Posts

Showing posts from February, 2018

खत लिखदे. सावरियाके नाम..💐

🍀 ' खत ' लिख दे..सावरियाके नाम बाबू ... हे गाणे ऐकताना...एक प्रसंग आठवला... ...अमदाबाद वास्तव्यात... कांता नामक सफाई कामगार ...मला म्हणाली, " बेन , मेरा पती दूर राजस्थानमें ! मुझे लिखने पढने नहीं आता ! " मी खूप विचार करुन ... गुजराती मूळाक्षरे... २-३ छोटी छोटी पुस्तके आणली ! मला गुजराती लिपीचे वळण आत्मसात करायला ५-६ दिवस लागले...नंतरच्या आठवड्यात मी शब्द व वाक्ये लिहायला शिकले... हळू हळू तिला ...पत्र लिहून देणे मला जमू लागले... तिच्या अपेक्षा वाढू लागल्या... अलंकृत रसभरी प्रेम पत्र अन् गुजरातीत मी लिहावे...अशी तिची अपेक्षा ... अन् माझे गुजराती अगदीच बाळवोध ! मग मी सरळ तिलाच पाटी पेन्सिल दिली...व रोज गुजराती अक्षरे शिकवुन तिला तयार केले...' गुजरात समाचार ' वृत्त पत्र रोज दोघी वाचायचो...' गुजरात समाचार ' रेडियो वर ऐकून मी लेखन करायची.. दुसरे दिनी तिला नवनवी वाक्य लेखन शिकवायचे...' प्रेम ' किती शक्तिशाली असतेबघा... 25 वर्ष निरक्षर राहिलेली कांता... 42 दिवसात गुजराती शिकून पतीला.. पत्र लिहू लागली ... कांता आता ७१ वर्षीय आहे ... काल तिने मला....

ठोक्याचं पातेलं...💐

🌸ठोक्याचं पातेलं.. वीणाचा मेसेज....  --- तुझं  मोठे पितळ्याचं ठोक्याचं पातेलं पाठव ग. 20जणांचा उंधियो करायचा आहे... अग, सूनेने घरात अडगळ नको म्हणून सारे मोडीत घातले..... ... .... हं.... आमच्या नवीन संसारात मोठे पितळ्याचं ठोक्याचं पातेलं घेणं एक स्वप्न होतं.अन् ते साकारायला चार वर्षे लागली.! पैसे साठवत.. साठवत.. एकदाचं ते लखलखीत.. चकचकीत पातेलं खरीदलं.!माझे बघून वीणाने पण खरीदलं!! कुणाकडे पार्टी.. बारसे.. बारावा.. काही असो.. आमचं पातेलं काँलनीभर फीरत राहिले. गेली कित्येक वर्षे मात्र ते माळ्यावर चूपचाप ... मी विचार मग्न असताना, सरूबाई आली.. लगेच तिची मदत घेतली.. लाकडी उंच स्टुलावर जेमतेम 5'उंच सरुबाई उभी.. मी तिला घट्ट धरून ,रामनाम जपत,जीव गोळा करून, स्टुलापाशी उभी राहून मान उंच करून तिला सूचना देत होते.. "पहिल्या ओळीत बघ..ती भांडी बाजूला घे.. हं.. अश्शी.. तेथे नाही? बssर ,आता दुसऱ्या ओळीत बघ.. अग.. तेथे तर.. स्टील ची पातेली.. तसराळी दिसतात.. नको..नको.. आता.. pl. शेवटच्या ओळीत बघ ना.. जरा.. ती बिचारी.. पाय उंच करून.. डोके माळ्यात खुपसून (मनात मला शिव्या घालत...

आईचे पत्र..💐

🍀 आईचे पत्र ... कपाट आवरताना.. जपून ठेवलेली आईची पत्रे दिसली...आईची पत्रे बोलकी व सविस्तर असायची... आम्ही भूज ला असताना ... आई आमचेकडे एक महिना मजेत राहिली होती .. परत पुण्यात गेल्यावरचे हे पत्र ... --- " उन्नती, अग आज पुण्यात खूपच थंडी .. हुडहुडी भरली नुसती ! तू स्वत: माझ्या साठी केलेली शाल लपेटली , अन् काय जादू ग...थंडी पळाली ग ! तू विणलेल्या बकुळ फुलात .. प्रत्येक धाग्यात तुझा उबदार स्पर्श जाणवला !!! तू अचानक मागून येऊन माझ्या अंगावर घातलीस तो क्षण आठवला ! अन् धन्य धन्य झाले ... तू सतत busy असून माझे साठी शाल विणलीस खरच कौतुक वाटले ! प्रत्येक वेळेस तुझ्या घरी.. रोज नवनवे पदार्थ व जीप मधून हिंडणे..फिरणे..अगदी माहेरपण होते बघ !!! वगैरे ..वगैरे ... खर म्हणजे भूज मधे एक वर्ष मी नोकरी करत नव्हते.. त्यामुळे बकूळ फुलांची शाल विणली गेली ...पण आईला त्याचे किती अप्रुप ! तिने ती शाल पुढे पण खूप वर्ष वापरली ... आता फक्त स्मृति सुगंध मागे राहिला आहे .. आता तर पत्र लेखन संपलेच... हस्ताक्षर... शब्दातल लाघव .. लालित्य ... प्रेम ..आर्जव .. आपुलकी.. नाहींच ! भरभरुन आलेली पत्र ..हे चित्र...

नंबर..नेम्...💐

चार वर्षीय अमरला Number names ... म्हणताना मी  बघीतले ... वन् ... टू ... थ्री ... टेन पर्यंत गाडी सुरळीत  ! नंतर मान खाली घालून,नजर वर करुन मिश्किलतेने व बिनधास्त गाडी सुरु ... " इलेवन ... इले टू .... इले थ्री ... इले फोर .... इले नाइन ..... पर्यंत ... सराईत पणे ... एका दमात ... एका ठेक्यात ! माझी हसून हसून पुरेवाट झाली. त्याची आई मात्र खूप भडकली ! ४ वर्षाचा झाला !! अजून Number Names  म्हणाता येत नाहींत ! अगदी ' ढ ' आहे ! कस होणार त्याच ? वगैरे ! मी  अमरला जवळ घेत तिला समजावले , " मला तर त्याच्यात easyy method  संशोधक दिसला ! आत्मविश्वासु , खुबीने पर्याय शोधणारा management गुरू  दिसला ! पारंपरिक सिद्धांताला छेद देऊन नवनिर्मिती करण्याची वृत्ति ही एक चतुराई आहे. त्याच्यातील कल्पक वृत्तिला चिंतन , श्रवण , संस्कार रुपी खतपाणी घालून एक कल्पक कलाकार / संशोधक जगासमोर ठेवणे हे तुझे काम ! " त्यासाठी ' ढ ' , ' आळशी ' विशेषणे न लावता , दुस-याशी तुलना न करता , सूप्त गुणांना  झिलाई लावत रहा !!! " खरच प्रत्येकात सूप्त गुण असतात . आपण नीर क्षीर विवेक...

वीण.. लघुकथा..💐

(स्वाती ताईने विषय दिला. म्हणून तिचे शतशः आभार) --- --- वीण--- --- एक झोकदार वळण घेऊन शलाकाची गाडी  आलिशान बंगल्यासमोर थांबली. सुनिता मावशींची लख्ख गोरी,हासरी प्रसन्न मुर्ती सामोरी आली. गळामिठी झाली. दोन वर्षापासून F.B. वर *स्वयंपूर्णा* ग्रुपवर सुनीता बाई व शलाका यांचे विचार धागे जुळले व एक मैत्री ची रेशमी *वीण* तयार झाली. अन् आज आभासी नाते प्रत्यक्षात अवतरले! सुनीतामावशीचा सध्या अम्रुत महोत्सव !पण त्यांच्या नजरेतुन.. कलेतून..व्रुत्तीतून... घरात ठायी ठायी अम्रुत रस ठिबकताना दिसला.. सर्वत्र  सुबक कलाकुसर! बागेत.. घरात.. रंगसंगती साधून दमदार वीण घातलेली दिसली. मखमली गुलाबजाम, रंगतदार पुलाव, पराठे,रसदार कालवण चाखता..चाखता.. हळूच आपल्या गत जीवनाची वीण उकलली...त्या सांगू लागल्या... केरळमध्ये वास्तव्य होते. त्यांचे पती जेमतेम 32 असताना निवर्तले.. जीवन वस्त्राचा काठ सुद्धा पूर्ण न होता.. वीण तुटली. पण.. मावशीने आंसू धारांना थोपवत..सुईधागा हातात घेऊन.. शिवण,भरतकाम, कलाकुसर, वर्ग चालवत.. दोन मूलांचे संगोपन.. शिक्षण.. कार्य केली. दोन्ही मुले परदेशात. वय..व्याधी यांची वी...

सदुपयोग...

🌺सदुपयोग.. सरिता चा फोन.. '" ताई, मी निव्रुत्ती घेतली आहे. वय45 . काही समाज कार्य करण्याची तळमळ आहे काय करू?'" मी तिला सांगितले.. 1) 2016-18 सर्वेक्षणावरुन दिसून येत आहे.. रात्रशाळेत इ.10 वीच्या वर्गाना  गणित व विज्ञान शिकवायला शिक्षक नाहीत. व मुले महागड्या क्लासला जाऊ शकत नाहीत. तरी तू मुलांना फुकट शिकवू शकतेस. ती मुले दिवसभर कारखान्यात.. खानावळीत.. कुठे कुठे राबतात.. तू गणित व विज्ञान यांत तल्लख आहेस. 2) इ. 10वी 12 वी च्या परिक्षांना अनेक अंध व अपंग विद्यार्थी बसतात. त्यांच्या साठी writer म्हणून तू काम करू शकतेस. 3) 18 व्या वर्षा नंतर अनाथ आश्रमातील मुलांना स्वतः ची सोय दुसरीकडे करावी लागते. ती मुले.. अर्धवट वय,अपूर्ण शिक्षण.. निराधार यामुळे बावरलेली असतात. अश्या एखाद्या मुलाचा शैक्षणिक भार उचलणे, निवाऱ्याची सोय करणे.. असे तू करू शकतेस. 4) कुपोषित गर्भवती व कुपोषित बालके यांचे प्रमाण वाढते आहे. एखाद्या गरोदर स्त्रीला तू पोषक आहार पुरवू शकतेस. अनेक कामे आहेत. नुसती देणगी देण्यापेक्षा तुझ्या बुद्धी चा वापर करून..थोडा वेळ देऊन एखाद्याचे जीवन छान मार...

स्वातंत्र्य...💐

🍀 स्वातंत्र्य ... स्वातंत्र्य पूर्व काळात.. सेनापती बापट यांनी त्यांच्या लेकीला पत्र लिहीले , " तू शिक्षीत आहेस , तुझ्या लग्नाचा विचार ..कधी ..कसे..केव्हा..कुणाशी...ते तुझे तूच ठरवायचे ! " त्या नुसार .. लग्न ठरले... प्रभाकर सप्तर्षि नामक मुलाशी ! बापटांची मुलगी..नववधू .. साध्या सुती साडीत... दागदागिने..ठमठमाट..काहीच नाहीं. बापटांनी स्पष्ट केले , " संसारासाठी फक्त जरुरी पुरते पैसे मी घेतो..बाकी पगार...देशार्पण !!! "   माझी मुलगी कंचन आहे, शिक्षण व संस्काराने अलंकृत आहे. अन् स्वावलंबी आहे. जावयाने सुद्धा ... विद्याविभूषित पत्नी हेच माझे भाग्य! हे ठणकावून सांगितले!!! आज विज्ञान युगात सुद्धा ... सुशिक्षित तरुणाई ला गप्प बसवून .. विवाह सौदा ठरतो... भरमसाठ दागिने , पैसे, वस्तु मागितल्या जातात ..पुरवल्या जातात .. मिरवल्या जातात  !!! तरुणाई चे मन ...मत.. विचारात घेतलेच जात नाहीं .. स्वातंत्र्य नाहीं ... विचारांची उदात्तता.. पारदर्शिता ... कधी येणार ? मुलांना स्वातंत्र्य कधी मिळणार ? उन्नती गाडगीळ 🌷 🙏

आई ग.. मी शिवाजी होणार...💐

अश्शी ही तलवार उपसणार .... आई ग ! मी शिवाजी होणार ! "  थांबव .. थांबव ... इंटरनेटचा चाळा ... तरच शिवाजी होशील बाळा ...! वाहनांशी घे काडीमोड ... पालथे घाल ... किल्ले ... गड ...! अथांग सागराचा धर ध्यास ... पोहोण्याचा कर प्रयास ...! अंतराळाचा वेध घे ... निसर्गाचा बोध घे ... शस्त्रास्त्रांचे शिक्षण घे ...! नवतंत्राचा मंत्र घे ... न्याय्य बुद्धि चा दावी चमत्कार  .... तेव्हाच होईल बाळा तव जयजयकार  !!! "        उन्नती गाडगीळ 🌷 🙏

भाग्य...💐

⭐ भाग्य... नशीब हे फक्त व्यक्ती सापेक्षच असते असे नाही... तर..निर्जीव वस्तू, वास्तु,वाहने..एवढचं नाही तर लेख.. काव्य.. यांचे सुद्धा भाग्य उजळणे वा कोळपणे हे सारे सजीवांवर अवलंबून असते.आज मला त्याचा प्रत्यय आला... आज.. 17-2-18  बडोदा येथे अ.भा. मराठी साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यावर काव्य वाचनासाठी माझ्या कवितेची निवड झाली आहे. पण मी काही अपरिहार्य कारणांमुळे जाऊ शकत नाही... वर्णस्वरांना व्यंजनांचा साज चढवून, मोजून.. मापून.. मी एक गोजिरे रूप (काव्य) तयार केले. ते गोजिरे रुपडे आपले साजिरे पंख पसरत.. आज.. बडोद्याच्या .. राजमहालासम सजलेल्या काव्य मंचावर.. मोठ्या दिमाखात मिरवणार होते. पण.. पण.. मीच तेथे जाऊ शकत नाही, त्यामुळे त्या कवितेचेही पर.. मिटले.. माझ्यामुळे ती कविता सुद्धा बासनात बंदिस्त झाली. ही मला खंत आहे. पण आज मी ते गोजिरे रूपडे.. येथे मांडते... *** *** पाखरे*** *** कविता.. पाखरे..💐 इटुकले.. पिटुकले.. धिटुकले पक्षी.. निळ्याशार आकाशात चितारती नक्षी । क्षणार्धात भुईवरी.. क्षणार्धात नभा.. गाणे गाती फांदीवरी..उजळत प्रभा । टोकरती काळी माती..पेरताती दाणा.. ...

#विवाह सोहळा...💐

#विवाह सोहळा.. एका लग्नाला मी आईसह गेले होते. आईच्या आग्रहास्तव पहिल्यांदाच साडी नेसली होती... तयामुळे बोंगा आवरणे,पदर सावरणे हेच चालू होते.. दिवस भर तेथे माझे भावी सासुसासरे,दोघी नणंदा..आठ नजरा माझ्या वर पाळत ठेऊन होत्या. खुदुखुदू हासत होत्या. कुजबुजत होत्या... माझे वय 17पूर्ण. मला काहीच कळत नव्हतं. सासुबाईंनी आईजवळ माझा फोटो मागितला. आईने दिला... आईने सहज फोटो दिला. पण तो फोटो सहज त्या लोकांनी.. अमदाबादला मुलाला पाठवला.. आईच्या जीवाची घालमेल.." काय करावे बाई, मुलगा फोटो पाठवेना!" चार महिन्यांनी मुलगा आला. मग आईने, आजीने मला सांगितले, " मान्य आहे तुझे वय लहान. पण लगेच थोडेच जमते !'" मी फणफणतच साडी नेसली. गाडगीळ संपूर्ण कुटुंबाने मला बघीतले होते. तरीही .. बटाटे पोहे ( कांदा सासुबाई ना वर्ज्य) कार्यक्रमाला हीsss गर्दी !!! प्रश्नांच्या फेरी !!! मुलगा गप्प !!!मोजून, मापून एकच प्रश्न विचारला, "अमदाबादला यायला आवडेल ना?" अन् माझ्या आईला सांगितले, "काळजी करू नका, फोटो माझ्या जवळ सुखरूप आहे!" जोरदार खसखस पिकली. कुजबुज वाढली.. ...

मिठी...💐

🌹मिठी...  बाळ रांगत.. रांगत... खुदुखुदू हासत । गाल फुगवत... झेपावे.. आईच्या कुशीत। धन्य धन्य मात्रु मिठी... तरल... वत्सल.. रेशीम गाठी।  वारा वाहे झुळुझुळु... जळ वाजे  खळबळ । लाजरी थरथरती वेल.. विसावे.. व्रुक्षाच्या कवेत। भावुक.. खोल मिठी... मुग्ध कळ्या फुलती देठी..देठी। कडेकपारीतून थरारत.. दगडगोट्यांना चुकवत। नदी वाहे आवेगात.. विरघळे.. सागर पाशात। भव्य.. दिव्य.. साखर मिठी... विश्वासक.. अलौकिक गाठी। क्रुष्णमेघ गडगडत... गरजत.. वाजत । रुणुझुणु.. नाचत... आनंदे.. धरेस घेई कवेत। भावुक, प्रेममय अलिंगन... आश्वासक... चिरंतन। उन्नती गाडगीळ 🌹🙏

एक श्रुंगार... एक थरार..💐

एक श्रृंगार ! एक थरार ! ' गिर ' अभयारण्यात एका बंगलीतून बघत होते .... एक रम्य पहाट !जंगल घनदाट !सुवर्ण सहस्र रश्मि व रिमझिम रेशिम धारांची मंत्र पुष्पांजलि, मंद पवन पावा , अन् अलवार मृद् गंध,निसर्गाने सारा साज .. श्रृंगार केलेला ... ही सुवर्ण संधी साधून ,हरित पानात ,सोनसळी उजेडात सळसळलं !! ५' लांबीचे दोन काळपट लाल रंगाचे दोन नाग समोरासमोर बसून सरी्ंच्या पुंगीवर डोलू लागले ! फणा काढून एकमेकाना बिलगत होते, ! फुत्कारत होते ... आवेश ... आवेग ... लसलस ...फसफस .... थरथर ... उंच च उंच उसळ्या ... अलिंगने ... कमनीयता ... भावुकता ... चपळता ... आतुरता ... डौल,दिमाख मी नजरेत साठवत होते! मी पुतळा बनले होते! सारे सारे स्तब्ध! निरव शांत ! माझ्या  हातून पर्स पडली ! प्रेमी युग्मास माझी चाहुल लागताच , ते सळ्कन् झाडाआड गेले ! 'प्रणय ' ही सहज स्वाभाविक भावना! पण मिलनाच्या अत्युच्च क्षणीचा संयम त्या हिंस्र पशु त दिसला ! आश्चर्यजनक!!! फेब्रुवारी मास ... प्रेम मास! आपण प्रेम जरूर व्यक्त करुया ,पण भवतालचे भान राखुया ! दर्जा राखुया ... स्वत:ला आवरुया ... सावरुया .... उन्नती गाडगीळ...

माझा .. व्हँलेंटाईन..💐

🍀 व्हॅलेंटाईन 🍀 खळ्कन् फुटला...काचाच काचा सर्वत्र विखुरल्या... कण् न् कण वेचता वेचता.. त्याच्या मणभर स्मृतित मी रमले... पांढरा शुभ्र ..सोनेरी काडीचा..गुलाब फुलांनी सजलेला.. हा माझा कप ..माझा ३४ वर्षाचा साथी ... Yesssss.... Valentine.... मुंबई महानगरीत प्रवेश केला.. त्याच दिवशी तो माझा सखा झाला ... काही वर्ष मी ..घरगुती पदार्थ ...लाडू.चिवडा, चटण्या, लोणची, मसाले ..बनवुन विकणे उद्योग करत होते... तेव्हापासून... हाताला चटके बसताना... परिस्थितिचे फटके खाताना... पायांची फरफट होताना. .. सख्याशी गूज करताना... स्नेह वेली वाढवताना... विजयाचे हार  मिरवताना... पराजयाचे  हार स्वीकारताना... सुखस्वप्ने जागताना... मोती तट् तट् तुटताना... फुले वेचताना... आरोप झेलताना... गद्गगद्ताना...गहिवरताना.. सारे साहताना..खळख ळून हासताना... आतल्याआत आक्रंदताना... या कपाने मला हुरुप दिला... दिलासा दिला... मला चटका बसु नये म्हणून सदैव कान माझ्या हातात दिला ... अन् आज मम मनाला चटका लावून चुरा ... चुरा.. झाला. इतके वर्ष मूकं साथ देणारा ... आज मात्र खळ्कन् आवाज करत Good bye 🙋 म्हणाला... उन्नती गाडगीळ ...

चपराक...💐

🌺चपराक.. '" दोन सज्ञान व्यक्तींच्या विवाहात तिसऱ्याने नाक खुपसू नका ." अशी चपराक सर्वोच्च न्यायालयाने खाप पंचायतीला लावली.... अत्यंत खणखणीत .. चपराक... सुरळीत चाललेल्या कुटुंबात.. गरज नसताना.. एखादे जवळचे नातेवाईक .. कटकारस्थाने करून नाती उद्ध्वस्त करते.. घरोघरी अशी उदाहरणे असतात. *एक बहीण* ... सुसंस्कृत, सभ्य, अती हुशार, भोळी भाबडी.. भावाच्या घरात जाऊन.. आईवडीलांशी संगनमत करून भाऊ..भावजयीची हकालपट्टी केली.. घर उद्ध्वस्त केले. तेव्हा शांत.. त्रुप्त झाली... स्वतःच्या बहिणीच्या घरात ही काड्या टाकून.. खोटे आरोप करून तिला जीवनातून उठवले तेव्हा शांत.. शांत झाली.... अशी खूप खूप उदाहरणे आजुबाजुला सतत घडत असतात. .. भोचकपणा करणे, नाक खुपसणे, कान भरणे, कागाळ्या करणे.. नात्यात भिंती घालून.. गंमत बघत बसणे.. ही व्रुत्ती.. तनामनात ठासून भरलेली आहे.. ही *कोती व्रुत्ती* काढून टाकण्यासाठी.. कुटुंब संस्था सशक्त बनवण्यासाठी आता न्यायालयाचीच मदत घ्यावी लागणार का ???  न्यायालयाने.. खाप पंचायत ला दिलेला.. *नाक खुपसू नका *  हा इशारा सर्वांसाठी आहे. असे निदान सुशिक्षितांनी ज...

पुस्तके...

........ व्यथा  ...... सुबक वेष्टन ... सुंदर पुस्तके .... बंद काचेच्या कपाटात ... एका रांगेत । अनेक कथा ,कादंब-या .. सारे ... सारे ... वाचकांच्या प्रतिक्षेत !!! कुजबुजतात , डोळे पुसतात .... लेखकांचे आयुष्य संपले ... आपल्याला घडवताना .... काव्य संग्रह ... चडफडतात .. चुटपुटतात... कवि कफल्लक झाले ... शब्दात भाव गुंफताना ।     ऐतिहासिक ... ग्रंथ ... ज्ञान कोष ...शब्द कोष....     खचून जातात ... हळहळतात ... ग्रंथकारांचे डोळे खचले ... पाय पिचले... संदर्भ गोळा करताना , साकारताना ... स्वत्व हारवून बसतात !!!        आपण आहोत लोकांसाठी ,         अन् लोक इंटरनेट पाठी । कुणीच नाहीं वाली ,वार्धक्य अकाली ! बसल्या जागी ,पर्णे गळतात ... जीर्ण होतात ! .... ....  वाचकांच्या प्रतिक्षेत ......... आपण  नटून थटून बसणार ..... अन् एक दिवस संपून जाणार  !!! उन्नती गाडगीळ 🙏

स्मरण.... विस्मरण...💐

🌹स्मरण.. विस्मरण.. मोबाईल च्या मेमरीत ... 1) 7 वाजता येताना .. मुलाचे प्राँजेक्ट मटेरिअल आणणे. 2) 8 वाजता , **** ला बागेत भेटणे. 3) 9वाजता**** ला फोन करून खाराखेरी करणे. 4) 10 वाजता दही लावणे,मटकी भिजवणे.. वरीलप्रमाणे मेमरी गजर देत असते.. व तरुणाई पटापट कामे उरकते. वर वर ही सारी वाटते मजा.. पण सखोल विचार करता ती ठरते.. सजा!!! स्मरण .. हे यंत्र बनू नये. यंत्राला वाँरंटी..गँरंटी.. काही नसते ! Use & Throw.. स्मरण .. हे मेमरीत न टाकता.. मनाच्या एका कप्प्यात सुंदर आलेखन करून त्याची ... समरी... करणे जरुरी. Summary .. सार्थ सार ! मेंदूला सतत चालना दिली तर पेशी उत्तेजित होतील. स्मरण.. विचारांना धार येईल.. अन्यथा.. मेंदू गती मंद होऊन.. विस्मरण काळ सुरु होतो. स्मरण.. परावलंबन.. एक उदा. एकत्र कुटुंब.. एक सासुरवाशीण.. बुद्धीमान, तिचा पती.. सतत सांगतो.." ए, उद्या सकाळी 8 ला *** ला फोन करायची अठवण कर.. वगैरे. 2) तिचा दिर... " वहिनी, माझे सबमिशन 15 ता. ला आहे... आठवण कर. 3) सासु विचारते... " काय ग, मागील वर्षी आपण किती किलो भाजणी केली ?" 4) सासर...