सोबत...💐

*** सोबत****

♥धडधडत गाडी चालली आहे. लुकलुकते दिवे,मंद..मंद वारे..
समोरच्या बर्थवर केतकी निजलीआहे..
वेलीवरचे फूल शतदलांनी खुलते..तद्वत निद्रावस्थेत स्त्री जास्त खुलते..मोकळी होते. कण न् कण उमललेला..मन शांत, निर्धास्त.. मिटल्या पाकळ्यात मधुर स्वप्नं..रंजन..
विलग अधरात..गोड..कूजन!
तृप्तीचे चांदणे चेहऱ्यावर  विलसत आहे..
श्वास.. शांत.. ओढणी किंचीत ढळलेली..
धपापते ऊर..
मनात हुरहूर..

वाऱ्याने बटा..गोबऱ्या गालांशी खेळत आहेत..
त्यामुळे केतकी वर्ण चमकत आहे..
निग्रही नासिका..लाल गुलाबी शेंडा..त्यात..चमचमता हीरा..

कानाच्या सुवर्ण पाळ्या..
त्यात गुंफलेल्या पांचू कळ्या..

दुमडलेला सुबक नितळ हात..
त्यातील.. चमचमते कंगन... नाजूक बोटातील लखलखते रींगण..
भाळा.. चंद्रकार.टिकली..
गळा.. काळ्या पोतीची..मंगल माळ..
अन्.. नाजूक पावलात चंदेरी साजूक चाळ !!!

अशी ही केतकी.. माझी सहकारी .. आम्ही दोघे मिळून एका काँन्फरन्स साठी मद्रासला जात आहोत. कंपनी ने first class fare दिले आहे.. आणि अशी सुंदर सोबत दिली आहे !तिचा देह नाही, तर त्यातील बुद्धी सोबत दिली आहे...

सवलत, सोय,बक्षीस, सोबत.. ही तुमच्या कर्तव्य निष्ठसेवेची पावती असते..
भ्रष्टतेची संमती नसते!
तिच्यातील बुद्धीचा वापर करुन कंपनीला समृद्ध करणे.. नावलौकीक प्राप्त करून देणे.. हे माझे काम!

तिच्या देहाचा वापर करुन दोन कुटुंबं उद्ध्वस्त करणे... ही भ्रष्टता..

आज ती स्व संसार.. मुले सोडून ,एका ध्येयाने प्रेरीत होऊन.. माझ्या बरोबर विश्वासाने आली आहे..
पतीचा.. मुलांचा निरोप घेताना.. किती हळवी झाली होती ती..
अश्रू अनावर झाले होते..

अन्
मी ..एक उच्च शिक्षीत.. विवाहीत.. दोन गोजिऱ्या पुत्रांचा पिता ,एका सुविद्य स्त्रीचा पती !मला पण माझ्या प्रियेची मीठी सोडवून घेताना.. कंठ दाटून आला होता..

तर.. क्षणिक मोहाच्या बळी न पडता ..विवेक वृत्तीने सहकार्य करणे,संयम ठेवणे.हीच सृष्टता ..नैतिकता होय!शुद्ध, पवित्र, समंजस, असे विश्वासक
मैत्र साधणे...
परिपक्व होणे..
मी..हळूच तिच्या अंगावर व माझ्या मोहावर पांघरूण घातले..

अन् उद्या सकाळी.. होणाऱ्या काँन्फरन्स बाबत तिने हुशारीने मांडलेल्या मुद्यांवर.. विचार करता..करता ... शांत झोपलो.
मी.. जिंकलो!!!💐💐
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme