Posts

Showing posts from February, 2019

खुळखुळा..💐

♥खुळखुळा.. व्हँलेंटाईन /न्यूइयर/outing/dating.. कारणे कोणतिही असोत..स्वैराचार.. मौजमजा.. धुंदीत मस्तीत जीवन जगणे या एकाच विचाराने पछाडलेल्या तरुणी..अनेक व्यसनांच्या गर्तेत अडकत आहेत. संतती नियमनाच्या गोळ्या सहजपणे मुली सेवन करत आहेत... तरीही कुमारी मातांची संख्या दिसामासाने वाढतच चालली आहे.आणि.. गर्भ नष्ट करण्यात अपयश आले.. तर..नवशिशु कचराकुंडीत/मंदिरात/जलाशयात/जंगलात...अगदी सहज टाकत आहेत. आपल्याच शरीराचा खुळखुळा करत आहेत. ***दुसरे चित्र.. विवाहित स्त्रिया अगदी सुशिक्षित हं.. घरात.. सण, पूजा, पार्टी,सहली, समारंभ... काही असेल तर .. सहजपणे मासिक धर्म लांबवण्याच्या गोळ्या घेत आहेत. कौतुकाने.. आनंदाने.. "गणपती पार पडले बाई. मधेच कडमडली नाही पाळी. गोळ्या घेतल्या होत्याच" वगैरे फुशारकी.. *तिसरा प्रसंग* . हा तर खूपच गंभीर आहे... सुखी जीवनाची सुरुवात च मुळी.. गैरवापराने.. " 25 वर्षाची उच्च शिक्षीत नववधु बिनधास्त .. जरा पाच वर्षे जाऊदे.. काय घाई.. बाळासाठी अजूनही भरपूर पैसे साठवून.. मग.. चान्स घेऊ... नुसती म्हणून थांबत नाहीत.. तर नियमन करतात.. खरं म्हणजे....

मैत्र जिवांचे..💐

* आनंद वार्ता *  मित्रहो.. आज .. 5फेब्रुवारी 19च्या ..*म. टा*  पुणे Times मधे माझा.. *मैत्र जिवाचे* हा अगदी छोटा लेख आला आहे. तोच लेख मी आज आपणा सर्वासाठी येथे देत आहे..💐 *जब वी मेट* *** ***मैत्र जिवांचे*** *** * कराची * हुन फरीदाचा फोन.. न चुकता सणांना शुभेच्छा देणारी.. माझी पाकिस्तानी मैत्रीण!!! "नमष्कार ! सह हास्याचा खळखळाट. Happy Sankranti ! कैसे है.. आप? और हमारे भाईजान?" शब्दा शब्दातून आदब.. आदर व्यक्त होत होता. विचारपूस झाल्यावर म्हणाली.. " बहनजी,आपने सिखाया हुआ *थालीपीठ* कल.रात फिर बनाया। मजा आ गया। बहुत..बहुत शुक्रिया! और वो मिरचीका आचार.. (खराच्या मिरच्या) ओहो.. उँगलिया चाटते रहा .. और आपको दुवाएँ देता रहा सारा परिवार.!!!वगैरे.फोन ठेवला.. पण.. मनात फेर धरला.. फरिदाच्या प्रथम भेटीने.. 2015 चा आँगस्ट मास .. *लाँस एंजेलिस* विमानतळावर .. आम्हाला see off करायला आलेल्या माझ्या जावयांना व नातवाला bye केले. अन् इतक्या वेळ थोपवलेले अश्रू सरसर ओघळले.. माझ्या समोरच्या बाकावर बसलेली .. *ती*.. पटकन माझ्याजवळ आली. पाठीवर हात ठेवून म्हणाली.. '...