नील..मखमली.. दुलईत..💐

नील मखमली दुलईत ...
उषेला लागली डुलकी ।
बाळ रवि ने रांगत .रांगत
उघडली सोनेरी खिडकी ।
रश्मि ने नाचत नाचत ...
घेतली धरेवर गिरकी ।
अनिलाने शीळ घालत ....
कळ्यांची घेतली फिरकी ।
फुलांनी खुद्कन् हासत ...
पहाटेवर मारली टिचकी ।
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme