Posts

Showing posts from July, 2017

इवली कळी... अंगाई.. पिता म्हणतो...💐

( एक पुरुष .. कच-यातून उचलून एक बाळ दत्तक घेतो, त्या बालिकेस ... अंगाई ...) पवन छेडी सरगम .. मेघ गातो अंगाई .. नीज .. बाळे नीज ..आता .. मीच तुझी आई  । .... इवली कळी .. कच-यातुनी ...      अलगद् ... वेचली ।  आद्य देवाच्या साक्षीनेी ... काळजाची देठी केली ।। नीज बाळे .. नीज....... श्वासा श्वासाचा  धागा बांधुनी  ... विश्वासाचा ..  केला झुला .. काळजाला .. नांगरुनी ... जिव्हाळा  मी पेरला ।। नीज .. बाळे ... अंधाराचा गाभा सोलुनी ... आव्हाने मी पेलली  । वात्सल्याचे नाते जोडुनी ... संरक्षक भिंत बांधली ।। नीज .. बाळे .. नीज ... बाळे ... तुझे न् माझे नाते आहे  .. घट्ट .. घट्ट ... चालताना ... जन  .. दावतील ... बोट ... पण  , नात्याला .. साक्ष .. सूर्य .. चंद्राची ... मग .. भिती कश्याला ग .. जन सागराची ? नीज बाळे .. नीज आता ..मीच तुझी आई  !!! उन्नती गाडगीळ 🙏

प्राचीचा.. पदझंकार ...

प्राचीचा पदझंकार ... खुलवी रवि बाळाला । वा-याचा वेणु सुस्वर.... झुलवी पाना फुलाला । कुक्षी घेऊनी क्षणभर ... पक्षी उठवी चराचराला । उन्नती गाडगीळ 🙏

माई.. एक मेघ...

🌱माई.. एक मेघ.. अडीच महिन्याच्या लेकीसह.. मी एकटी.. पुणे.. मुंबई प्रवास रेल्वे ने व मुंबई.. अमदाबाद प्रवास विमानाने करून.. घरात शिरताच... कुकर लावला, कणीक भिजवून.. बाळाचं काही करत होते.. तोच.. माई आल्या.. माई.. वयोवृद्ध.. अनुभव सिद्ध.. सुंदर.. प्रेमळ पण.. तापट.. स्पष्ट वक्त्या..माझे दैवत.. माझ्या बाळाला उचलून घेत.. जोरात कडाडल्या... " उन्नती , आल्या पावली मागे फीर.. अग, तुझ्या धीटाईचे आम्ही सारे कौतुक करतो.. पण हा कसला धीटपणा ? आठव्या महिन्यात जन्मलेल्या नाजूक बाळाला.. घेऊन एकटी आलीस ? सभोवती दाट जंगल.. जनावरे मोकाट.. आपले स्वतंत्र बंगले.. नाही शेजार.. पाजार.. नवऱ्याची नाईट ड्युटी.. नाही कोणत्याही सोयी.. सुविधा.. किती लहान बाळं.. आत्ताच्या आत्ता परत जा..कुणाला सोबत घेऊन ये.. बरचं काही.. मला तर रडू च फुटलं.. लगेचच त्यांनी मला व बाळाला पोटाशी धरलं.. ते कायमचं !!! म्हणाल्या,"मी आहे ग.. येत जाईन रोज.. पण.. मी सुद्धा लांब ना ग.. त्यात तू तुझे शिक्षण सोडणार नाहीस.. म्हणत.. बाळाला  मालीश केले.. द्रुष्ट काढली.. जोजवले.. अन् गेल्या.. न चुकता रोज चक्कर मारतच राहिल...

ओढा...

⛷ओढा... खडबडीत खडकातून.. दलदलीत चिखलातून.. डोंगराला घालून वेढा.. धावतो हा खट्याळ ओढा ! अवखळ ओढा, ओढ लावे वेडा ।। झेपावत कड्यावरून.. ऊसळत दरीतून... रानाला घालून विळखा.. खळाळतो.. हा.. निसर्ग सखा !!! अवखळ ओढा, ओढ लावतो वेडा ।। चमचमत वाळुतून.. सळसळत पानातून... ओसंडत.. दुग्ध धारा.. करतो अजब इशारा !!! अवखळ हा ओढा, ओढ लावतो वेडा ।। उन्नती गाडगीळ 🌹🙏

उंच मनोऱ्याच्या पायाशी...💐

उंच मनो-याच्या पायाशी .. झोपडी माझी छोटीशी । हाताची करुन ऊशी ... कांता नीजे डाव्याकुशी । पोटाला चिकटे पाठ ... दैवाची अगाध गाठ । सूर्य आग ओकतो ... बाळ गालात हासतो । गटार गंगा वाहते ... पोर आनंदे नाचते । बाहेर अथांग सागर .. घरात नाहीं घागर । चूल झाली थंड .. तिने पुकारले बंड । उपाशी आहे पोर ... दाराशी मुके ढोर । आंसू गळून आटले .. वस्त्र पुरे फाटले । परी आहे एक आस ... पोर .. शिकेल खास । चार पुस्तके वाचेल ... झोपडी माझी तरेल । उन्नती गाडगीळ 🙏

सुईचे ऋण ..।

सुई चे ऋण ... मान ,मानवा तिच्या विना.. तू नागवा । टक्..टक्..टोचे मारत , टिप् टिप् टीपा गाळत ... सांधते ती दुवा । इवल्या छिद्रा ... घालत दोरा ... देते सांगावा ... समृद्ध करी धरा । उन्नती गाडगीळ 🙏सु

सळसळणाऱ्या.. पानात....

सळसळणा-या पानात ...वारा वाहे धुंद ग ... झुळझुळणा-या पाण्यात, नाव चाले मंद ग । वळवळणा-या बाल्यात , तारुण्याची वीज ग ... चळवळणा-या कृतीत ... क्रांति चे बीज ग । भळभळणा-या रक्तात , आंच ही तीव्र ग ... हळहळणा-या मनात ... दु:खाची सल ग । जळफळणा-या ह्रदयात , आसूयेचा वास ग ... कळवळणा-या प्रीतीत ... भावनेची ओल ग । गडगडणा-या मेघात , पावसाची नांदी ग ... फडपडणा-या ध्वजात ... स्वातंत्र्याची फांदी ग । उन्नती गाडगीळ 🙏

छोटू.....

👨‍🌾 छोटू... धरा स्वतः  अस्थिर असून तिच्या मुलांना स्थिर ठेवते. तद्वत आमचा छोटू... मीना सांगत होती... "मी इ.9वीत व भाऊ.. छोटू.. 7 वीत.. अचानक पित्रु छत्र हारपले.. गाडे खिळखिळे झाले.. घराचा कणाच निखळला.. आईने हिकमतीने काम मिळवले.. 8 दिवस आई कामाला जात होती.. एक दिवस छोटूने गाल फुगवत.. आईच्या कमरेला विळखा घालत.. विनवले.. ,"आई. तुम्ही दोघींनी कामाला जायचे नाही.. मी उद्यापासून.. काम व शाळा दोन्ही करणार !!! हट्ट च धरला.. बालमुखातून देवच बोलला.. अन् सुरु झाले जीवन चक्र !!! रोज पहाटे चारचा गजर.. अपार अंधार.. मनी घोर निर्धार.. चहा.. चपातीचा आधार.. पायताण जीर्ण.. पण पावले दमदार.. रातकिडे गुणगुणत.. देतहोते.. धीर!काजवे चमचमत.. दाखवत मार्ग.. .. वर्तमानपत्रांचे वर्गीकरण करणे.. जुळवणे.. गठ्ठे बांंधणे.. सारे करून इवल्या कोवळ्या खांद्यावर.. वर्तमान भार घेऊन भविष्याची स्वप्ने  रंगवत होता.. हर फिक्रको धुएँमे उडाता.. चला.. गया । गाणे गुणगुणत.. शीळ घालत.. जुल्फे हालवत.. हासत.. खेळत.. अनंत पायऱ्या.. चढत उतरत.. घराघरात वर्तमानपत्र टाकत चालत ..  फुलपँट मथे आला.. अभ्यास पण चालू होत...

निसर्ग सखा...(पाऊस विभाग)

👫काल सकाळी.. हवेत घुसमट.. मळभ .. अन् घरातही.. त्या दोघांच्यात.. अबोला.. आदळ आपट.. चिडचिड.. तणतण.. फणफण.. आज.. त्याच्या टाय ची नाँट.. तिच्या करांविना बांधली गेली.. आज.. तिच्या कंगनाची.. किणकिण... त्याला किटकिट भासली..त्याने दिलेला गजरा.. तिने नाकारला.. A..B..C..D..E..G0.. म्हणायला दोघेही तयार नव्हते.. दोन दिशांना दोघे मुकाट गेले... दुपारी.. त्याचा फोन तीने उचलला नाही.. तिचा.. msg.. त्याने reply..केला नाही.. संध्याकाळी.. ती घरी आली.. वीजेचा कडकडाट.. मेघांचा गडगडाट.. म्रुत्तिकेच्या धुंद गंथात.. धारा न्रुत्य.. झंकारले.. लाइट गेले.. ती.. काळजीने.. छत्री घेऊन गेटशी उभी। तो. .  गाडीतून उतरला.. तिच्याकडे झेपावला.. एक छत्री मिटवत म्हणाला, " एकाच छत्रात जायला.. एकच छत्री हवी.. हो ना?' ती थरथरती वेल व्रुक्षास बिलगली..खिशातला गजरा.. तिच्या केसात सजला.. धुंद गंध.. चढती रात्र.. भारलेले गात्र.. लपलेला चंद्र.. सुखद गारवा.. मिलन गोडवा.. तनामनास त्रुप्ती देणारा असा हा .. वळीव.. उमेद देणारा.. उन्मेष वाढवणारा.. निसर्गसखा !!! उन्नती गाडगीळ 🌹🙏

श्रश्रावण.. मनभावन..

....श्रावण.. मनभावन....💐 रश्मींना छेडत, सरींना शिंपत... ... येई.. रंग रसिया...। दिशांना रंगवत, रंगफुले उधळत... ... खेळे... खेळिया...। लडिवाळ वेलींचे, .. गर्द व्रुक्षा वेटोळे... अवखळ कलिकांचे.. सर्द सावळे हिंदोळे । हरित पर्णांची पुंगी.. नागोबाचा.. पिंगा.. इंद्रधनु छत्रीखाली..  बालगोपालांचा दंगा ।. चौखुर बागड... त्रुप्त हंबर.. पाचूच्या रानी ... लाली पसरत.. गाली .. हासे.. वासरमणी । पंख पसरुनी भिरभिरती.. सानुले पक्षी.. निल पटलावरी.. रेखती.. सुबक नक्षी । क्रुष्णमेघ मल्हार आळवी..                         गोप दही हंडी सजवी..। सागर लाटा गगन चुंवती.. श्री.फल.. दीप.. संग नाचती..। क्रुषीवलाची मधुर भल्लरी.. बैलपोळ्याची रंगत न्यारी । पंचतत्व खुलवी.. झुलवी त्रिभुवन.. श्रावण सखा.. मनभावन !!! उन्नती गाडगीळ 💐

लोकमान्य दीप..

लोकमान्य दीप...🙏 जनमनातील अज्ञान रुपी तम सारून ज्ञान दीप उजळावा.. या ध्येयाने टिळक.. आगरकर दोन वातींची एक तेजोमय ज्योत बनली.. अन् शाळा.. उभारली.. पुणे.. अ. ब. चौकाजवळ फडणवीस वाडा निश्चित झाला.. वाडा.. विशाल.. पण.. पडझ़ड झालेला.. दोन रात्री खपून.. टिळक व नामजोशींनी.. वाडा झाडला.. उखडलेल्या भूमातेला पंचगव्य लिंपण केले.. कौले शाकारली.. कड्या.. कोयंड्यात वंगण घातले. फळे लावले... तोरण बांधले.. दीप लावला.. शालामातेस साष्टांग दंडवत घालून.. देशातील सर्व मुलांना बुद्धी दे.. प्रार्थना केली. शाळेच्या दारात.. टिळक स्वतः पगडी घालून उभे.. पालकांना वंदन करून.. मुलांना चंदन लावून स्वागत करायला.. गणित.. क्लिष्ट .. पण हासत.. खेळत.. शिकवत. शाळेत.. अभ्यास.. व्यायाम.. खेळ.. संगीत.. चित्रकला अनिवार्य होते. ब्रिटिश विरोधात.. जनमत तयार व्हावे.. या हेतूने ..व्रुत्तपत्र काढले.. नाव काय द्यावे.. विचार चालू होता.. मराठा, झुंझार.. नावे सुचवली गेली.. पण.. नावानेच.. सरकार चळचळा कापेल असे नाव.. केसरी.. ठरले.. केसरी.. कचेरीत.. स्वच्छता.. छापखान्यात खीळे जुळवणे ते लेखन.. सारे लीलया सांभाळले . लेख...

GOOD GIRL...

🙎🏻Good girl.. बालवाडीत.. माझ्या येतेस का ग आई? सदा न् कदा तुला असते आँफीसची घाई । चाँकलेट.. बिस्कीट नको ग..दात किडतात भारी.. डब्यात दे.. पोळी.. भाजी.. आरोग्याला बरी ! रंगीबेरंगी स्कूल बस आली बघ दारात.. हासत.. नाचत गाऊ.. आम्ही सारे .. तालात । शाळा येताच पटापट उड्या आम्ही मारु.. गोड गोड हासत Good morning करु। सारे मिळून जोरदार म्हणू.. Prayer.. गोबऱ्या गोल गालात.. हसेल.. टेडी बेअर । ठोकळे.. चित्रे.. जुळवून शिकु.. अक्षर.. अंक.. सुबक सुंदर चित्रांमधे भरु नव रंग । संगीताच्या तालावर.. गाऊ गाणी नवी.. खुमासदार गोष्टी ची साथ हवीच हवी । गरगर फिरवु.. साइकल .. तीन चाकी.. आता सारे घरी जाऊ.. उद्या खेळू बाकी। साऱ्या गमती बघायला येशील का ग आई? GOOD GIRL तुला सुद्धा म्हणतील माझ्या बाई !!! उन्नती गाडगीळ🌹🙏

मी..एक..स्त्री..भ्रुण..

🙋 मी ... एक स्त्री ..भृण ...🌷 .... कालपर्यंत मी सुरक्षित होते मातेच्या उदरात ... वाढत होते मजेत ... लाडाकोडात । आज .. *मुलगी होणार * यंत्राने केले भाकीत ... माझे पिताश्री ... पितामह .. सारेच झाले क्रोधीत । गरजले " मुलगी ... छातीवर धोंडा ! कुठून आणु हुंडा ? त्या पेक्षा स्वी बीज  उखडून टाका ! तिला.. मारा .झोडा । उद्या माझी रवानगी होणार आहे .. स्वर्गात ... माझ्या सह अनेक बीजांकुर खुडले जातील गर्भात । स्त्री विना पृथ्वी कशी दिसेल भकास ? कल्पनेनेच मन झाले उदास उदास ! गा-हाणे मांडते मी  .. जन दरबारात ... जन हो ... जाणता ना तुम्ही कायदा .. मग , करा .. मजशी एक वायदा ! स्त्री भृण हत्या थांबवा ... लिंग चाचणीतून वाचवा ... एकच मागणे मागते ... जाता.. जाता .. आजच वाचवा ... उद्याची माता  !!! तुमची ... नकोशी ... मुग्ध कलिका !!! उन्नती गाडगीळ 🙏

निसर्ग...

🎍निसर्ग... सळसळ सळसळ पानांवर. नाचती मोती टपोरे । झुळझुळ झुळझुळ  वाऱ्यावर ... भिरभिरती फुलपाखरे । खुळखुळ.. खुळखुळ.. पाण्यावर.. हुंदडती लेकरे । रूणझुण.. रुणझुण .. किरणांवर.. किलबिलती.. पाखरे । उन्नती गाडगीळ🌹🙏

रानं...

🥗रानं... वळीव येता धावुनी... रानं.. आले वयात । भेगाळली माती सुखावली, घुंगरू बैलाच्या गळ्यात । रेशीम धारात धरा न्हाली.. रानं.. छान तरारतं। क्रुष्णमेघाच्या छत्रीखाली.. रानं मजेतं विसावतं । टरारुनं कणसं भरली.. रानं.. वाऱ्यावर डोलतं । अन् कापणी कुणी केली.. रानं.. मुसमुसत..मान टाकतं ।। उन्नती गाडगीळ🙏🌹रान

अग्गोबाई... राई...( धम्माल )

🕴🏼अग्गोबाई...राई.. सूपात धान्य घोळवणे.. नाचवणे..आसडणे..पाखडणे.. अन् फुंकरुन पाखड उडवणे.. अन् उडालेल्या पाचोळ्याचे नर्तन बघणे.. ही माझी आवड .. भूज वास्तव्यात पूर्ण झाली.. भूजला आम्ही एक वर्ष होतो. छोट्या गावात पूर्वी निवडलेले धान्य मिळत नसे. खडेरं..पाकड युक्त धान्य मिळे. असेच एकदा मी बागेत मोहरी पाखडत असताना.. शेजारचा चिटुकला मधु.. धावत आला.. आन्टी..आन्टी.. करत अन् मागून मला त्याने मिठी मारली.. मी दचकले.. सूप हेंदकाळले.. काळी गोल मोहरी.. लाल मातीत मिसळली .. मी .. अग्गोबाई.. म्हणून खूप खूप हासले.. त्याला जवळ घेऊन म्हणाले, " कोई.. बात नहीं बेटे, चलो हम राई बोएंगे।" मग खड्ड्यात राई पेरली.. त्याला अग्गोबाई.. म्हणजे राई वाटले.. रोज तो यायचा.. अग्गोबाई को पानी दिया ?विचारायचा.. त्याची अग्गोबाई.. राईला कोंब फुटले.. मधुची कळी खुलली.. कोवळी पाने फुटली.. पिवळ्या फुलांनी क्षेत्र बहरले.. मधु टाळ्या पिटू लागला.. मला ओढून नाचू लागला.. हीच भल्रर असावी..काही दिवसात हिरव्या गार नाजूक शेंगा बघून मधु अन् मी मोहरलो.. नंतर शेंगा सूर्य रंगाने रंगल्या.. सोनपिवळा शालू ल्यायल्या. एक शेंग मी...

फूल ...

🌹फूल.. सुंदर छोटे तळे, काठी.. गर्द तरू हिरवे... जळात.. वाकुनी पाहे, स्व.. रुप गोजिरे. .। मुग्ध होऊनी.. रूपावर.. डोलत होते.. तालात.. सळसळ.. पानांमधुनी.. हासत होते गालात । गालावरती.. लाली फुलली.. मुग्ध कळी रुपात... वाऱ्याने शीळ घालता.. फूल फुलले तोऱ्यात । उन्नती गाडगीळ🌹🙏

सायली... एक काव्य प्रकार...

सायली...एक काव्य प्रकार.. यात 5 ओळींचे कडवे... पहिली ओळ..एक शब्द. दुसरी ओळ.. दोन शब्द. तिसरी ओळ.. तीन शब्द. चौथी ओळ.. दोन शब्द. पाचवी ओळ.. एक शब्द. उदा. ... मन.. मूक जळतं.. कुणा न कळतं.. रान जळत.. हलकल्लोळ । उन्नती गाडगीळ 🌹🙏

...ळ..चा खेळ...

श्री. महेश पेंढारकरजींनी.. माझ्या एका कवितेवर कौतुक सुमने उधळली, ' यमक जुळवताना.. सतत आलेला .. ळ.. अन् शेवटी नावात आलेला ..ळ .. सुखद.. शब्द खेळ" वगैरे। अन् एकदा माझी  अमराठी सखी म्हणाली.. ळ..बहत मुष्किल है.. उसकी जगह.. ल.. चलेगा ना ? तर.. नाही.. हे माझे ठाम मत आहे.. चला.. मनाशी विचार करून बघा बर... ळ चे स्थान किती अढळ आहे ते... मराठी लावते.. लळा.. जिव्हाळा.! उगवते.. सकाळ.. उमलते कळी.. पानांची सळसळ.. आंतरीक कळकळ.. तळमळ.. त्यातून चळवळ.. वळवळ.. उमाळा.. भाळीचा चंदन टिळा.. फुललेला मळा.. गाता गळा.. धारदार विळा.. वर्ण सावळा.. घन नीळा.. सुगंधी वाळा.. काळा फळा.. गोजिरं बाळ.. पायी चाळं.. पाण्याचा नळ.. पाणी खळखळ.. पोटाच खळग भरण्यासाठी धावपळ.. रक्त भळभळ.. खुळं करणारी गालावरची खळी.. रमवणारा खेळ.. दुष्ट खेळी.. वेळी अवेळीचा पावसाळा.. त्रस्त करणारा उन्हाळा.. मस्त हिवाळा.. उंच अंतराळ.. खोल पाताळ.. सर्वत्र भरलेली पोकळी.. नारळी.. पोफळी.. केळी.. रंगिली होळी.. हातातील झोळी.. लाकडी मोळी.. तव्यावरची पोळी.. लिमलेट गोळी.. अनेक  शब्द आहेत.. ळ जागी ल ठेवून अर्थ बोध होणार नाही.. असा हा .. ळ...

सुवर्ण मध्य...

🐤काल समीर चा.. ,msg.. मँडम, खूपच भय वाटते. माझ्या मुलाचा इ. 10वी चा निकाल जवळ आलाय.. रागावलो.. संतापलो तर पोरगं जीवाच काही करेल हे भय! न रागवावं तर.. पैसा.. वय.. वेळ .. ??? मँडम, आम्हाला आमचा बाप गुरावानी मारायचा.. पन् त्याला भय नव्हते.. पीरगं जीव देईल वगैरे.. आता काय करावे, तुम्ही च सांगा... Msg.. पाहून मन सुन्न झालं !!! ,पुढची पीढी.. धरलं तर चावतयं अन् सोडलं तर पळतयं ! पाण्यासम पैसा जातोयं..अन् गुणं कितीही मिळवले तरी किंमत नाही हे ही खरं!!! यंत्रयुगात आपणही यंत्रच व्हावे.. मौन साधावे..स्वतःचे  हातपाय बांधून गप्प रहावे.. पाठीवरून हात फिरवत ..त्याचे मित्र व्हावे.. नाते घट्ट करावे.. वर्षे.. वेळ.. पैसा.. पेक्षा तू जास्त महत्त्वाचा.. म्हणून.. पंखात बळ। द्यावे.. इ. 12वी तरी झाले च पाहिजे समजवावे.. अनेक पर्याय समोर ठेवावे.. आपली आवड बाजूला ठेवून त्याला निवड करू द्यावी.. एक दिलाने.. खेळीमेळीने..सुसंवादाने.. परस्पर विश्वास बाळगावा.. विकास आपोआप होईल.. आपण मुलांना घाबरू नये.. अति धाक नसावा.. अन् अति मोकाटही सोडू नये.. सामंजस्य हवे.. उन्नती गाडगीळ 🙏🌹

द्रुष्टिकोन...

दृष्टिकोन .... माझे बालपण ' वाडा ' संस्कृति त गेले . पावसाळ्यात घरातील भिंतीना ओल यायची ! सर्वांच्या तक्रारी , भांडणे सुरु व्हायची ! पण माझ्या आईला त्या आकारात कधी ... दाढीधारी मुनी तप करतोय ! असे वाटे , तर कधी .. साक्षात कृष्ण मेघ भिंतीवर अवतरले असे वाटे ! २ ) घरातील तान्हुल्याने दुपटे ओले केले ... तर... ती सहज म्हणे ... चिखलातलं कमळ आहे ग माझे ते !" ३) संडास सार्वजनिक होता ! नंबर लाऊन उभे रहावे लागे . कुणी चिडचिड केली तर ती म्हणे ... '" रस्यातील चालती बोलती चित्रे न्याहाळता येतात , बरचं काही टिपता येते " खरच ... आईने रसिक कलात्मक दृष्टि तून ... एक स्वानंदी समाधानी सृष्टि निर्माण करता येते ... हे सहज सुंदर संस्कार केले . ... अशी दृष्टि कलाकारात हवी  ! नाहीं का ? उन्नती गाडगीळ 🙏

पाखरे बनुया...

पाखरे बिया , पराग कण वेचतात ... दूर दूर पेरतात . आपसुक अ्ंकुरते ... रोप बनते !!! माणसे ... आपल्याच मनीचे शब्द बीज, दुस-याच्या नावे , तिस-याच्या कानात पेरतात ! आरोप तयार करतात !!! या पावसाळ्यात ठरवुया ... पाखरे बनुया ... शुद्ध सुबीज पेरुया ... हासरी, नाचरी रोपे बनवुया !!! नात्यातील ... मना मनातील कलहाची आरोप बीजे छाटून टाकुया ! दुषीत आरोपाने कान न भरता , हरित रोपाने रान समृद्ध करुया !!! उन्नती गाडगीळ 🙏

प्रेम

Image
प्रेम ____________ ९ प्रीती चा खेळ असा रंगला । आज स्वर्ग धरेवर आला।।धृ ।। कवेत तुझ्या भान हारपले  , संवाद स्पर्श रुप जाहले ... अबोल नाते मनात खुलले ... खुलतो sss गार वारा sss आज स्वर्ग धरेवर आला।। झुकले अंबर, क्षितिज ही झुले ... शुभ्र चांदणे कटी लपेटले ... मन थरथरले , तन मोहरले ... वाहतो हा प्रीत झरा ... आज स्वर्ग धरेवर आला।। विश्वात तुझ्या , आश्वस्त झाले ... स्वप्न मनीचे सुगंध ल्याले ... सुखसागरात धुंद न्हाले ... हासतो सारा किनारा.. आज स्वर्ग धरेवर आला।। _____________________________________________ ८ कश्मीर कन्या... सुमित.. एक उच्च शिक्षीत अधिकारी.. कश्मीरी युवक.. लाल गोरा.. हासरा.. लाजरा बुजरा..आत्मकेंद्री.. दोन वर्षे आम्ही त्याला ओळखतो.. चार महिन्यांपूर्वी। लग्न झाले.. सपत्नीक आमचे घरी आला.. मी बघतच राहिले... साक्षात कश्मीर की कली!!! त्याला साजिरी.. गोड गोजिरी..लाजरी बुजरी.. सुंदरी !!! नाव विचारताच लाल नाजूक अधर पाकळीतून हळूच शब्द उमटले.. प्रभा !!! त्यांच्या लग्नाला 2-3महिने झाले.. तरी. . ती उदास.. अबोध.. कुणाश...
' स.न.वि.वि. ' या ग्रूप मध्ये सामील झाल्या पासून.. आजन्म विद्यार्थी रहावे । या उक्ती ची प्रचिती येते. नित्य नेमाने कसोटी घेतली जाते व आपोआप बुद्धी ला चालना मिळते. मन सदावर्त राहते.या मानसोपचाराबद्दल मी .. स. न. वि. वि. .. ची शतश: आभारी आहे. आजही असेच एका ताईने..अक्षरांंचे ठोकळे ( block s) माझ्या समोर ठेवले.. अन् मोत्यांची माळ बनवायला सांगितले.. मी अक्षरांना आंजारले.. गोंजारले.. पण.. अं..हं!!! अक्षरे निगरगट्ट !!! मग मी नाक उडवत.. वर्णांना खुणावले.. त्यांची अंगडी.. टोपडी बनवली.. ठसठशीत चार दागिने घातले.. विरामचिन्हांची पावडर.. तिट्टी लावली.. अन् गणरायांना विनवले...  लेखणी चाले तुरुतुरु.. वाणी बोले चुरूचुरू .. पण, अबोध सारे काही.. गणराया, तू शब्द दे अर्थवाही। वारा वाहे रुणुझुणु.. धारा, झरे रिमुझिमू.. फोल सारे काही.. गणराया, तू मेघ दे  जलवाही। उन्नती गाडगीळ 🌹 अशी झोकात सही करून .. श्रद्धाताईला पेपर दिला.. तर.. वा.. छान असे तोंडापुरते तरी म्हणावे ना.. पण नाsssहीच मुळी ! ती.. स्वत: विद्याधारिणी !!! त्यामुळे ती पटकन म्हणाली.. "अग, Eng.. अल्फाबेटस् चे कर ना...

निर्धार ...

अनवधानाने अनवाणीच गच्चीत गेले ... कपडे आणायला ! अवघी दोन मिनटे ! पण तळपाय चांगलेच पोळले ! आंसू ओघळले ! अन् आठवल्या ... विमलताई ! त्यांच्या मुलाला बारावीला ८० % गुण मिळाले ! फक्त! अपेक्षाभंग झालेल्या चोचीनी टोचून ,टोचून पाखरास विद्ध केले ! त्या इवल्या जीवाने घरात कोंडून घेऊन आत्महत्या केली ! अन् विमलताई तुटून गेल्या ! मुलगा आपल्यामुळे गेला , याने ती माऊली वेडी पिसी झाली! अन् जन्म भर चप्पल न वापरण्याची शिक्षा करुन घेतली ! भरदुपारी मुद्दाम त्या २ मैल लांब मंदिरात अनवाणी जात ! अगदी जन्मभर शिक्षा पाळली ! आपण शहाणे होऊया! नंतर शिक्षा न घेता , आजच मुलाच्या मागे खंबीरपणे उभे राहुया ! आधार देण्याचा निर्धार करुया ! उन्नती गाडगीळ 🙏

सोनोपंत दांडेकर...

वारक-यांच्या जंगम विद्यापीठाचे कुलगुरु ... सोनोपंत दांडेकर !!! जाती.. प्रजाति ला मुठमाती देऊन, बुद्धि ला श्रद्धेची जोड देऊन ... घराघरातून ...  वारकरी तयार केले ! ठिकठिकाणी किर्तने करुन ... मानवतेची पताका फडकवली ! ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा दोहोंचे संपादन करुन , मनामनात ज्ञानबीज पेरले ! अथक मातीत राबणा-या कृषिवलाच्या हातात टाळ , मुखात नाम देऊन मन रिझवले , साक्षर केले ... सुश्रृत केले  ! तुरुंगातील कैद्यान शिक्षण दिले ! दुष्टचक्राला भेदून इष्टचक्र निर्माण करणा-या या थोर विभूति ची आज पुण्यतिथि!!! आज  पावसाच्या सरीअन् वारकरी ... हासत ... नाचत... हरिनामाच्या जल्लोषात ... त्यांचा मार्ग अनुसरत आहेत... ज्ञान दिप तेवत आहे ... मनामनात !!! श्री हरि विठ्ठल ... जय हरि विठ्ठल  । उन्नती गाडगीळ 🙏

गुरू पौर्णिमा..

Image
आधुनिक गुरुपौर्णिमा.. वाढदिवस हा गुरु व्यासांचा.. सत्कार करुया सर्व गुरूंचा । प्रथम नमन माता माऊलीला.. बाळा.. जपणाऱ्या क्रुपा सावलीला। नमस्कार त्या रविराजाला.. आद्य गुरु तो पहिला वहिला । वंदन करु भू मातेला.. चराचराच्या निर्मितीला । जलाविना ना अर्थ जीवाला.. बचत करुन वाचवू जीवनाला । झाडे लावुन रोखू प्रदूषणाला.. खेळवत ठेऊ शुद्ध वायुला । निसर्ग गूरुची अजब लीला.. लीलया सुखवती सकला । स्मरण करून गुरुवर्मांचे.. रक्षण करुया भूमातेचे ।। प्राचीन गुरुकुल  श्री गुरू पौर्णिमा.. उपनिषदांवरून गुरुकुल पद्धती आली. एकेका ऋषींचे आश्रम एकेक विद्यापीठ होय !!! * धौम्य व शौनक ऋषींच्या आश्रमात .. शेतीशिक्षण. * वसिष्ठ व जमदग्नींच्या आश्रमात.. धर्म विद्या. * मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात.. धनुर्विद्या. *भारद्वाज ऋषींच्या आश्रमात.. यंत्र विद्या व विमान विद्यादान. * चरक, सुश्रुत ऋषींच्या आश्रमात.. औषध विद्या. * भरतमुनींच्या आश्रमात.. न्रुत्य.. गायन.. वादन विद्या. * गौतम ऋषींच्या आश्रमात.. स्रुष्टी नियम. *कणादऋषींच्या आश्रमात.. अणू..परमाणू.....

उष:काल...

Image
उष:काल... नील मखमली दुलईत ... उषेला लागली डुलकी । बाळ रवि ने रांगत .रांगत उघडली सोनेरी खिडकी । रश्मि ने नाचत नाचत ... घेतली धरेवर गिरकी । अनिलाने शीळ घालत .... कळ्यांची घेतली फिरकी । फुलांनी खुद्कन् हासत ... पहाटेवर मारली टिचकी । उन्नती गाडगीळ 🙏

आप्त...

Image
'आप्त ' ??? काल इ, 12वीचा निकाल लागला.. मुलाला फक्त 71%गुण मिळाले म्हणून पित्याने आत्महत्या केली.. पिताश्री ने जीवन थोडे तरी उपभोगले ..ते गेले.. जाताना मुलावर ठेपर ठेवून गेले.. मुलाचे.. तारुण्य उध्वस्त करून गेले.. मुलाला... मनो रुग्ण करून गेले..!!! असेच एका पिताश्रीनी.. स्वतःच्या मुलीवर खोटे आरोप केले..स्वतःचे पितळं उघडे पडू नये म्हणून.. मुलीला बदनाम केले.. ते जगातून निघून गेले.. पण.. मुलीचे भावविश्व उध्वस्त करुन.. तिला मनोरुग्ण करून !!! खरचं.. अति प्राचीन काळापासून हेच दिसते.. 'आप्त ' च बनवतात.. मनोरुग्ण... नैराश्य.. आत्महत्या.. मेंदूचे विकार.. स्किझोफ्रेनिया.. अल्झायमर.. मेंदू त.. रक्त गाठ/रक्त क्षय इ. विकारांचे प्रमाण वाढते आहे.. त्याच्या मुळाशी.. आप्तांच्या वाढत्या अपेक्षा.. वाढती लालसा.. अन् वयाबरोबर वाढणारा चंगळवाद!!! वाढत्या वयाबरोबर.. समजुतदारपणा.. समाधान.. तडजोड.. सुसंवाद.. हे कमी होते आहे.. त्यामुळे.. मनोरुग्ण वाढत आहेत.. आपण..  वय वाढताना .. जरा विचार करुया.. समाधानी व्रुत्ती ठेवून पुढील पीढी ची मने जपुया... उन्नती गाडगीळ 🌹🙏

हरिनामाचे टाळ....

Image
हरिनामाचे टाळ धरून.. रुणझुणती धारा। चिपळ्यांच्या तालातून.. मंद वाहे वारा। भावभक्ती रसातून.. चंद्रभागा सुस्वरा। विठ्ठल दर्शनातून.. आनंद चराचरा। पंढरीची वारी ज्याची त्याची  मंगल , " काकू, आज थोडेच काम करते अन् पळते " मी नवलाने , " का ग , काय विशेष  ? " मंगल भावूकतेने , " वारक-यांसाठी भाकरी कराया जायचय !" मी कौतुकाने " वा ! किती करणार? " मंगल सहजतेने " मी  १०० करते , पण ५० भाकरींचे पैसे घेत नाहीं , तेवढेच दान !" मी थक्क झाले. तशीच माझी एक सखी ... सुबक शिवण काम करते . ती रोज २-३ पिशव्या शिवते , वारक-याना एक एक वाटते या वर्षी १२०० पिशव्या तयार आहेत. हे श्रमदान बघून माझे डोळे पाणावले ! त्यांची कर्म शक्ति व भक्ति ... दान करण्याची दानत यास शतश: प्रणाम!!! पालखी.. प्रस्थान। घन ओला.. सावळा.. पिंजला.. कापूस काळा । झंकारे.. टाळ.. म्रुदुंग.. हरि भजनात .. दंग । तुळस घेऊनीया डोई.. चालले.. पालखीचे भोई ।     पालखी माऊलींची  🌹 तनुच्या चुल्ह्यावर .. त...

सुर्यास्त..

Image
सू र्य गेला अस्तास ... वाट झालीया धूसर ... डोळा काही दिसना ... साजण माझा येईना ।    जीव माझा कासावीस ...     मनी एकच ध्यास ...     वेळ सरता सरना ...     साजण माझा येईना  । सुस्त झाली धरा ... चंद्र एकला हासरा ... परि मोद मना वाटेना ... साजण माझा येईना  । उन्नती गाडगीळ 🙏

प्रीतीचा खेळ ..।

Image
उन्नती गाडगीळ 🙏

भक्ती गीत..

Image
एक.. भक्ती गीत.. देह मंदिरी, ह्रदय सिंहासनी हस्त जोडुनी, मस्तक लवुनी, साssद घालते तुला.. ये अंबे मज भेटायला..। ये अंबे... .. संस्काराचा शेला लेऊनी सद्गुणांची कास धरूनी.. दीsssप उजळला... ये,अंबे मज भेटायला। ये, अंबे... विकारांचे खंडन करुनी, विचारांचे मंथन करुनी, गंsssध दरवळला... ये , अंबे मज भेटायला। ये.. अंबे... धमनीचा धागा घेउनी.. स्पंदनांची फुले ओवुनी.. भक्ती रंsssग रंगला... ये अंबे मज भेटायला.. ये.. अंबे.. ... उन्नती गाडगीळ🌹🙏