेजोमय ध्यास घेऊन क्षण न् क्षण सुवर्ण मय कर ! शूभमस्तु दिवे दिवे। हे बाळा.. आजपर्यंत तू मात्रुमुखातून शिकत होतास.. आता.. गुरु मुखातून अनंत भाषा..आत्मसात कर.. तंत्र..यंत्र.. विज्ञान व गणिताचा सखोल अभ्यासासाठी.. तुझी स्मृती व श्रूती जाग्या ठेव ! प्रुथ्वीची वत्सलता.. आपची प्रवाहीतता.. तेज ची दिव्यता.. वायुची चपळ ता.. अन् आकाशाची भव्यता तुझ्या त वसती करु दे! अन् त्यासाठी गायत्री मंत्र जप.. बाळा! संयम..सात्तत्य..अन् निर्भयता.. हा मंत्र देतो ! आहार..विहार..व्यायाम.. त्रिसुत्रीचा समन्वय साध.. आरोग्यं धनसंपदा.. लक्षात ठेव! विचार अन् विवेक वर्धित होण्यासाठी.. वाचन.. जरुरी.. स्थल..काल.. रान.. जल.. पुस्तक.. मानव..अन् त्यातील मन.. वाचन .. व्यक्ती मत्वास वैभवशाली बनवते.कला..वादन..गायन.. खेळ..चित्र..छंद इ. पदर जीवन वस्त्राला उठावदार बनवतात.. ज्ञानाची भिक्षा मागण्यास लाजू नकोस.. भिक्षा म्हणजे भिक नाही.. तर वैचारिक उंच...