B F एकांकिका
।।श्री।।
♥♥ B.F.♥♥
( सून फोनवर बोलते,सासू लपून ऐकते.. माना डोलावते,हातवारे करते)
सून :: Hi.. Dear.. How r u?? काय? आज.. नक्की? Oh.. so sweet of you.
असं रे काय डिअर.. pl. हिअर ना..
ती पँट घालून येऊ?मी त्यात खूप खूप Sexi दिसते? ओहो.. यू..नाँटी!!!
How romantic..
अरे.. तू किती लाड पुरवतोस माझे. आणि किती कौतुक करतोस रे!
नाही तर.. माझा हबी रे.. काही काही कौतुक म्हणून नाही त्याला..
कोण काय.. हबी.. हजबंड.. माझा नवरा रे..जर्रा सुद्धा प्रेमात येत नाही. लाडेलाडे बोलत नाही... सतत त्या w.a. मधे डोके खुपसून बसतो..
बरं..आज संध्याकाळी नक्की ना?
हो.. हो..मेकओव्हर करुन, ड्रेस अप करून येते हं.. हो.. ठरलेल्या ठिकाणी..
अरे.. आता ठेवते रे..
भिंतीला कान,डोळे सर्वच आहे.. अरे.. माझी सासू रे.... म्हातारी कान देऊन ऐकते आहे. सतत माझ्या पाळतीवर असते..Watch woman कुठली!
( सासू चवताळून बाहेर येते)
सासू ;: काय ग.. ए.. भवाने.. मी watch woman ?थेरडी ?जीभ फार चुरुचुरु चालतीये ग..
सून :: जे आहे ते आहे..
आरशात बघा एकदा स्वतःला!
आणि सासरे बघा.. किती मेन्टेन्ड आहेत अजून.
सकाळी सकाळी.. ट्रेक सूट ,स्पोर्ट्स शूज घालून, मस्त लव्हेंडर शिंपून जातात ना..अगदी एखादा हिरो दिसतात..
काय पर्सनॅलिटी आहे.. काय ताठ रुबाबात चालतात..आहेत 70+ पण दिसतात अगदी.. फाँर्टी...एकदम हंडसम!
नाही तर तुम्ही..
सासू :; काय बाई आजकालच्या मुली? सासऱ्यांना हिरो म्हणते..
आणि काय ग..
"'कोण होता तो फोनवर?
गुलुगुलु बोलत होतीस तो?"
सून :: Oh.. तो?He is my B. F. Very Very smart &cute.
सासू :: ( किंचाळत) काय? B.F. म्हणजे काय?
सून :: सासुबाई.. एवढे इंग्रजी कळत नाही? हँ---
अहो.. B.F. म्हणजे..Boy friend!!!
(सासू आत जाते आणि एकदम माँडर्न बनून बाहेर येते)
सून :: (थक्क होते)
O.M.G... सासुबाई तुम्ही?I can't believe .
सासु :: हो मग..आम्हाला काय असे राहता येत नाही, असे वाटते का तुला?
आणि तुला काय वाटते.. तुलाच फक्त B.F. आहे.?
अग.. माझा पण आहे बरं एक कूट--कूट बाँय फ्रेंड!
सून :: (खिल्ली उडवत)
सासुबाई.. कूट कूट नाही हो म्हणत.. क्यूट क्यूट म्हणतात..
सासू नाक उडवते..
सासूचा मोबाईल वाजतो...
सून घेणार.. तेव्हढ्यात सासु झडप घालते..
फोन छातीशी धरून..
माझ्या B.F. चा फोन..
( सून दाराआड लपून ऐकते)..
सासू ;;. (फोनवर.. लाडेलाडे) अय्या.. राजेश!!! किती किती आनंद होतो माहिती का.. आपल्या खास B.F. चा फोन आला की..
कसा आहेस?
हं.. अरे मी कासावीस होते रे.. तुझ्याशी बोलायला.. अरे.. खरचं.. तुझी शपथ!
काय? आज.. इंग्रजी सिनेमा बघायला?
काय? तो पिंक ड्रेस घालून येऊ? अरे पण मी आता असे ड्रेस मधे..
एकदम ब्युटी दिसेल? ओहो..
आणि डार्क रोझ कलरची लिपस्टिक लावून येऊ?
बर.. आणि high hills sandals घालू?
अरे पण.. वाढते वय.. तोल जाऊन पडले तर?
आधीच माझ्या आळशी सूनेमुळे माझ्यावर कामाचा खूप खूप ताण पडतो.आणि.. त्यामुळे पाठीचे दुखणे आहेच..ते जाऊदे..
नंतर माँलमधे जाऊया हं..तेथे मला खूप खूप शाँपिंग करायचे आहे..
इ..इ..ई.. साडी??
नाही रे बाबा -- तू आत्ताच म्हणालास ना.. मी यंग दिसते म्हणून..
मग.. मी मस्त पैकी One piece Top.. खरीदणार...आणि हो.. नंतर आपण पिझ्झा खायचा हं..
आणि गारेगार आईस्क्रीम तर .. मी ताव मारणारे.
काय शुगर?
अरे.. आज तुम मेरे साथ हो.. तो वो शुगर..बिगर हिंमत नही कर सकती।
आपण खूप खूप enjoy करायचे हं!
अगदी सुनेच्या नाकावर टिच्चून..
अगदी डार्क लिपस्टिक लावून तो मोठा गाँगल नाकावर चढवून .. तुझ्या बाईकवर तुझ्या पाठीमागे अगदी बिलगून बसणार हं....
आणि स्वतः च्या मनाचे लाड पुरवणार..
जन्म गेला रे.. बाकी सर्वांच्या आवडीनिवडी पुरवता पुरवता.. B.P आणि शुगर.. हे मेले सततचे फीवर!
Love you dear..
आँ.. काय? पिंक स्कार्फ पण गुंडाळून घेऊ..
नक्की.. अगदी ठरलं..
माझ्या ह्यांना रे.. नावाचे हसबंड.. जर्रा कुठलीही हाँबी ..नाही.. कौतुक नाही.
अरे.. हो.. मी इतकी नटणार..थटणार..तर एक सेल्फी नक्की काढ बरे..
तुझ्या बरोबरचा सेल्फी मी सोशल मीडियावर व्हायरल करणार..
हो..अरे.. असेच शब्द वापरला जातो हल्ली..
आणि हो.. माझी भोचक सून ऐकेल.. तर कुठे भेटायचे ते ठिकाण .. पत्ता मला मेसेज कर..
(सून न राहवून येते. संतापाने)
सून :: खसकन सासुच्या हातून मोबाईल घेते..
कोण बोलतोय? माझ्या साध्या भोळ्या सासूला जाळ्यात ओढतो होय रे?
कोण तू? नाव काय रे?
आता मी पोलिस कम्प्लेंटच करते..
(फोनवरून हास्य खळखळाट करत..अग)
B.F. म्हणजे मी *बनुताई फडके*--
तुझ्या सासुची मैत्रीण..
अग.. तुझ्या सासू ने व मी थोडी गंमत केली..
सून :: आँ.. खरचं?0.. Sorry ..
सासू हासत बाहेर येते. अग.. शक्य आहे का B.F. वगैरे काही नाही ग..
आणि तुझ्या भाषेत.. आहे की माझा हिरो..
दोघी गळामिठी करतात..
सून :: अजूनही तुम्ही इतक्या गोड गोड दिसता.. म्हणून वाटले हो..
सासू : तो बघ.. आला माझा B.F. (पती)
खळखळून हसतात..
समाप्त..
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment