Posts

Showing posts from August, 2018

An Eve with Dad

♥An eve with Dad ! समा ला बाबाबरोबर सोडून तिची आई मैत्रीणीकडे गेली. पूर्ण संध्याकाळ बाबा बरोबर!!!W0W..धम्माल! पण आज बाबा म्हणाला.. "समा , आधी H.W. मग.. होटेल!!!" इतक्यात वीज गेली. काळोख दाटला. समा मुसमुसत.. "आता H.W. कसा करणार? त्यातून आज दशांश पद्धती(decimal sign) शिकवली. खूप खूप अवघड आहे रे.. बाबा तिला जवळ घेत.. "हे बघ समा, जीवनाची वाटचाल करताना कर्मापासून ढळायचं नाही. तेजाने साथ सोडली तर समई ज्योती आहे.. तिची आरती करायची. मेणबत्ती ची वात.. तिची साथ घ्यायची. वीज नाही तर आपण वीज व्हावे.. मेंदूतील लिंबीक सिस्टीम मुळे भावनांचे नियंत्रण होऊ शकते. भावना बदलल्या तर रसायने बदलतात.. सकारात्मक .. पर्यायी मार्ग शोधून काढण्याची मेंदूला सवय लावणे महत्त्वाचे. चला.. समाताई..ही बघा.. बाबाने पक्षाच्या आकाराची सुबक मेणबत्ती टेबलावर ठेवली. मंद प्रकाश खोलीत पसरला. .. बाबा तिचा उजळता चेहरा निरखत म्हणाला.. "समा, एक मेणबत्ती अनेक वस्तू उजळते बघ. तसेच हे दशांश चिन्ह .. ज्या आकड्यांच्या मागे उभे राहील त्याची किंमत दशपटीने वाढवते !!! बाबाच्या या सहज,स...

पूजन..कथन 💐

💥पूजन..कथन.. पौर्णिमेचा मुहूर्त साधून श्री. सत्यनारायण पूजा केली. आणि एकेक स्मरण मोती ओघळू लागले.. 1979म़धे माझे सासू सासरे अहमदाबादला आमचेकडे आले होते.आम्ही सत्यनारायण करायचे ठरवले. परप्रांतात  गुरूजी अचानक मिळणे अवघड. सासऱ्यांनी फर्मान काढले.. ."'उन्नती,तू संस्कृत शिकलेली.स्वच्छ उच्चार तर तू पूजा सांग.दत्ता करेल !!!" अरे बापरे !!!कधीच असे काही केले नाही. अन् सासऱ्यांसमोर पूजा सांगणे? ते *टेन्शन *टपकन् टपकलं ! मी नेटानं त्याला ढकललं! आणि श्री. सत्यनारायणाची पोथी हाती घेतली. आदल्या वर्षी मी एका गुरजींना स्वहस्ते लिहून दिली होती.त्यामुळे शब्द मनावर ठसल होतेच. सतत दोन दिवस पोथीचे वाचन केले. अवजड, अवघड शब्दांचे पुनर्वाचन केले. वाचेला घासून पुसून वाणी लख्ख केली .स्वच्छ उच्चार येऊ लागले. प्रत्येक शब्दात नाद हा असतोच. त्याला तालासुरात गुंफायच ,त्याचा तोल राखणे,लय निर्माण कयणे,चढ..उतार,वळणे,आवर्तनातून उत्पन्न होणारी  कंपने ...लहरी.. या सर्वांनासुसूत्र बांधून श्रोत्यांच्या श्रृती तृप्त करणे,आणि स्वमन अंतर्मुख होणे.. श्लोकाचा सुगम, सुबोध अर्थ ,विवेचन, मग सुरस कथा...

कवडसा....💐

#कवडसा... सततच्या रपरप पावसाने श्रावण रूसला होता. तेजोगोल झाकळला होता. भरदुपारी अंधार पसरला .होता.झाडे निमूट न्हात होती. वारा शांत होता. मी झुल्यावर झुलत गुणगुणत .. एकांकिकेसाठी गीत रचना करत होते. कुंद वातावरणात शब्द सुद्धा अडून बसले होते.. कागदावर उतरत नव्हते... अन् अचानक काळ्या कबऱ्या ढगाला ढुशी मारून ,तप्त सूर्य पुढे आला.. रागाने लाल झाला, श्रावणाचा कान धरून.. त्याला पुढे धरेवर पाठवले..क्षणार्धात सहस्त्र करांंनी.. पिवळे कोवळे तांबूस किरण.. खेळू लागले... आणि.. गवाक्षाच्या इवल्या फटीतून .. एक चौरस,गोलसर,ओलसर,लोभस,तेजस *कवडसा* कधी माझ्या भाळी बिंदी ,कधी गालाची खळी बनून, कधी दंडाची वाकी ,कधी मनगटाचे कंगन, तर कधी उंगलीचे रिंगण बनून मला सालंकृत करत .. हासत खेळत ,रुंजी घालत राहीला. ओहो.. त्या क्षणी मी जगातील सर्वात ऐश्वर्य संपन्न स्त्री झाले !!! माझे मनपाखरू फडफडत बाल्यात गेले.. झरोक्यातून असे कवडसे भिंतीवर, छतावर, पडत असत ,आम्ही सर्व मुले उंच उंच उड्या मारून त्यांना पकडण्याचा खेळ खेळायचो. .. पण.. अंह..ते कधीच हाती लागले नाहीत. जणू म्हणत असावेत.. आकांक्षा उंच ठेवा.. ध्येय उच्च...

