नाचता येईना...
⛷नाचता येईना... मुंबई _ नैसर्गिक बेट.आदर्श बंदर. जागतिक व्यापारी केंद्र.आंतरराष्ट्रीय विमानतळ. आकर्षक बिंदू.. अनेक वैशिष्ट्यपूर्ण मुंबापुरी ही... तुंबापुरी.. व्हावी.. नामुष्कीची गोष्ट. अतिशय लाजीरवाणी गोष्ट. 9कि.मी. चा क्रुष्णमेघ मुंबईच्या डोक्यावर फिरत होता. त्यामुळे .... हे काय कारण आहे ? चक्रीवादळात , क्रुष्णमेघाची व्याप्ती 12ते 14कि.मी. होऊ शकते. ढगांना, पर्जन्याला दोष देणे म्हणजे सामान्य जनांच्या डोळ्यात धूळ फेकणे.. एकदा 2005मधे गलिच्छ पणामुळे दणका बसला.. तरीही ..तेच.. तेच.. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करणे हे काम महानगरपालिकेचे. ते केले जात नाही म्हणून मुंबापुरी तुंबापुरी झाली.... कोणत्याही देवाचा कोप नाही, की नागरिकांचा दोष नाही. घरात मोरी तुंबली अन् मुल घसरले.. तर तो दोष पालकांचा असतो. मुलांवर ठेपर ठेवायचे नसते... आता आपणच सारे जण एकजुटीने, नेटाने, सजगतेने ... पावसाळ्यापूर्वी नगरसेवकांना वेठीस धरून, त्यांचा पाठपुरावा करुन, प्रत्येकाने ... आपल्या परिसराची नालेसफाई करवून घेणे , अनधिक्रुत बांधकाम रोखणे , रस्त्याची स्वच्छता राखणे, जलाशयातील गाळ काढणे, जलकिनारे.. नाल...