अजब अन् अद्भुत....💐

👩‍🎤अजब अन् अद्भुत..

मीनाक्षी वाळंद या महिलेला तिच्या आईने गर्भाशय दान केले व  मिनाक्षीवर गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले. आणि दसऱ्याच्या सुमुहुर्तावर बालिकेचा जन्म झाला...
ही आशिया खंडातील पहिली ...गर्भाशय प्रत्यारोपण प्रक्रिया..
आणि ही ऐतिहासिक घटना घडली.. पुणे येथील गँलेक्सी केअर हाँस्पिटल मधे..या अभूतपूर्व यशाचे मानकरी.. डॉ. शैलेश. पुणतांबेकर !!!

मातृत्व प्राप्ती साठी .. तळमळणाऱ्या लेकीला गर्भाशय दान करणारी आई  .. Great 💐

ट्रीटमेंट साठी सलग 17महिने हाँस्पिटलच्या एका खोलीत वास्तव्य करणारी तिची लेक.. त्याहून Great!!!

ही मीनाक्षी कृष्ण भक्त!!!
अविरत 17मास कृष्ण नामघोष करणारी..

आणि विज्ञान युगातील क्रांतिकारक प्रक्रियेला साथ देणारी ही माता..
तिने डाँ. चे चालू असलेले अथक प्रयत्न .. योगदान समजून घेऊन गर्भातच बालिकेला डॉ. होऊन.. वैद्यकीय सेवा करावी.कृतज्ञ व्हावे.. असा कानमंत्र दिला..
तिने निश्चय केला आहे..
माझी राधा.. डॉ. होणार..
तशीच मी तिला तयार करणार..

मला आठवण झाली..
करारी जिजाबाई.. शिवरायाची आई!!!

शिवरायाचा पाळणा..

" इकडे तो अफझलखान..
  तिकडे तो सिद्दी जवान।
 पलिकडे मुलुख मैदान..
हे आले रे.. तुजला बाळ धराया..
नीज .. रे.. नीज.. शिवराया।"
वगैरे (चू.भू.माफी)

असे थरारक शब्द त्या अंगाई गीतात गुंफत .. ती राजमाता.. बाळाला जाणीव करून देत आहे..

बाळा.. आत्ता शांत झोप. पण झोपेत सुद्धा अंतर्मनात.. जाणीवा.. जबाबदाऱ्या जागृत ठेव..
महत्त्वाचे कार्य करायचे आहे..

तशीच ही मीनाक्षी मला भासते..
आपल्या इवल्या बाळाला समाजाशी बांधीलकी ठेव..
असे सांगत आहे..

खरेच ..वैद्यकीय क्रांतिकारक.. डॉ.
गर्भाशय दान करणारी.. माता..
आणि 17महिने आधी अनंत यातना साहत.. उपचार घेत.. माता बनलेली.. पण कृष्णाला साकडे घालणारी..
समाजाचे पांग फेडण्याची बुद्धी लेकीला दे..विनवणारी...ही माता..
सर्वच.. अजब..अद्भुत आणि वंदनीय.. स्पृहणीय!!!

उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme