हौस..💐

👩‍🎤हौस..
मी सूर्य स्नान घेत घेत,झाडांना पाणी देत होते. खालून जोरदार हाँर्न वाजला आणि पाठोपाठ..
डोक्याचा स्कार्फ बाजूला सारून, सायली चा नाजूक आवाज..

'गाडगीळ काकू, Good Morning!💐येऊ का 5 मिनिटे? जास्त वेळ नाही. आँफीसला निघाले आहे.एक विचारायचे आहे....

मी लगबगीने एक कप दूध गरम केले.. साखर ,नेसकँफे लावून ढवळत असतानाच ती वर आली.

तिच्या हातात गरम काँफी ठेवून हं..सांग आता..
" काकू प्रत्येक वेळी.. खायला.. प्यायला काय हो देता..बरं..
एक सांगा.. माझी आर्या (5वर्षाची) विचारते..

"आई,तुझा हलव्याच्या दागिन्यांचा फोटो कुठे आहे?'"

काकू.. मला खूप खूप आवडते. हलव्याचे दागिने घालून फोटो काढू का हो आता? का पहिल्याच वर्षी तिळवण सण करावा असे शास्त्र आहे का?

मला खूप कौतुक वाटले तिचे.
मी म्हणाले..
"खरं म्हणजे.. प्रत्येक सण हा घरातील स्त्रीच्या रुपाचे,गुणांचे,कलेचे ,चतुराई चे कौतुक करण्यासाठी साजरा करतात.

पूर्वी मुली घरात बसून असत. मग.. दरमहा.. सणाच्या निमित्ताने..स्त्री स्नेह संमेलन भरवून..
स्त्रीने शेतात पिकवलेली भाजी.. फळे.. सुगडे..देणे. नजाकतीने केलेले हलव्याचे दागिने.. नव्या नवरीला घालणे.. तिला सजवणे.. यातून कलेचे,गुणांचे कौतुक होत असे.उत्तेजन दिले जात असे.

गुळाची पोळी कशी खुटखुटीत झाली आहे..

तिळगुळ वड्या.. तोंडात घातल्या घातल्या विरघळतात हो!

साडीवर हलव्याचा कशिदा काय सुबक केला आहे. खरेखुरे हलवे दाणे लावलेत असे भासते!

गोपाळ कृष्ण काय गोड दिसतोय.. हलव्याचा मुगुट धारी!

अशी कौतुक सुमनांची बरसात होते.. मग आपसूकच स्पर्धा.. आणि वारसा.. रितीभाती..तयार होतात.
आणि थंडी असते..काळे उबदार वस्त्र.. त्यावर हलवा खुलतो. रूप उजळते..

ते सर्व ऐकून सायलीने टुणकन् उडी मारली.
अन् स्कार्फ गुंडाळत म्हणाली..

"काकू.. मी एका गरजू स्त्री कडून हलव्याचे दागिने विकत घेते.. काळी चंद्रकला नेसून,दागिने घालून फोटो काढून घेते.

काकू..आमची मेली हौस झालीच नाही.. असे रडवे सूर लावण्यापेक्षा..

आता जेव्हा.. सवड,मुबलक पैसा,तुमचे पाठबळ आहे.. आणि काकू.. अजून तसा माझा फाँर्म.. फिगर पण छान आहे. हो ना?

मी तिला कवेत घेऊन म्हणाले..

" तुम्ही मुली .. फाँर्म, फिगर तर छान आहेच ग!
पण तुमच्या पीढी ची सकारात्मक वृत्ती आवडते.. जे वाटते ते करून मोकळे होता..
हौस तर भागतेच.आणि मन मोकळे होते.
". Enjoy. आणि हलव्याचे दागिने घातलेला तुझा फोटो नक्की पाठव.बाssय!

उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme