कस्तुरी गंध..💐
👩🎤कस्तुरी गंध...
माधव भाऊजींचे(ह्यांचे मित्र) चार मिस् काँल्स..
माझ्या फोनवर..
म्हणजे नक्कीच एखादा पदार्थ कसा करावा?
किंवा..
थोडे विरजण पाठवा हो वहिनी...
असे काही काम असणार असे मनाशी म्हणतच..
मी त्यांना फोन लावून..
"हं भाऊजी, नमस्कार!बोला..कसे आहात?"
विचारताच ते म्हणाले...
'मी पोळ्या करतो आहे.10मिनटांनी करतो.एक काम आहे, सागतो नंतर!"...
तीन वर्षांपूर्वी त्यांची पत्नी रमा त्यांना एकट्यांना सोडून गेली..
त्यांच्यातील एक अजब प्रेम रसायन.. उल्लेखनीय!
पती पत्नी जन्मभर जोडीने गोडीगुलाबीने रहात असले तरी नियती शेवटी ताटातूट करतेच!
हे तत्त्व ध्यानात घेऊन ,संवाद साधून... मनाची तयारी करून.. दोघांनीही एकमेकांची कामे शिकून घेतली.
रमाने..उद्या माझ्या नंतर माझ्या जीवाभावाच्या रमेशचे काही अडू नये... हाल होऊ नयेत या उद्देशाने पतीला पोळ्या, भाजी, शीरा,पोहे इ. उदरभरण पोषक पदार्थ बनवायला शिकवले.
आणि रमेश भाऊजींनी सुद्धा रमेला.. Onlineरीक्षा मागवणे.बिले भरणे, गँस सिलिंडर बदलणे .. वगैरे कामे शिकवली...
दोघांनी मिळून आपल्या नंतर जोडीदाराला अडचणी येऊ नयेत. हाल होऊ नयेत ही काळजी घेतली..
ही खरी प्रीती..कस्तुरी गंध!!!
कस्तुरी मातीत मिसळली तरीही सुगंध मागेच राहतो ना .. अगदी तश्शीच!!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment