Posts

Showing posts from December, 2018

नववर्ष..बाळ..💐

🙋 विश्वाच्या कुशीत विसावणारे ,प्रत्येक दिनाच्या अंकावर खेळणारे हे बाळ संख्या त्मक रुप धारण करते . !वसुंधरेच्या या बाळाची तारीख ठरलेली १ जाने ! व निर्वाणाची ३१ डिसें ! विजेच्या लखलखाटात , मद्याच्या धुंदीत ,वाद्याच्या तालात ,नाचत गात निरोप  व स्वागत उत्सफुर्त होते  . नव वर्ष नामक वैश्विक बाळ म्हणजे नुकतेच फुटलेले केळीचे पान! मऊ लुसलुशीत कोवळी पिवळी हिरवी सुरळी ! ही सुरनळी चराचराच्या अंगा खांद्यावर खेळत रहाते . भिंती कुडाच्या वा महालाच्या ! या बाल मुठीत मानवाचे भवितव्य दडलेले असते ! उन्नती गाडगीळ 🙏

Ginger Squash..💐

Ginger Squash.. खास खास थंडीसाठी.. कृती.. 1वाटी आल्याचा कीस(आले सोलून किसणे) पाऊण वाटी गूळ व पाव वाटी साखर, दोन वाट्या सायीसह दूध, बदाम(उकळत्या पाण्यात भिजवून, सोलून) पूड,आक्रोड क्रश,खजूर(3/4)गर,वेलचीपूड, केशर सर्व मिक्सर मधून काढणे. मायक्रो बाऊल मधे.ठेवून प्रथम तीन मिनिटे ठेवणे, नंतर बाहेर काढून परत जरूरीनुसार 2/3मिनिटे मायक्रोहिट देणे. किंवा सर्व. मिश्रण गँसवर ठेवून, सतत हालवत. रहावे.एकजीव झाले, थोडे आटले की खाली काढून गार झाले की बाटलीत/बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवणे. आठ दिवस टिकते. हा स्क्वँश पौष्टिक तर आहेच आणि अनेक पदार्थांची लज्जत वाढवतो. उदाहरणार्थ.. ***ग्लासात 2चमचे स्क्वँश घालून वर दुध /लस्सी घालून पिणे. **** व्हँनिला आईस्क्रीम वर हा स्क्वँश स्प्रेड करणे. **** थंडगार दही, फ्रुट सँलड,शिकरण यावर जरूर एखादा चमचा घालून बघा.. **** केक,ब्रेड, सँडविच टोस्ट.. वर एक हलकासा थर देऊन बघा.. **** लुसलुशीत पोळीवर चापून गुंडाळी करून एकदा खाऊन तर बघाच.. **** गुलाबी थंडीत उष्मांक वाढवणारा ..घरगुती..  हा पदार्थ करून, चाखून बघा आणि सांगा कसा वाटला? ( लंडनहून सानिका ने व...

Yes..I.can..💐

🌷Yes...I can.. ओहो.. काय मस्त वास येतोय.... मसाला .. मस्तच.. असे उद्गारतच विभा आत शिरली. "काकू, तुम्ही बिझी आहात ना, तेवढ्यात मी सटरफटर सामान घेऊन येते. मग मला जरा केकची पाककृती सांगा.. असे बोलून स्कुटीवरुन पळाली.. अर्ध्या तासाने परत आली. वैतागून.. "काकू, साध्या सुध्या गोष्टी इतक्या महाग करून ठेवल्यात न.. खरचं अवघड आहे.. मी हासून म्हणाले.. "अग,तुम्ही असे म्हणता..मग आम्ही काय म्हणावे ग? विभा.. बघू बरं काय काय आणलेस? अनेक .. आकर्षक पाकिटे... दाण्याचे कूट,चटण्या, मसाले, लोणची,जँम,पापड, मँगी,सर्वात कहर म्हणजे.. विविध सूप्स,ढोकळा.. अनेक. मी जरा चिडलेच.. "विभा..दाणे कूट,चटण्या,सूप्स, मसाले हे कसले ग विकत घेता? एक तर मसाले, लोणची,सूप्स मधे .. जे प्रिझर्व्हेटिव्हज् आणि काही घटक घातक असतात.आतड्यांना इजा करतात. आणि हे पदार्थ घरी करायला वेळ किती लागतो,सांग बरं.. अग.. आपल्या हातात अनेक यंत्रे आहेत. तंत्र जाणणे जरुरी. अगदी थोडे थोडे करावे.सतत .बाजारचे खाऊन ,हाँटेलिंग करुन.. पैसा जातोच आणि आरोग्य? तसेच.. वाण्याच्या दुकानात जाताना किती तो मेकअप.. किती ...

पहिलं वहिलं..💐

♥पहिलं वहिलं.. *आजि म्या..*(मी आजी जाहले..) 30एप्रिल2002या रात्री मी सुसज्ज हाँस्पिटलच्या सज्जात  बसले होते.. हात उलटसुलट धागे घालतहोते..मन अखंड विष्णू सहस्त्र नाम जपत होते.. आत रुममध्ये..माझी पहिली वहिली लेक प्रसव वेदनेने तळमळत होती.. गर्द निशेच्या आवरणातून चंदेरी चंद्रकोर हळूच डोकावत..खुदुखुदु हासत काळजीने काजळलेल्या,मम मनाला धीर देत होती ..टक् टक् बूट वाजवत ..एकेक दिवा मालवत सिस्टर म्हणाली.. "मावशी आता झोपा. आज रात्री काही तुमची लेक बाळंत होत नाही... चंद्र.. बिंब पण लपून बसले.. निराशेच्या आवर्तात मन घेरले..त्या मनाला गायत्री मंत्र आवर्तनात .. गुफले.. माझा मंत्रघोष चालूच होता..अचानक तांबड फुटलं.. पाखरं.. साखर स्वरात भूप आळवू लागले... मी परत एकदा सहस्त्र नाम सुरू केले.. आणि... " अभिनंदन!!! लेकीला मुलगा झाला!!!तुम्ही आजी झालात!!!'" शब्दांसह.. माझ्या ओंजळीत .... एक गुंडाळी ठेवली.. अहाहा... गुटगुटीत यष्टी, गुबगुबीत गाल,गोरी तुकतुकीत कांती, आखीव भुवया,राजीव नयन,रेखीव अधर.. आणि.. माझी मी न राहिले!.. नकळत अधर पुटपुटले.. *आजि म्या ब्रह्म पाहिले!...

मैत्र जीवाचे..💐

👩‍🎤मैत्र जीवाचे.. एका नामवंत मंदिरात *गीता जयंती* निमित्ताने भजन आयोजित केले होते. आणि भगवद्गीतेवर भाष्य करत निवेदन करण्याचे अवघड काम माझ्याकडे होते.. हे निवेदन आव्हानात्मक. म्हणून मी सार्थ लेखन करून शब्दांची लय,ताल ,डौल,,पोत संभाळत वाचन करण्याचा भरपूर सराव केला होता.. कार्यक्रम दुपारी 4ते6 होता. दुपारी दिड ला जेवण झाल्यावर मागचे आवरणे,साफसफाई करणे चालू असताच.. अरुण भाऊजीं(ह्यांचे मित्र)चा फोन... "वहिनी, आम्ही दोघे तुमच्या घरी साडेचारला येतो.. चहा ,गप्पा टप्पा करुन मग मुंबईला जाऊ!" अरे बापरे!!! निवेदन माझे आहे, म्हणजे मला जायलाच हवे. हे म्हणाले, "तू जा.. मी चहा बिस्किटे देउन त्यांना." पण..दोन.. तीन तास आधी सूचना दिलेल्या पाहुण्यांची फक्त चहावर बोळवण करणे पटेना.. आणि तसं जवळपास काही पटकन मिळत नाही. मी पटकन उपमा केला.मायक्रो बाऊल मधे काढून ठेवला. तीन पोळ्या भर्रकन मिक्सर मधून काढून, तूप गुळ ,भरपूर सुकामेवा, वेलचीपूड घालून सहा, सात,लाडू करून ठेवले. वामकुक्षी ला सुट्टी दिली. आणि चारला मला न्यायला कार आली. मी गेले. मनात समाधान होते. आमचा कार...

अजब अन् अद्भुत....💐

👩‍🎤अजब अन् अद्भुत.. मीनाक्षी वाळंद या महिलेला तिच्या आईने गर्भाशय दान केले व  मिनाक्षीवर गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले. आणि दसऱ्याच्या सुमुहुर्तावर बालिकेचा जन्म झाला... ही आशिया खंडातील पहिली ...गर्भाशय प्रत्यारोपण प्रक्रिया.. आणि ही ऐतिहासिक घटना घडली.. पुणे येथील गँलेक्सी केअर हाँस्पिटल मधे..या अभूतपूर्व यशाचे मानकरी.. डॉ. शैलेश. पुणतांबेकर !!! मातृत्व प्राप्ती साठी .. तळमळणाऱ्या लेकीला गर्भाशय दान करणारी आई  .. Great 💐 ट्रीटमेंट साठी सलग 17महिने हाँस्पिटलच्या एका खोलीत वास्तव्य करणारी तिची लेक.. त्याहून Great!!! ही मीनाक्षी कृष्ण भक्त!!! अविरत 17मास कृष्ण नामघोष करणारी.. आणि विज्ञान युगातील क्रांतिकारक प्रक्रियेला साथ देणारी ही माता.. तिने डाँ. चे चालू असलेले अथक प्रयत्न .. योगदान समजून घेऊन गर्भातच बालिकेला डॉ. होऊन.. वैद्यकीय सेवा करावी.कृतज्ञ व्हावे.. असा कानमंत्र दिला.. तिने निश्चय केला आहे.. माझी राधा.. डॉ. होणार.. तशीच मी तिला तयार करणार.. मला आठवण झाली.. करारी जिजाबाई.. शिवरायाची आई!!! शिवरायाचा पाळणा.. " इकडे तो अफझलखान..   तिकडे...

ठकास ठक...

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1112878925541084&id=10000456961197https://m.facebook.com/story.php?story_fbid=1112878925541084&id=100004569611973ठ3

लेखनाच्या प्रकाश वाटा..

*लेखनाच्या प्रकाश वाटा * माझा गुरू...नेमणूक केलेला शिक्षक नेमून दिलेल्या विषयाचे आकलन करतो.पण.. गुरूची नेमणूक न करता, विषय न निवडता  .. आपल्या अंतरातील ज्योती ला उजळतो,व स्वतः संदीपन ठरतो.. माझ्या जीवनात तीन व्यक्तीनी माझ्या इवल्या पदांना.. पाऊलवाट दिली. त्यांची मी शतशः ऋणी आहे.. 1) Rev.Fr. D.C.Kamat.. कँथलिक .. मी माझ्या लेकीला Jr.K.G. त प्रवेश घेण्यासाठी काँनव्हेंट स्कूल मधे गेले होते. फादरनी माझ्याशी तासभर गप्पा मारल्या. (सर्वानाच आश्चर्य वाटले.मी तेव्हा औ.बाद .. लोकमत मध्ये लेखन करत होते) दुसरे दिवशी सकाळी अचानक शाळेचा शिपाई माझे दारात हजर.. "गाडगीळ मँडम.. तुमची सर्टिफिकेटस् घेऊन फादरनी बोलावले आहे.!!! उडालेच मी!!! मी गेल्यावर भली मोठी प्रश्न पत्रिका दिली.. ती मी सोडवली.. एकदम Shake. Hand करून.. शिक्षीका म्हणून नेमणूक केली. महत्त्वाचे म्हणजे.. माझ्या लेखनाला सदैव खतपाणी घातले.. लायब्ररी ची चावी हातात देऊन.. खूप खूप वाचा.. इंग्रजी बाल कविता, बाल नाट्य.. लिहावे यासाठी विषय पुरवले.. एक समृद्ध जलजीवनपाट.. मिळाला.. त्या पाटात मनसोक्त डुंबून मी इंग्रजी,हिंदी.. वाचन...

देवघेव..💐

👩‍🎤देवघेव... मंगल तणतणत म्हणाली.. "ताई , कौतुकाने मी दिवाळीत मला साडी न घेता.. आमच्या बहिणाबाईला ..(तिच्या मुलाचे लग्न ठरले म्हणून) मोतियांची कर्णफुले भेट दिली. ..मनात आले की .पन्नाशी नंतर परप्रांती..परदेशी.. पर्यटन करताना जरा घालेल ती.कर्ण फुले.. काढेल छान छान फोटो. वगैरे... माझी बहिणीला खूप वर्षांपासून या झुबक्यांची आवड होती.. मनात आले आपण तिची इच्छा पूर्ण करू.. तिला डबी देताच,उघडून बघत.. तिने..जोरदार ताशेरे ओढले.. ''इश्य.. आता मी हे कधी घालून मिरवणार.. हे असले देतात का?वगैरे 10मिनिटे ताडताड लेक्चर.. माझ्या नातेवाईकांसमोर चालले होते!!! वरील प्रसंग सांगताना मंगला ला रडू आवरले नाही.. वरील प्रसंगावरून मला आईने अनेकदा सांगितलेला प्रसंग आठवला.. अशीच.. आईने तिला जमेल तशी.. एक साडी आणून तिच्या एका नातेवाईक स्त्री ला भेट दिली. तेव्हा त्या सुशिक्षित स्त्रीने संतापून मोलकरणीला दिली. व म्हणाली.. "तुमच्या समोरच मोलकरणीला देते.म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कोणत्या स्टँडर्ड ची साडी वापरते ते. आणि परत अशी साधीसुधी साडी तुम्ही मला देणार नाही!'''...