Posts

Showing posts from November, 2018

कस्तुरी गंध..💐

👩‍🎤कस्तुरी गंध... माधव भाऊजींचे(ह्यांचे मित्र) चार मिस् काँल्स.. माझ्या फोनवर.. म्हणजे नक्कीच एखादा पदार्थ कसा करावा? किंवा.. थोडे विरजण पाठवा हो वहिनी... असे काही काम असणार असे मनाशी म्हणतच.. मी त्यांना फोन लावून.. "हं भाऊजी, नमस्कार!बोला..कसे आहात?" विचारताच ते म्हणाले... 'मी पोळ्या करतो आहे.10मिनटांनी करतो.एक काम आहे, सागतो नंतर!"... तीन वर्षांपूर्वी त्यांची पत्नी रमा त्यांना एकट्यांना सोडून गेली.. त्यांच्यातील एक अजब प्रेम रसायन.. उल्लेखनीय! पती पत्नी जन्मभर जोडीने गोडीगुलाबीने रहात असले तरी नियती शेवटी ताटातूट करतेच! हे तत्त्व ध्यानात घेऊन ,संवाद साधून... मनाची तयारी करून.. दोघांनीही एकमेकांची कामे शिकून घेतली. रमाने..उद्या माझ्या नंतर माझ्या जीवाभावाच्या रमेशचे काही अडू नये... हाल होऊ नयेत या उद्देशाने  पतीला पोळ्या, भाजी, शीरा,पोहे इ. उदरभरण पोषक पदार्थ बनवायला शिकवले. आणि रमेश भाऊजींनी सुद्धा रमेला.. Onlineरीक्षा मागवणे.बिले भरणे, गँस सिलिंडर बदलणे .. वगैरे कामे शिकवली... दोघांनी मिळून आपल्या नंतर जोडीदाराला अडचणी येऊ नयेत. हाल ...

गोड गोजिरी..💐

🍀 तुलसी विवाह ... गोड गोजिरी.. तुळस मंजिरी ... झालीया लग्नाची । नवरदेव हा... बाळकृष्ण राणा... काळजी हो कशाची ? गळ्यात घालुनी... फुलांच्या माळा... वस्त्रे नेसली कापसाची । अत्तर लावुनी.. गुलाब शिंपुनी. . नवरी शोभली कृष्णाची । ऊसाची पेरं... मुरमुरे अन् बोरं... देऊ हो हुंड्यावरी । चिंकी .. मिंकी... मिनी... पमी... या .. ग.. या.. सत्वरी । उन्नती गाडगीळ 🙏

भोचकपणा..💐

🌸भोचकपणा.. सध्या माझा नातू आला आहे म्हणून आम्ही खूप खूप आनंदात आहोत.  ...शांत  जीवनाला एक उमेदीची उत्साहाची किनार लाभते.. अलका ताईनी हतबल स्वरात सांगितले.. "अग उन्नती, माझी नातवंडे आली पाहुणी तेव्हा मी अश्शीच उत्साहाने .. हे कर .. ते कर.. धावून धावून केले. पण संस्कारी मन.. पण सतत computer, सतत फास्ट फूड, 11पर्यंत झोप, आळशीपणा.. या बाबतीत मी जरा ओरडत होते.४दिवस नातवंडे होती. त्यांनी फोन/मेसेजेस करुन आईला सांगितले... आजी ओरडते. त्रास होतो. वगैरे. मला खूप खूप वाईट वाटले.आणि माझ्या सुनेने पण मुलांना समजावणे सोडून मलाच उपदेश केला.. "आई, रागावू नका माझ्या मुलांना. ..मला चालणार नाही '" अग.. प्रत्यक्षात मी पाहिले आहे.. सून सतत मुलांवर ओरडत असते ग.. जाऊदे.. कानाला खडा. तेव्हा पासून मी बोलावत नाही.. पण काय ग उन्नती... तुला काय अनुभव.. ? मी म्हणाले.. "ताई , नातवंडे तर दुधावरची साय! पण माझ्या कडे माझ्या बहिणीची,नणंदांची,भाच्चाची,मैत्रीणींची मुले त्यांच्या आईवडिलांना सोडून बिनधास्त मजेत राहिली आहेत. मला कधीच असा अनुभव नाही,की मुलांनी तक्रारी केल्या व...