Posts

Showing posts from March, 2018

Good bye ... प्लास्टिक💐

👭Good bye...प्लास्टिक... एखाद्याला डोक्यावर घेऊन नाचवायचं,अन् कालांतराने पायदळी तुडवायचं .. मग व्यक्ती असो वा वस्तू.. प्लास्टिकला असचं डोक्यावर घेतले.. त्यावाचून जीवन अशक्य वाटू लागले.. अन् ज्या माणसाने त्याला निर्माण केले.. त्याच्या डोक्यावरच प्लास्टिक ने मिरे वाटले..गळे घोटले..गाईगुरांचे प्राण घेलले.. प्रदूषण, कचरा इ.ने नैसर्गिक हानी केली.. अकांड तांडव विकोपाला गेल्यावर.. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर..* प्लास्टिक बंद *  आदेश मिळाला.. आता दूध, तेल,पाणी, वगैरे द्रव पदार्थ बहुतेक टेट्रा पँक मधून मिळतील. म्हणजेच भरमसाठ कागद वापर होईल.. *कागद* तरी किती पुरणार? जंगल संपत्ती नष्ट होत आहे.. मग परत ..येरे माझ्या मागल्या.. काचेच्या पारदर्शक.. स्वच्छ बाटल्या येतील.. जुने ते सोने.. जाहिराती होतील... परत..जपणूक.. सांडेल..फुटेल.. धाकधुक.!!! चक्र चालत राहणार!!! विचार पूर्वक नियोजन नाही.. कुटुंब नियोजन.. जलसंवर्धन.. वनसंवर्धन.. संस्कृती संवर्धन हे सारेच मानवी जीवन संपन्न होण्यासाठी जरुरी आहे.. पण.. विचार कोण करतयं? लक्षात कोण घेतयं? केवळ दुर्लक्ष, अविचार इ.मुळे प्लास्टिक ची...

श्री राम नामोच्चार..💐

💥श्री राम..नामोच्चार... 1984..श्रेष्ठींच्या आदेशानुसार मी .. बालचमुंसाठी एकांकिका लिहिली.. अन् दिग्दर्शनाचे गुंतागुंतीचे काम पण माझ्यच गळ्यात पडले.. आता न झिडकारता निभावायचे ठरवले.. मी त्या शाळेत नवीन होते. मुले अनोळखी होती.. पहिल्या वाचन फेरीत मुलांचे अशुद्ध उच्चार कानाला खटकले.एक मुलगा तर 10वर्षाचा असून *र* नीट म्हणू शकत नव्हता.. पण त्याला काढून टाकायचे नाही, हा आदेश.. खुप पेच निर्माण झाला.. मनात रामाचा धावा केला. दोन रात्री बसून *उच्चार शास्त्र* विषयी ची 6पुस्तके वाचून काढली.टिपणे काढली... काही मौखीक व्यायाम, श्वसन व्यायाम, पंचेंद्रियांच्या कसरती, आढळल्या. एक सोपा उपाय.. सकाळी आरश्यासमोर उभे राहून.. प्रथम जीभ आत गोलाकार फिरवून.. जबडा उच्चारासाठी तयार करणे.. अन् मग.. *बाराखड्या* तालासुरात म्हणणे.. वगैरे. लगेचच मुलांना प्रशिक्षण देण्यात आले. तरीही एक मुलगा *र* नीट म्हणत नव्हता... मी रामाला आळवले.. लक्षात आले.. र.. अनेक वेळा आहे.. रामनामात !!! मग.. प्रत्येक मुलाकडून खालचा रामरक्षेतील श्लोक 15..20 वेळा.. म्हणवून घेतला.पालकांना बोलावून जोरात सांगितले... घरी निदान 25व...

इच्छा शक्ती...💐

⭐इच्छा शक्ती.. मंगल अव्याहत बडबडत होती.. "किती उशीरा उठले मी ! हल्ली हे असचं होत! नवऱ्याला डबाच नाही दिला.. काय .. हे.. पाणी भरायचे राहीले.. नळ गेला.. आता बट्ट्याबोळ! सतत.. मनाच्या सहाणेवर ..नकारात्मक विचार कोळसा उगाळत राहीला.. त्यामुळे.. चूका वाढतच गेल्या... आमटीत मीठ विसरले. इडली चे  वाटण करणे राहीले.महत्त्वाचा e mail करणे ,बँकेत चेक भरणे ,सासुबाईना वेळेवर औषध देणे .. सर्वच कामांची घडी विस्कटली.. कारण.. नवऱ्याला डबा दिला नाही.. हेच मनाच्या डोहात डाचत राहिले. एखादे शल्य.. चूक.. झाली.. तर मनाला जोरदार ठणकावून सांगा.. " हो.. झाली खरं चूक !  जाऊदे.. आता संध्याकाळी मी त्यांच्या आवडीचे दोन पदार्थ जास्त करेन. पतीच्या आवडती सजावट करेन.. मी सुद्धा जास्त टवटवीत राहून त्याचे स्वागत करेन.." असा सकारात्मक विचार मनात आणून मनाला कार्यात.. छंदात..गुंफून घेतले तर  घर आनंदी होते. सतत स्वत:ला दोष देणे, न्यूनगंडाने पछाडणे,यामुळे मन दुबळे होते. आत्मविश्वास कमी होतो. अन् मग.. भवताल टपलेलचं आहे.. . टिमकी वाजवायला.. तरी.. या नववर्षा पासून .. मनाला कुरतडणे थांबवून.. आत्...

अनोखा उपक्रम...💐

🌱अनोखा उपक्रम.. नगर जिल्ह्यात डोंगराच्या कुशीत वसलेले  *सावरगाव तळ* एक चिमुकले पण मोठा आदर्श निर्माण करणारे गाव! तेथे.. गावात कुणाचेही निधन झाले तर अस्थी व रक्षा नदीत विसर्जित न करता..घरासमोरच खड्डा तयार करून, त्यात रक्षा व अस्थी विसर्जित करून त्यावर झाड लावतात. म्रुत व्यक्ती व्रुक्ष रुपात जिवंत स्मृती बनून सोबत राहते. यासाठी गावकरी मोठ्या मनाने साथ देतात. अस्थी विसर्जनामुळे नद्या प्रदूषण होत असे.. ते टळते!!! आपली जिव्हाळ्याची व्यक्ती झाड बनून आपल्या सोबत आहे, या भावनेने झाडाची जास्त मायेने काळजी घेतली जाते.. व्रुक्ष संवर्धन होते..जल संवर्धन होते. फळफळावळ सम्रुद्ध होते. मुख्य नवीन उपक्रमाला गावकऱ्यांची उत्स्फूर्त साथ मिळाली.. म्हणजेच जाणीवांची बाग फुलली!!!👏👏 उन्नती गाडगीळ🌹🙏

बाल गंधर्व रंग मंदिर..💐

♥बाल गंधर्व रंग मंदिर.. 26 जून1968 या दिनी जंगली महाराज पथावर संभाजी बागेजवळ, झाशीच्या राणीच्या पुतळ्याच्या साक्षीने एका भव्य.. दिव्य वास्तुचे उदघाटन झाले.. अन्..ती वास्तु.. समस्त पुणेकरांच्या मर्मबंधातली ठेव ठरली! वातानुकूलित नाट्यग्रुह! साजिरा रंगमंच.. 30'×44'×22' एवढा प्रशस्त! आसन क्षमता.. तळमजल्यावर..669       सज्जात... 320 शिवाय एक विशाल कलादालन..प्रदर्शनांसाठी! कलाकारांची कदर करणारी खास.. खास.. निवास व्यवस्था.. बालगंधर्व नावाला साजेसे .. वैभव! प्रत्येक कला..एक उत्सव! सतत चालतो तेथे *मराठी* कलाकृती चा होतो गौरव! ही वास्तू .. एक अनमोल ठेवा.. असे ठिकाण.. की ज्याचा कुणीही करावा.. हेवा! प्रत्येक पुणेकरांना घालते गारुड.. असेच आहे त्या.. मंदिराचे रूपडं ! गंमत म्हणजे.. ही एकमेव अशी वास्तु आहे.. की तेथे घामट,कळकट ,अवतारात कुणी जात नाही.. प्रेक्षक.. म्हणून शिरताना.. आपसूकच रोजच्या पंजाबी ड्रेस, जीन्स.. शर्ट ला कोपऱ्यात टाकून.. मनापासून वाटते.. टोपपदरी साडी नेसावी.. सुबक तिपेडी वळावी.. टपोरी..हासरी.. मोगर माळ माळावी.. इवली नथनी उडवावी.. बांगड्...

अर्धवट..💐

🙎🏻अर्धवट.. विठाबाई(भाजीवाली) तणतणत होती.. " ताई, ही आमची चमी.. तिला डोके कमी ! दोन वेळा नापास झाली 10वीला.. नुसती सायकल फिरवते.. पोरांसंग हुंदडते. तिला भाजी बी इकायची नाय! काय करावे समजत नाय!उफाड्याची पोर.. जीवाला घोर !"" मी म्हणले.. उद्या दुपारी दोन ला पाठवा. विचार करून सांगते.. चमेली आली.. उंच, टंच..आखीव.. रेखीव.. सारे भरभरून.. मग बुद्धी??? मी तिच्या हाती सुई धागा दिला.. क्षणार्धात ओवला.. म्हणजे नजर चांगली आहे! कागदावर घड्या घालून कापायला दिले.. कात्री धरणे.. सरळ ,सुबक कापणे ही कलेत पण ती वाकबगार दिसली. मग मी तिला कापड चौकोनी कापायला सांगितले.. " माझी पाठ दुखते,जरा तू चालव ना मशीन '" असे मी म्हणताच.. " मावशी, मला काही येत नाही. मी अर्धवट आहे. *ए..चमी.. डोकं कमी*.. असे सारे चिडवतात.! मी म्हणले.. " अग, साईकल ज्यांना येते त्यांना कोणतेही यंत्र चालवणे जमते" खूप आनंदाने मशीन फिरवू लागली.. दोन.. तीन दिवसात मशीन वर हात सरसर फिरू लागले... आनंदाने मन नाचू लागले. मी तिला सांगितले.. शिवणकाम शिक.. प्रमाणपत्र हातात घेतल्या ...

मैत्री...💐

💐 मैत्री ... काल ' कराची ' हून सखीचा फोन , " नमष्कार सह हास्याचा खळखळाट....शब्दा शब्दातून आदब...विचारपूस...नंतर म्हणाली, " बहनजी ,आपने सिखाया हुआ ....थालीपीठ .. हमने बनाया.. साथ साथ ..मस्का भी ! पूरा परिवार खूष !!! बहुत बहुत शुक्रिया!!! "वगैरे. फोन ठेवला...तिची प्रथम भेट....प्रसंग ... .. .. दोन वर्षा पूर्वी .. अमेरिकेतील लास्..एँजेलिस विमानतळावर ... जावयांना...नातवाला...bye 🙋 केले अन् थोपवलेले ..अश्रू.... सरसर ओघळू लागले ... समोर बसलेली ...ती... मज जवळ आली, पाठीवर हात ठेऊन , " शांत रहिये । आपका पोता क्या ?" विचारत् मनाची तार छेडली...सूर जुळले..ती... उंच, निटस, सावळी , चमचमते वस्त्र ..लखलखते अलंकार ... भडक मेकअप... खळखळते हास्य  .. मला वाटले बहुदा सिंधी असावी... पण तिने सांगितले की ती पाकिस्तानी आहे !!! दोन तास दोघींच्या गप्पा रंगल्या... खान- पान, पोषाख, फँशन , तरुणाई, रिती भाती , हवा..पाणी, मेहेंदी , अनेक विषयांवर... थालीपीठ..कसे करावे  सांगताच , तिने कागद दिला , तो कागद छोटा होता म्हणून मी माझ्या डायरीत ...हिन्दी तून सप्रमाण कृती लिहून कागद काप...

चिकाटी..💐

⭐चिकाटी.. मी सध्या  ह.अ.भावे लिखित *एडिसन चरित्र* वाचत आहे. प्रत्येक प्रयोगातील त्यांची चिकाटी, चिकीत्सा  बघून मन भारावून जाते. सतत 19 तास.. प्रयोग शाळेत काम करत असे... प्रत्येक प्रयोगावर त्यानं स्वतः चे पुस्तक तयार केले. त्यांच्या ग्रंथालयात फक्त शास्त्रीय विषयावर त्यांनी स्वतः ने लिहीलेल्या 60,000( साठ हजार)  पुस्तकांचा संग्रह आहे!!! ऐकूनच जीव दडपतो! स्वतःच्या पुस्तकांसह ..इंग्लीश, फ्रेंच, जर्मन भाषेतील अनेक प्रसिद्ध लेखकांची निरनिराळ्या विषयांवरील अनेक कादंबऱ्या,कथांचा स्वतंत्र विभाग च आहे !!! एकदा..* ड्यूमास* चे *काँट आँफ माँटेख्रिस्तो* हे पुस्तक वाचायला हे महाशय रात्री 8 वाजता बसले ते सकाळी 8 वाजता कादंबरी संपवून च उठले!!! यावर...हासत उत्तर दिले.. की बराच वेळ.. मनसोक्त मनोरंजन केल्याने .. दुसऱ्या दिवशी प्रयोग शाळेत.. किचकट प्रश्न चटचट सुटले !!! कामात बदल हीच विश्रांती!!! हे तत्व अंगिकारणारे एडिसन खरे आदर्श!!   प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा.. 60,000 पुस्तकांची निर्मिती करणाऱ्या एडिसन पुढे आपण किती थिटे पडतो याची जाणीव झाली. निर्मिती जाऊदे.. तर एका...

उठा..उठा..चिऊताई..💐

उठा ... उठा ... चिऊताई ... अंगावर उन्हें आल्यावर आभा दचकून् उठली ! ९'३० ! बापरे ! अभय अजुनही सुस्त! काल रात्रि २ पर्यंत चालली पार्टी! त्याच्या खुणा ... अॅश ट्रे थोटकाने भरलेला ! रिकामे चषक ! रिकामा आइस बाँक्स ! चुरगळलेले पेपर !! आरशात याहिले , डोळे सुजलेले ! हळू हळू चंगळवादाच्या गर्तेत अडकतो आहोत! दुकान व घर सासर्यांचे ! त्यावर नवरा फुशारक्या मारतो ! मी कुणाची नोकरी करत नाहीं! मला हे चालत नाहीं! आपलं बुवा असं ... नुसता खोटा डोलारा ! काल ताई म्हणाली " काय जरुरी अन्न मागवण्याची ? ४ तर जेवणारी ! आभा , जपून ग ! "खरय तिच ! अस उथळून कस चालेल ?  त्याच्या नादाने एक का होईना पेग घ्यायची सवय लागली आहे. रोज शाँपिंग ,पार्टी  , मस्ती ! असलेली नोकरी सुद्धा अभयने सोडायला लावली !दुकानाकडे तर तो बघतच नाहीं! नुसती गुर्मी । ताई सतत सांगते " आभा , कष्ट करा ! चैन कमी करा " पण अभय तिला नावे ठेवतो ! उलट सुलट विचारांचा पिंगा मनात चालू,इतक्यात बाहेर बालगोपालांचा दंगा कानावर येतो ! ५ वर्षीय राधा नाचत गाते ... " उठा ,उठा चिऊताई । झोपलेल्या अश्या तुम्ही, आणायाचे मग कुणी? ब...

Master mind. 💐

Master mind ! विमला ताईनी ,नातू ३ वर्षाचा होताच , आता दुसरा चान्स घ्या ! असा धोषा लावला ! त्यांची सून Master mind ! विचार ताजे ! तिने समजावले , " आई , आय अन् व्यय यांचा मेळ घालणे अवघड आहे !आणि स्वार्थ न बघता ,देशाला कुटुंब नियोजनाची गरज आहे याचा विचार मी करते ! तरी एक शैक्षणिक दत्तक मुलगी घ्यावी असे वाटते . " सूनेची समाजाभिमुख दृष्टि बघून त्या थक्कच झाल्या ! नकळत मागे वळून पाहिले ... ३५ वर्षापूर्वी दोन मुलगे झाल्या वर सासुबाई तिसरा चान्स घ्या ! मागे लागल्या होत्या ! तेव्हा आपण त्यांना बुरसट विचाराच्या ठरवले ! २ मुले असल्यानेच उच्च शिक्षण देऊशकलो . अन् अाज सासु पदी आपण पण प्रवाहाविरुद्थ जात आहोत! वयाबरोबर जाणीवांची वाढ होणे जरुरी! आज विमलाताई स्वत:चा नातू व शैक्षणिक दत्तक नात दोघांचे अभ्यास घेत आहेत  ! काळजी घेत आहेत  ! मजे मजेत ....  उन्नती गाडगीळ 🙏

Short cut. ..💐

🍀 Short cut.... राजेंद्र आजारामुळे १५दिवस शाळेत गेला नाहीं, मग..copy paste...foto...सुलभ तंत्र एक व्यसन बनले...सहज..सारी माहिती उपलब्ध झाली ...बटणे दाबून fast...smart..study!!! अन् गुणांची घसरण.... मग रडारड... त्याच्या आईची तक्रार... Teacher ने आशय बघावा ना ! व्याकरण काय बघायचे ? " सतत दोन वर्ष w.a. वर ...व्याकरणाने भाषा खुंटते...ही अकारण ओरड चालली आहे त्याचा परिणाम ...पालक व मुलांवर होतो ... पण नुसत्या अक्षराला अर्थ नसतो... ते व्याकरणात गुंफले तरच ' सार्थ ' शब्द माला साकारते ! copy paste...ने गुणवत्ता वाढत नाहीं ...त्यासाठी हवी रोजची ...चार तासाची..लेखन बैठक !!! व्याकरणात... अक्षर वळण ...शब्दावली ...अंतर ...वर्ण...विरामचिह्न ... सुसंगत, सुबक सुबद्ध रचना ..विषय मांडणी...सिद्धता.. इ. अनेक प्रकारे भाषा ...सादर करावी लागते ... नुसता आशय नाहीं, तर विषयात खोल डुंबावे लागते...तेच ..गणित ..शास्त्र सर्व विषयांचे... मर्म जाणून घेण्यासाठी कठोर कर्म करावेच लागते ! जसे...ताटभर मोठा..जाडा रोडगा करुन ठेऊन दहा जणांनी तोडून खा.. चालत नाहीं ... Short cut चालत नाहीं!!!! तद् वत समर्...