माई.. एक मेघ...
🌱माई.. एक मेघ..
अडीच महिन्याच्या लेकीसह.. मी एकटी.. पुणे.. मुंबई प्रवास रेल्वे ने व मुंबई.. अमदाबाद प्रवास विमानाने करून.. घरात शिरताच...
कुकर लावला, कणीक भिजवून.. बाळाचं काही करत होते.. तोच..
माई आल्या.. माई.. वयोवृद्ध.. अनुभव सिद्ध.. सुंदर.. प्रेमळ पण.. तापट.. स्पष्ट वक्त्या..माझे दैवत..
माझ्या बाळाला उचलून घेत.. जोरात कडाडल्या...
" उन्नती , आल्या पावली मागे फीर.. अग, तुझ्या धीटाईचे आम्ही सारे कौतुक करतो.. पण हा कसला धीटपणा ?
आठव्या महिन्यात जन्मलेल्या नाजूक बाळाला.. घेऊन एकटी आलीस ? सभोवती दाट जंगल.. जनावरे मोकाट..
आपले स्वतंत्र बंगले.. नाही शेजार.. पाजार.. नवऱ्याची नाईट ड्युटी.. नाही कोणत्याही सोयी.. सुविधा..
किती लहान बाळं.. आत्ताच्या आत्ता परत जा..कुणाला सोबत घेऊन ये..
बरचं काही..
मला तर रडू च फुटलं.. लगेचच त्यांनी मला व बाळाला पोटाशी धरलं..
ते कायमचं !!!
म्हणाल्या,"मी आहे ग.. येत जाईन रोज.. पण.. मी सुद्धा लांब ना ग.. त्यात तू तुझे शिक्षण सोडणार नाहीस..
म्हणत.. बाळाला मालीश केले.. द्रुष्ट काढली.. जोजवले.. अन् गेल्या..
न चुकता रोज चक्कर मारतच राहिल्या.. तोंडाचा पट्टा चालू ठेवत.. जीव लावतच राहिल्या..
काय नव्हते.. त्यांच्यात...
प्रेम.. माया.. ममता.. जिव्हाळा.. ओरडा.. शिव्या.. ओव्या..
सारे.. सारे .. मारे.. होते त्या .. माई नामक .. मेघात !!!
अजुनही.. जोरदार मेघ बरसला.. की वाटते..
माई आल्या..
आता.. कशी त्यांची उन्नती.. सुखाच्या राशीत बसली आहे.. ते बघायला आल्या...
हे.. बरसणारे प्रेमळ मेघ..
अनंतात विलीन होतात.. पण.. अनंत काल स्मरणात राहतात..
चिंब.. चिंब.. भिजवून .. मनात ठाण मांडून बसतात एवढं खरं !!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment