Posts

Showing posts from July, 2018

सोबत...💐

*** सोबत**** ♥धडधडत गाडी चालली आहे. लुकलुकते दिवे,मंद..मंद वारे.. समोरच्या बर्थवर केतकी निजलीआहे.. वेलीवरचे फूल शतदलांनी खुलते..तद्वत निद्रावस्थेत स्त्री जास्त खुलते..मोकळी होते. कण न् कण उमललेला..मन शांत, निर्धास्त.. मिटल्या पाकळ्यात मधुर स्वप्नं..रंजन.. विलग अधरात..गोड..कूजन! तृप्तीचे चांदणे चेहऱ्यावर  विलसत आहे.. श्वास.. शांत.. ओढणी किंचीत ढळलेली.. धपापते ऊर.. मनात हुरहूर.. वाऱ्याने बटा..गोबऱ्या गालांशी खेळत आहेत.. त्यामुळे केतकी वर्ण चमकत आहे.. निग्रही नासिका..लाल गुलाबी शेंडा..त्यात..चमचमता हीरा.. कानाच्या सुवर्ण पाळ्या.. त्यात गुंफलेल्या पांचू कळ्या.. दुमडलेला सुबक नितळ हात.. त्यातील.. चमचमते कंगन... नाजूक बोटातील लखलखते रींगण.. भाळा.. चंद्रकार.टिकली.. गळा.. काळ्या पोतीची..मंगल माळ.. अन्.. नाजूक पावलात चंदेरी साजूक चाळ !!! अशी ही केतकी.. माझी सहकारी .. आम्ही दोघे मिळून एका काँन्फरन्स साठी मद्रासला जात आहोत. कंपनी ने first class fare दिले आहे.. आणि अशी सुंदर सोबत दिली आहे !तिचा देह नाही, तर त्यातील बुद्धी सोबत दिली आहे... सवलत, सोय,बक्षीस, सोबत.. ही ...

जप..

🕉जप.. जपावर विश्वास आहे/नाही यावर चर्चा सुरू होती. माझा मात्र विश्वास आहे.अनेक वेळा अनुभूती पण आली .. एक प्रसंग..2006 नोव्हेंबर महिन्यात आम्ही तेव्हा मुंबईत होतो. आम्ही दोघे माझ्या वडिलांसह एका रात्री उशिरा एका पार्टीहून घरी आलो. रात्री 10-30 समय. मी आल्यावर कपडे बदलून.. वडिलांसाठी दूध गरम करायला ठेवले. एकीकडे.. बारीक सारीक कामे चालू होती.. माझ्या वडिलांनी मला हाक मारली. (मला जरा चालणे अवघड जाते) म्हणून मी सहज म्हणाले... ' नाना, चार वेळा नाही चालता येत. दूध गरम झाले की येते.. तुम्हाला दूध आणते आहे. तुम्हीच या.. टेबलवर ठेवते!" तरी.. त्यांच्या हाका चालूच... मी गँस बंद करून त्यांच्या बेडरूममध्ये गेले तर.. शर्ट अर्धवटच.. त्यांना पूर्ण काढता येत नव्हता .!!! हात वर जात नव्हता... मला कससचं झाले. मी शर्ट काढला.. बनियन काढला.ते घामाघूम झाले होते. अचानक.. हात वर जात नव्हता.. मी त्यांचा घाम पुसायला लागले.. तर..कमरेवर ,खांद्यावर.. पुरळाचा लाल पट्टा दिसला. नागीण? की कंपवात ? डॉ. ना फोन केला. त्यांनी सांगितलेले औषध.. फोनवरून मागवले.(मुंबई सम मोठ्या शहरात रा...

सासरचे पाहुणे..💐

#नस्ती-उठाठेव.. भाग..2 सासरचे पाहुणे मंडळी... 1979...फेब्रुवारी.. पुण्याहून माझ्या बरोबर प्रवासात..79वयाचे माझे सासरे,70वयाच्या सासुबाई, आजारी नणंद, माझी 4वर्षाची मुलगी व 2महिन्याची मुलगी .. प्रवास चालू.. बरोबरच्या कुणालाही टाँयलेट मधे जायचे असेल, तर प्रत्येक वेळी ,समोरच्या सह प्रवासीला.. बाळाकडे लक्ष द्यावे, सांगून.. या सर्वाबरोबर मलाच जावे लागे. कुणाला काही खायला देणे..पाणी देणे.. खाली उतरून काही..(पाणी..,वगैरे)आणणे,हे सर्व मलाच करावे लागले. पण.. माझ्या सासुबाई व सासरे वयोवृद्ध असले तरी जाणूनबुजून त्रास देणारे नव्हते.. उलट दोघांच्या मुखी विनोदाची गुटी होती. .. ती ख्रिश्चन बाई फर्डा इंग्रजी झाडत व मी इंग्रजी चा खुर्दा करत .. आमचे संभाषण चालू होते.. तिने विचारले.. What is your husband? मी उत्तरले.. My husband is working at Airport ! माझ्या चाणाक्ष सासुबाईं  च्या लक्षात आले..की त्यांच्या मुलाबद्दल आम्ही बोलत आहोत. त्या गालात खुदुखुदु हासत म्हणाल्या.. " बंड?बंड कुणाला म्हणता ग? अर्थात *दत्ता* माझा होताच बालपणी बंड !!! अन् सासरे पण मिष्कीलपणे म्हणाले.. ...

सेवेकरी..💐

👩‍🎤सेवेकरी... धगधगत्या चुलीपुढं थापते *ती* भाकरी.. शेकडो वारकऱ्यांची..क्षुधा पूर्ती करी। परातीचा ठेका..अन् लालबुंद चेहरा.. मुखी .. *हरिनाम* ..अन् घामाच्या धारा। फुंकणी जणू..कृष्णाची बासरी.. श्वासाश्वासात..वसे.. तिचा...श्री हरी। उन्नती गाडगीळ🌹🙏

घन ओला..सावळा..💐

घन ओला सावळा.. पिंजला कापूस काळा। झंकारे.. घुंगुर वाळा.. वेणू छेडी गोपाळा। लेऊनी पुष्पमाळा.. नाचती.. तरूबाला। तुळस घेऊनिया डोई.. चालती.. पालखीचे भोई। उन्नती गाडगीळ.🌹🙏

सेवेकरी...💐

👩‍🎤सेवेकरी... धगधगत्या चुलीपुढं थापते *ती* भाकरी.. शेकडो वारकऱ्यांची..क्षुधा पूर्ती करी। परातीचा ठेका..अन् लालबुंद चेहरा.. मुखी .. *हरिनाम* ..अन् घामाच्या धारा। फुंकणी जणू..कृष्णाची बासरी.. श्वासाश्वासात..वसे.. तिचा...श्री हरी। उन्नती गाडगीळ🌹🙏

#नसती उठाठेव.. बंडखोर..बंड्या..💐

#नसती उठाठेव..💐 *बंडखोर बंड्या* श्री. संतोषजी सराफ..एक हरहुन्नरी.. वल्ली आपल्याला माहित आहे का? ते एक प्रसन्न.. उद्यमशील व्यक्तीमत्व.. अन् आम्हाला.. पण स्वस्थ बसू देत नाहीत बरं.. काल रात्री बिनधास्त एक काम माझ्या माथी मारलं..अन् गुडनाइट करुन ते गेले सुद्धा ...मला व्यस्त ठेवून ते.. निर्धास्त!! ढाराढूर..पंढरपूर.. आता . पंढरपूर चा विठोबाच धावून येतो का बघावं..त्याने म्हणे.. जनीचे दळण दळले..मला पण..दळणच..पण जरा वेगळ्या पद्धतीचे दळायला.. येईल का हो .. तो मदतीला? हे.. विठूराया..मला..सराफ सरांनी सांगितले आहे लिहायला...मला मात्र ब्रम्हांड आठवतयं..काही काही सुचेचना.. सुचवशील एखादी कल्पना..? करते मी मनोभावे.. तव वंदना.। तू निराकार.. मी.. निरक्षर.. तूच देई बाबा.. मला.. अक्षरं.. छे... तो विनवणी ऐकेचिना...काही बोलेचिना.. तो..जगजेठी..आपला..कर कटी..उभा..विटी..! तेवढ्यात.. तो बघा.. दिसला.. आमचा.. बंड्या.. तो.. हो.. रिमझिम धारात.. जेथे..मातीचे..ढीग आहेत.. खड्डे खणून ठेवले आहेत.. तेथेच..रस्त्याचे काम चालू आहे म्हणून.. मोठे सिमेंट चे गोलाकार पाईप ठेवले आहेत.. त्या पाईपात लपून ब...