स्मरण.... विस्मरण...💐

🌹स्मरण.. विस्मरण..
मोबाईल च्या मेमरीत ...
1) 7 वाजता येताना .. मुलाचे प्राँजेक्ट मटेरिअल आणणे.
2) 8 वाजता , **** ला बागेत भेटणे.
3) 9वाजता**** ला फोन करून खाराखेरी करणे.
4) 10 वाजता दही लावणे,मटकी भिजवणे..

वरीलप्रमाणे मेमरी गजर देत असते.. व तरुणाई पटापट कामे उरकते.

वर वर ही सारी वाटते मजा..
पण सखोल विचार करता ती ठरते.. सजा!!!
स्मरण .. हे यंत्र बनू नये.
यंत्राला वाँरंटी..गँरंटी.. काही नसते !
Use & Throw..

स्मरण .. हे मेमरीत न टाकता.. मनाच्या एका कप्प्यात सुंदर आलेखन करून त्याची ... समरी...
करणे जरुरी.
Summary .. सार्थ सार !
मेंदूला सतत चालना दिली तर पेशी उत्तेजित होतील.
स्मरण.. विचारांना धार येईल.. अन्यथा..
मेंदू गती मंद होऊन.. विस्मरण काळ सुरु होतो.

स्मरण.. परावलंबन..
एक उदा.
एकत्र कुटुंब.. एक सासुरवाशीण.. बुद्धीमान,
तिचा पती.. सतत सांगतो.." ए, उद्या सकाळी 8 ला *** ला फोन करायची अठवण कर.. वगैरे.
2) तिचा दिर...
" वहिनी, माझे सबमिशन 15 ता. ला आहे... आठवण कर.
3) सासु विचारते...
" काय ग, मागील वर्षी आपण किती किलो भाजणी केली ?"
4) सासरे तर रोजच ..
" माझी सून आठवणीने सकाळी 9 ला मला B.P. ची गोळी देते.

सर्वांच्या आठवणी सतत ह्रदयात जपता जपता..त्या स्त्री च्या स्वत:च्या आवडी निवडी विसरून ती विस्मरणाच्या गर्तेत बुडते.
आणि ..
कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या  स्मरण शक्तीचे परावलंबन झाले.

तरी.. स्व स्मरणशक्ती चे स्वावलंबन करणे...
' लक्षा ' सतत जागृत ठेवून त्यावर .. जप, चिंतन, मनन, करत ..मनातली जळमटे .. सतत काढून टाकून.. मन स्वच्छ करून... स्मरण स्वावलंबन संस्कार अंगीकारुन...
अकाली विस्मरणाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करुया.
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme