Posts

Showing posts from November, 2019

B F एकांकिका

।।श्री।। ♥♥ B.F.♥♥ ( सून फोनवर बोलते,सासू लपून ऐकते.. माना डोलावते,हातवारे करते) सून ::  Hi.. Dear.. How r u?? काय? आज.. नक्की? Oh.. so sweet of you. असं रे काय डिअर.. pl. हिअर ना.. ती पँट घालून येऊ?मी त्यात खूप खूप Sexi दिसते? ओहो.. यू..नाँटी!!! How romantic.. अरे.. तू किती लाड पुरवतोस माझे. आणि किती कौतुक करतोस रे! नाही तर.. माझा हबी रे.. काही काही कौतुक म्हणून नाही त्याला.. कोण काय.. हबी.. हजबंड.. माझा नवरा रे..जर्रा सुद्धा प्रेमात येत नाही. लाडेलाडे बोलत नाही... सतत त्या w.a. मधे डोके खुपसून बसतो.. बरं..आज संध्याकाळी नक्की ना? हो.. हो..मेकओव्हर करुन, ड्रेस अप करून येते हं.. हो.. ठरलेल्या ठिकाणी.. अरे.. आता ठेवते रे.. भिंतीला कान,डोळे सर्वच आहे.. अरे.. माझी सासू रे.... म्हातारी कान देऊन ऐकते आहे. सतत माझ्या पाळतीवर असते..Watch woman कुठली! ( सासू चवताळून बाहेर येते) सासू ;:  काय ग.. ए.. भवाने.. मी watch woman ?थेरडी ?जीभ फार चुरुचुरु चालतीये ग.. सून ::  जे आहे ते आहे.. आरशात बघा एकदा स्वतःला! आणि सासरे बघा.. किती मेन्टेन्ड आहेत अजून. सकाळी ...
👩‍🎤RSVP..... माझे पुस्तक परत करायला काल सुलूताई आल्या होत्या.. पुस्तकाबरोबरच दोन डबे पण ठेवले..चार सामोसे व आठ गुलाबजाम होते.. आमची घट्ट मैत्री असल्याने त्यांनी स्पष्टीकरण केले.. ""रविवारी मिटींग निमित्ताने 12जणांना निमंत्रित केले होते. अल्पोपहार  देईन असा उल्लेख पण केला होता.. अगदी एक महिनापूर्व सूचना केली होती.. आणि घर निटनेटके करून.. रात्री बसून.. हे एवढे गुलाबजाम बनवले. सामोसे मागवले..पन्हे .. बर्फ जय्यत तयारी केली.. आणि फक्त तीनच मेंबर्स उपस्थित होते.. हे एवढे सामोसे ,गुलाबजाम उरले..संताप संताप झाला.. हं..मी सागितलं.. मी सहसा बाहेरचे पदार्थ खात नाही. चार गुलाबजाम ठेवून, बाकी.. वाटून टाकले.. निमंत्रण /सूचना/मेसेजेस..देताना.. RSVP..जरुर लिहावे... हा फ्रेंच शब्द आहे... *Respondez s'llvous plait* थोडक्यात *pl.respond'*.. त्या काकुळतीने म्हणाल्या.... मी शुद्ध मराठीत लिहीले होते..येत आहोत/नाही.. हे  जरुर कळवावे.. तरीही.. हा प्रकार .. मी हताशपणे उद्गारले.. याचा अर्थ आपण मराठीकरण नाद सोडून.. सरळ.. RSVP लिहीण्याचा संस्कार.. मनावर.. लेखनावर के...