अभिमानास्पद..💐

♥अभिमानास्पद!!! माझी लेक अमेरिकेत राहते.तेथे अर्थ, नामक मायाआहे.पण सेवेसि सदा तत्पर.. असा सेवकवर्ग मिळत नाही.हे सर्व श्रृत आहेच. रविवारी तिच्या सखीकडे वास्तुशांती होती.30/35पान जेवणार !म्हणून माझी लेक सतत दोन दिवस मदतीला जात होती. शनिवारी दोघींनी मिळून 3किलो पुरण शिजवून यंत्राच्या साह्याने वाटून ठेवले. दोन,भाज्या निवडून चिरून ठेवल्या.गुरुजींनी सांगितलेली सारी तयारी करणे, घरसजावट हे सर्व केले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तीघींनी मिळून पुरणपोळी सह साग्रसंगीत स्वयंपाक 30माणसांचा केला.. मला तरी बाई कौतुक वाटले.. दोघींचे ! माझ्या लेकीला माहेरी वा सासरी कधीच इतके कष्ट उपसावे लागले नाहीत ,त्या पार्श्वभूमीवर कौतुक व अभिमान वाटतो. माझ्या ओळखीत अनेक मुली अमेरिकेत आहेत. सर्वचजणी रीतसर पुरण..वरण करतातच असे नाही. फक्त नैवेद्य पुरणाचा दाखवून बाकी सर्व पाहुण्यांना..थोड्या पोळ्या, सँलड , भाताचे प्रकार, उसळ,सँडविच, सूप,मिठाईअसे ठेवतात. हे पण मी बघीतले आहे. आमच्या एअरपोर्ट काँलनीत आम्ही स्त्रिया एकत्र जमून असा स्वयंपाक करायचो.नाही असे नाही. पण आज भारतात आपण किती नोकरावर अवलंबून आहोत...

मैत्री...💐

#मैत्री... मी F.B.वर पाच वर्षे लिहीते आहे. मला तरी आभासी दुनिया वाटत नाही. विविध क्षेत्रातील व्यासंगी,हुशार, कर्तृत्ववान, लाघवी,मनमिळाऊ सुह्रद मला येथे मिळाले. प्रत्येकाकडून काही तरी शिकत राहीले, वेचत राहिले. मुख्य म्हणजे आजारपणाने आलेल्या.अपंगत्वामुळे (पेनाने लिहीणे अवघड झाल्यामुळे)लेखन प्रवाह खंडित झाला होता. पण.. नवतंत्राने उंगलीच जाहली लेखणी.. मन आनंदले..मनातील विचार f.b. /w.a.वर उमटत गेले.. अनेकांच्या मनात टिपले गेले..मित्र जुळत गेले. संवाद साधताना विषय मिळत गेले... लेखन उतरत गेले.. कुणाला एकांकिका हवी,तर कुणाला गीत,कविता हवी.. लेख हवा.तर.कुणाला पदार्थ.. मी व्यस्त राहिले.. कल्पना कृतीत उतरल्या...व्यक्त होत गेले...स्नेह साधत..स्नेही सांधत राहिले.. त्यातूनच .. अनुबंध Short film.. दिर्घांक... वगैरे घाट..चढणे.. वळणे या फे.बु.च्या दर्यात घेतली. मुख्य म्हणजे मनात साचून राहिलेले सत्य/मरगळ/अनुभव/अनुभूती/आनंद/दु:ख इ. भावभावनांचा गोफ तयार करून तो W.A./ F.B. मित्रपरिवार समोर उकलणे.मित्रांसोबत मन मोकळे करण्यासाठी हा प्रभावी मंच आहे. त्यामुळे अंतर्मनात साचून राहिलेले दु:ख वाटले ज...