मन संवाद..💐
🍀 धाड धाड गाड़ी चालली आहे ... लुकलुकते दिवे.. पळती झाडे.. मंद धुंद वारे..समोर.. बर्थवर केतकी निजली आहे ... निद्रावस्थेत स्त्री जास्तच मोहक दिसते... शतदलांनी खुलते.. शांत.. तृप्त! केतकी .. माझी सहकारी .. दोघेजण conference ला जात आहोत मद्रासला ! कंपनी ने first class fare दिले ... व अशी सुंदर सोबत दिली.. छीss छीss मी एक पुरुष म्हणून असा विचार करणे योग्य नाहीं ... तर विवेकी विचार ... हे मुर्खा. . तिचा देह नाहीं तर तिच्यातील बुद्धि सोबत दिली आहे !!! * सवलत , सोय, बक्षिस व सोबत .. ही तुमच्या कर्तव्य निष्ठा सेवेची पावती असते ! भ्रष्टतेची संमती नसते * स्त्री बुद्धि चा वापर करुन कंपनी नावारुपास आणणे ही ... सृष्टता... नैतिकता ! अन् स्त्री च्या देहाचा वापर करुन दोन कुटुंबे उद्धवस्त करणे ही भ्रष्टता ! आज ती सुद्धा एका ध्येयाने ... मुलाना सोडून आली आहे .. आत्मविश्वासाने... तर संस्काराला जागून तिचा रक्षक हो ! भक्षक नको . !" असा हा मनसंवाद प्रत्येकाने केला तर नैतिक भ्रष्टाचार नष्ट होईल . उन्नती गाडगीळ 🙏