सैनिकची दिवाळी ....💐
🌷 सैनिकाची दिवाळी ...
दारात रांगोळी, लखलखती पणत्या...
ऊरात धडकी.. ओलावती पापण्या ।
पती सज्ज .. सशस्त्र .. सीमेवरी ...
टांगती तलवार ... डोईवरी ।
चहुकडे.. दुर्गम हिमकडे ...
त्वेषाने लढती.. सैनिक निधडे ।
बाळासाठी रांधते मी .. पुरणपोळ्या...
देशासाठी .. झेलती ते.. विखारी गोळ्या ।
अंगणी खेळे माझे गोजिरे तान्हुले..
रणांगणी जवान रक्त सळसळे ।
तेथे ना गोडधोड.. ना झकपक ...
पाठी ..' रुकसुक '! मनी... रुखरुख ।
चिऊताई, देते तुला इवला दाणा ...
' विजयी परतावे !' सांग माझ्या साजणा .
निश्चये पुसुनी डोळ्यातले पाणी ...
सतत वाट पाहते... तुझी साजणी !!!
उन्नती गाडगीळ 🙏
दारात रांगोळी, लखलखती पणत्या...
ऊरात धडकी.. ओलावती पापण्या ।
पती सज्ज .. सशस्त्र .. सीमेवरी ...
टांगती तलवार ... डोईवरी ।
चहुकडे.. दुर्गम हिमकडे ...
त्वेषाने लढती.. सैनिक निधडे ।
बाळासाठी रांधते मी .. पुरणपोळ्या...
देशासाठी .. झेलती ते.. विखारी गोळ्या ।
अंगणी खेळे माझे गोजिरे तान्हुले..
रणांगणी जवान रक्त सळसळे ।
तेथे ना गोडधोड.. ना झकपक ...
पाठी ..' रुकसुक '! मनी... रुखरुख ।
चिऊताई, देते तुला इवला दाणा ...
' विजयी परतावे !' सांग माझ्या साजणा .
निश्चये पुसुनी डोळ्यातले पाणी ...
सतत वाट पाहते... तुझी साजणी !!!
उन्नती गाडगीळ 🙏
Comments
Post a Comment