सुई धागा...
सुई..धागा..
सुईचे ऋण..
मान मानवा..
सुई विना..
मानव नागवा।
इवली.. इवली सुई टोकदार..टकटकत.. भोके पाडत.. चाले पुढे पुढे..
दोरा बेचारा.. टुकू टुकू भोके भरत.. टीपा गाळत..तिच्या मागे मागे...जातो..
ही सुई.. सर्वत्र संचारते..पटकन कुठेही घुसते.. मोकाट सुटते.. महा चवचाल.. मस्तवाल.. ढालगज..कजाग..कुर्रेबाज.. एककल्ली..
पण.. चराचर वस्त्रांकित करून लाज राखणारी..
टचकन टोचून आरोग्य वर्धिनी!!!
दोरा.. रंगीढंगी.. कधी मऊसूत तर कधी तुटका.. तुसडा..
आज्ञाधारक.. सुईच्या नाकात वेसण बनून.. लळत..लोंबत.. लटकत.. तिच्या मागे निमूटपणे चालणारा.. कलावर्धक..कधी वस्त्रांवर मिरवतो तर कधी माळेत लपूनछपून तिला खुलवतो..
धागा.. करारी तर कधी मवाळ.. कुशल..लवचिक.. सोशिक.. सांधणारा.. मनोमिलन करणारा..
तर कधी.. आतल्या गाठीचा. .. कधी फांस बसेल, कधी गाठ बनेल समजणार नाही.
सुई...धागा.. जोडगोळी विना जीवन वस्त्र कसे वीणणार ???
ही जोडगोळी.. एक अतूट नाते!अजब रसायन निर्माण करते...
मूकपणे सतत कार्यरत राहून एकसंध राहण्याचा महामंत्र देते .. शतश:वंदन !!!
उन्नती गाडगीळ 💐

Comments
Post a Comment