मैत्र जिवांचे..💐
* आनंद वार्ता *
मित्रहो.. आज .. 5फेब्रुवारी 19च्या ..*म. टा* पुणे Times मधे माझा..
*मैत्र जिवाचे* हा अगदी छोटा लेख आला आहे.
तोच लेख मी आज आपणा सर्वासाठी येथे देत आहे..💐
*जब वी मेट*
*** ***मैत्र जिवांचे*** ***
* कराची * हुन फरीदाचा फोन.. न चुकता सणांना शुभेच्छा देणारी.. माझी पाकिस्तानी मैत्रीण!!!
"नमष्कार ! सह हास्याचा खळखळाट. Happy Sankranti ! कैसे है.. आप? और हमारे भाईजान?"
शब्दा शब्दातून आदब.. आदर व्यक्त होत होता. विचारपूस झाल्यावर म्हणाली..
" बहनजी,आपने सिखाया हुआ *थालीपीठ* कल.रात फिर बनाया। मजा आ गया। बहुत..बहुत शुक्रिया! और वो मिरचीका आचार.. (खराच्या मिरच्या) ओहो..
उँगलिया चाटते रहा .. और आपको दुवाएँ देता रहा सारा परिवार.!!!वगैरे.फोन ठेवला..
पण.. मनात फेर धरला.. फरिदाच्या प्रथम भेटीने..
2015 चा आँगस्ट मास ..
*लाँस एंजेलिस* विमानतळावर .. आम्हाला see off करायला आलेल्या माझ्या जावयांना व नातवाला bye केले.
अन् इतक्या वेळ थोपवलेले अश्रू सरसर ओघळले..
माझ्या समोरच्या बाकावर बसलेली .. *ती*.. पटकन माझ्याजवळ आली. पाठीवर हात ठेवून म्हणाली..
'"शांत रहिये। आपका पोता है क्या वो.. कितना मासूम है। "
विचारत.. मनाची तार छेडली..सूर जुळले..
*ती*.. उंच, निटस,सावळी,भडक मेकअप,चमचमते वस्त्र,लखलखते अलंकार,
खळखळते हास्य..
प्रथम दर्शनी मला ती सिंधी वाटली. पण.. तिने सांगितले.. *हम पाकिस्तानी है।*....
दोन तास दोघींच्या गप्पा रंगल्या.. हवा..पाणी, फँशन,मेहेंदी,पोषाख, आजकलके बच्चे, नवतंत्र,लता मंगेशकर, सुनिल गावसकर, इम्रान खान,भुट्टो.. सर्व विषयांवर चर्चा केली, पण सर्वात जास्त महत्त्व.. *खानपान*....
या विषयावर आम्ही भरभरून बोललो.
नुसते बोललोच नाही, तर तिला मी.. थालीपीठ कसे करावे हे सांगितले. तिने मला एक कागद दिला ..
"इसपे लिख दिजिये।"
तो कागद छोटा होता, म्हणून.. मी माझ्या डायरीतील एका पानावर ... हिंदी तून सप्रमाण कृती लिहून तो कागद कापून तिला दिला.
तो कागद तिने ह्रदयाशी धरला. व म्हणाली..
'" बहनजी, आपका हस्ताक्षर हम उपहार समझकर हमारे गहनोंके डिब्बेमें रखेंगे। जिंदगीभर संभालेंगे। बहुत शुक्रीया।"
आणि जेव्हा.. जेव्हा ती मी शिकवलेले थालीपीठ व खाराची मिरच्या करते ,तेव्हा मला फोन/मैसेज जरूर जरूर करते.
खरचं.. मैत्रीला सीमारेषेचे सुद्धा बंधन नसते...
मैत्र बंध जुळते.. मनामनाचे!!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment