Posts

Showing posts from January, 2019

हा.. तिरंगा..💐

🇪🇬 हा तिरंगा.. हरित शिवारातुनी.. केशरी पातीतुनी... धवल पुष्पातुनी.. डौलाने फडकतो... हा.. तिरंगा.. सृष्टी गीत गातो !!! मातीच्या कणाकणातुनी.. खळखळत्या झऱ्यातुनी..   सळसळत्या धानातुनी.. आनंदे नाचतो.. हा .. तिरंगा.. समृद्धी गीत.गातो!!! वीरांच्या बलिदानातुनी.. स्वातंत्र्य गीतातुनी.. कृष्णाच्या गीतेतुनी.. बुद्धीने झळकतो। हा.. तिरंगा.. संविधान गीत गातो !!! सीमेच्या रेषा . रेषातुनी.. जवानांच्या श्वासाश्वासातुनी.. रक्ताच्या थेंबाथेंबातुनी.. सळसळतो। हा .. तिरंगा.. स्फूर्ती गीत.गातो !!! विज्ञान कुशीत शिरूनी.. अमोघ क्षेपणास्त्रे भेदुनी.. परदेशीय उपग्रह सोडुनी.. अवकाश व्यापतो। हा..तिरंगा.. वैश्विक गीत गातो!!! संस्कृतीची कास धरूनी.. संस्कारांची माला लेऊनी.. यंत्राच्या आरीआरीतुनी.. सर्वश्रेष्ठ ठरतो। हा .. तिरंगा.. स्वातंत्र्य गीत गातो!!! उन्नती गाडगीळ🌹🙏

हौस..💐

👩‍🎤हौस.. मी सूर्य स्नान घेत घेत,झाडांना पाणी देत होते. खालून जोरदार हाँर्न वाजला आणि पाठोपाठ.. डोक्याचा स्कार्फ बाजूला सारून, सायली चा नाजूक आवाज.. 'गाडगीळ काकू, Good Morning!💐येऊ का 5 मिनिटे? जास्त वेळ नाही. आँफीसला निघाले आहे.एक विचारायचे आहे.... मी लगबगीने एक कप दूध गरम केले.. साखर ,नेसकँफे लावून ढवळत असतानाच ती वर आली. तिच्या हातात गरम काँफी ठेवून हं..सांग आता.. " काकू प्रत्येक वेळी.. खायला.. प्यायला काय हो देता..बरं.. एक सांगा.. माझी आर्या (5वर्षाची) विचारते.. "आई,तुझा हलव्याच्या दागिन्यांचा फोटो कुठे आहे?'" काकू.. मला खूप खूप आवडते. हलव्याचे दागिने घालून फोटो काढू का हो आता? का पहिल्याच वर्षी तिळवण सण करावा असे शास्त्र आहे का? मला खूप कौतुक वाटले तिचे. मी म्हणाले.. "खरं म्हणजे.. प्रत्येक सण हा घरातील स्त्रीच्या रुपाचे,गुणांचे,कलेचे ,चतुराई चे कौतुक करण्यासाठी साजरा करतात. पूर्वी मुली घरात बसून असत. मग.. दरमहा.. सणाच्या निमित्ताने..स्त्री स्नेह संमेलन भरवून.. स्त्रीने शेतात पिकवलेली भाजी.. फळे.. सुगडे..देणे. नजाकतीने केलेले हलव्...

ऊन..सावली..💐

🎴ऊन..सावली. .कानटोपी गालावर ओढत.. कोटाच्या खिशात हात लपवत.. हा..हा..हु..हू..बाराखडी म्हणत... धुक्याची वलये निरखत... तन थरथरत चालत होते.. मन माझे *ऊन* शोधत होते। बिच्चारी सावली बसली होती, पारावर.. फुगवत गाल.. लपेटून हरित पर्णी शाल। खुणावत होती .. थरथरत.. *'"ये ना ग.. माझ्या सोबत!"* घाबरतच मी दिला.. नकार.. नक्कोच तुझा स्पर्श गारेगार। मिजासखोर ऊन डोंगरावर चढलं होत.. तेथूनच खूपच भाव खात होतं। उनाड वारं मात्र मोकाट सुटलं.. नाकातोंडाशी झोंबत राहिलं। सावली साळसूद म्हणाली मला... "ठिक आहे ! नंतर बघून घेईन तुला। आता.. उत्तरायण सुरु होईल.. तो नाठाळ सूर्य आग ओकेल। मग..येशील तू माझ्या राशीला.. क्षणभर विसावा मागायला। * तेव्हा मी बोलावेन गर्दीला.. अन्.. उन्हात उभं करेन तुला।" * ऐकून मी लागले.. मुळुमुळु रडायला.. कवेत घेऊन मला,सावली लागली बोलायला.. *'अग, मी माणूस नाही, डूक धरून, सूड उगवायला.. रणरणत्या .. उन्हात ..मी असेनच तुझ्या दिमतीला!!!* उन्नती गाडगीळ🌹🙏

मोहक..हरिणे..💐

🧕मोहक हरिणे.. चंचल,चपल हरिणी..हरित रानात बागडती.. सोनसळी उन्हात लचकत..मुरडत..भिरभिरती। तपकिरी अंग,पांढरे बुट्टे,पाय काटकुळे.. तजेलदार रंग..लोभस टपोरे.. डोळे..काळे। तोंडाचा चंबू काळ्याकुळकुळीत रंगाचा..साथ लडिवाळ कळप ..गोजिऱ्या पाडसांचा। इवले कान टवकारूनी टकमक न्याहाळती... खुट्ट .. होता मान रूतवुनी मातेस बिलगती। सोबत..डौलदार, टोकदार, शिंगेधारी नर.. पाय पोटाशी घेऊनी उड्डाण.. वाऱ्यावर.. परि..धारदार नजर मादीवर। उन्नती गाडगीळ🌹🙏

मसाले भात..💐

👩‍🎤मसाले भात.. श्री. मुकुंद सावंत यांच्या विनंती वरून मसाले भात देत आहे.. साहित्य--- 2वाट्या तांदूळ(उत्तम प्रतीचे) पाव वाटी मटार दाणे,एका गाजराचे उभे आखूड काप,4छोटे अख्खे कांदे (किंवा एक मोठा कांदा चिरून) तेल.काजू,गोडामसाला,तिखट, मीठ, गूळ,कोथिंबीर,नारळचव. सुका मसाला---- पाव वाटी सुके खोबरे कीस भाजून घेणे.त्यात धने,जीरे,तीळ,दालचिनी, लवंग, किंचित जायफळ, वेलची व केशर घालून बारीक पूड करणे. ओला मसाला---- किंचित आले,दोन पाकळी लसूण(या भातात मसाल्याचा स्वाद महत्त्वाचा, म्हणून आले -लसूण नाममात्र घालणे)व  1हिरवी मिरची,1लाल टोमॅटो,1विड्याचे पान.सर्व वाटून घ्यावे. *कृती.. भात करण्यापूर्वी अर्धा तास तरी तांदूळ धुवून निथळत ठेवणे. जाड बुडाच्या पातेल्यात तेल,मोहरी,हिंग,हळद, कढीपत्ता ..कांदे परतणे.नंतर मटार दाणे,गाजर ,सर्व भाज्या घालून परतून,सुका मसाला परतणे,नंतर धुतलेले तांदूळ घालून परतावे. ओला मसाला, व दुप्पट गरम पाणी घालणे. तिखट, मीठ, गूळ, गोडा मसाला घालून झाकण ठेवावे. दणदणीत तीन,चार,वाफा आल्या की जरा हलवून बघावे.मधून मधून हालवून परत झाकण ठेवावे. हवे असेल तर थोडे गरम पाणी घालून छ...

मांडवाखाली..💐

#मांडवाखाली... श्रद्धा ने विषय दिला.. डिसेंबरमध्ये.. एक आगळा..विवाह सोहळा अनुभवला.... अनु.. एक अंध मुलगी. चार वर्ष पूर्वी इ.12वीत होती. मला अंध मुलांना शिकवण्याचा थोडा अनुभव होता.. हे ऐकून हट्ट धरून बसली.. गाडगीळ मँडम तुम्हीच मला शिकवा.. तिने माझे घरी रोज येणे तिला परवडणारे नव्हते.व मला तिचे घरी रोज जाणे अवघड होते. मग.. तिचा मित्र.. अभय... माध्यम बनला.. मी काढून दिलेली टिपणे,स्पष्टीकरणे, निबंध, उत्तरे.. थोडक्यात.. माझे लेखन... त्याचे वाचन.. व अनुचे.. मनचक्षूने चिंतन.. मनन.. स्मरण.. वगैरे. चार वर्षाच्या दोघांच्या परिश्रमाने, जिद्दीने.. अनु B.A. झाली. या काळात अनु आणि अभय .. मैत्रीला प्रेमरुप मिळाले.. अभयच्या घरात.. विरोध.. तरी सुद्धा.. डिसेंबरमध्ये.. अनुच्या घरी विवाहाचे आमंत्रण आम्ही स्वीकारले.. मोजकी 25माणसे. घराला मंगल तोरण बांधलेले.. अनु .. वधुरुपात गोड दिसत होती. अभय.. शेरवानी ..फेटा घालून सज्ज.. अनु .. त्याच्या.. पोषाखाला .. स्पर्शत... हुंगत.. त्याचे हात हातात घेत.. ..म्हणत होती... "  WOW !!! Nice!!! अभयने नटलेल्या अनुचा मेंदीने रंगलेला हात स्वह्रद...

वर्तन दर्शिका..💐

🔰वर्तन दर्शिका.. आमच्या हुजूरपागेत(शाळेत) आम्हाला एक *वर्तन पत्रिका* असे.त्यात विद्यार्थिनीच्या वर्तनाची नोंद केली जाई...उदा... *आज उशिरा आली. * गणवेष परिपूर्ण नाही. * वर्गात अत्यंत बडबड..वगैरे... मी रोज फलक लेखन करत असे. भाषा विषयात रस असल्याने कधी हिंदी, कधी मराठी तर कधी इंग्रजीत स्व लेखन करत असे. त्यामुळे त्या तिन्ही विषय शिक्षिका माझ्यावर खूप खुश असत. त्यामुळेच मला एकदा परांजपे बाईंनी.. '"आपल्या *बालिकादर्श* मासिकात दरवर्षी लेखन कर.जा.. पळ.. दोन दिवसांत मला *लेख* आणून दे!" म्हणून मला पिटाळले. मी इ.7वीत होते. लेख म्हणजे काय?कसालिहायचा?काही समजेना. मग आईला ,आजीला विचारले.. "लेख म्हणजे काय?'" आजीने सांगितले.. एखादा निबंध/व्यक्ती चित्रण/स्थलचित्रण काही तरी लिही.पण आपल्या मनाने..आणि दे. मी दोन पानी माझी आजी यावर निबंध लिहीला. व नाचत उडत परांजपे बाईंना दिला. *खाडाखोड नको*  * अवतरण चिन्ह नाही* *शब्दात योग्य जागा सोडली नाही* * पाठपोट चालणार नाही* *स्वतः च्या वयापेक्षा जड ,मोठी विधानं आहेत!* वगैरे सांगत.. प्रत्येक वेळी एकेक कारण देत मल...

वसुंधरेचे पत्र..💐

2019या विश्वात्मक बाळास , सप्रेम नमस्कार!!!      हे शिशु , तू कान्हा होऊन वेणु ने भयभीत चराचराला आनंद दे ! पशुधन,स्त्री ,व बालके यांचा रक्षक हो ! व्याभिचार , स्वैराचार,अत्याचार ,भ्रष्टाचार इ . दानवांचा नाश करणयासाठी सुदर्शन धारी हो ! परत एकदा भगवद् गीतातून वेदांचा अर्थ सांग! वैश्विक भाषा शिकव . पृथ्वीची लय ,जीवनाचा ताल ,पर्यावरण तोल व कर्माचे मोल विशद कर . सर्जनशिलतेचे तंत्र शिकव ,मानवतेचा मंत्र दे ! नाद ... नादातून अर्थ ... वेग ...मर्यादा म्हणजेच विवेक  ... संयम शिकव ! तुझ्या परिमलाने चराचर पावन होऊदे ! विश्व रुपी ग्रंथाच्या नव्या पानावर 2019हे तुझे नाव सुवर्णाक्षरानी लिहीले जाईल अशी कामगिरी घडो ! यशस्वी भव ! तुझी माता .... वसुंधरा  ( पृथ्वी  ) 🙋  उन्नती गाडगीळ 🙏