An Eve with Dad
♥An eve with Dad !
समा ला बाबाबरोबर सोडून तिची आई मैत्रीणीकडे गेली. पूर्ण संध्याकाळ बाबा बरोबर!!!W0W..धम्माल!
पण आज बाबा म्हणाला..
"समा , आधी H.W. मग.. होटेल!!!"
इतक्यात वीज गेली. काळोख दाटला. समा मुसमुसत..
"आता H.W. कसा करणार? त्यातून आज दशांश पद्धती(decimal sign) शिकवली. खूप खूप अवघड आहे रे..
बाबा तिला जवळ घेत..
"हे बघ समा, जीवनाची वाटचाल करताना कर्मापासून ढळायचं नाही.
तेजाने साथ सोडली तर समई ज्योती आहे.. तिची आरती करायची. मेणबत्ती ची वात.. तिची साथ घ्यायची.
वीज नाही तर आपण वीज व्हावे.. मेंदूतील लिंबीक सिस्टीम मुळे भावनांचे नियंत्रण होऊ शकते.
भावना बदलल्या तर रसायने बदलतात..
सकारात्मक .. पर्यायी मार्ग शोधून काढण्याची मेंदूला सवय लावणे महत्त्वाचे.
चला.. समाताई..ही बघा..
बाबाने पक्षाच्या आकाराची सुबक मेणबत्ती टेबलावर ठेवली.
मंद प्रकाश खोलीत पसरला. ..
बाबा तिचा उजळता चेहरा निरखत म्हणाला..
"समा, एक मेणबत्ती अनेक वस्तू उजळते बघ. तसेच हे दशांश चिन्ह ..
ज्या आकड्यांच्या मागे उभे राहील त्याची किंमत दशपटीने वाढवते !!!
बाबाच्या या सहज,सुलभ पद्धतीने समा चित्कारली..
O! Great!!!
डेसिमल सम्स करण्याचा तिला नादच लागला..
बाबा अन् लेक नात्यात विश्वासाचं चांदणं फुललं होतं.
भौतिक साधनांच्या पेक्षा कर्म .. मोठे आहे हे समजले. अभाव असला तरी मेंदूला चालना देऊन पर्याय शोधून प्रभाव निर्माण करणे आवश्यक.
हा संस्कार घडला.
तेव्हा पासून समाच्या घरात.. महिन्यातून एक दिवस..
*वीजेविना दिवस * साजरा करतात. पण कोणतेच कर्म टाळत नाहीत.
त्यामुळे मूले यांत्रिक न बनता..मेंदू बधीर, सुन्न न बनता.. निसर्गाभिमुख होऊन.. हस्त कौशल्ये आत्मसात होतात.
चला.. एक... एक.. दिवस एकेक यंत्र बंद ठेवून बघा बर.. मुलांच्या क्षमतांचा ,आढावा घेऊन मला जरूर कळवा ह़ं !!!👍
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment