मैत्री...💐

💐 मैत्री ...
काल ' कराची ' हून सखीचा फोन , " नमष्कार सह हास्याचा खळखळाट....शब्दा शब्दातून आदब...विचारपूस...नंतर म्हणाली, " बहनजी ,आपने सिखाया हुआ ....थालीपीठ .. हमने बनाया.. साथ साथ ..मस्का भी ! पूरा परिवार खूष !!! बहुत बहुत शुक्रिया!!! "वगैरे.
फोन ठेवला...तिची प्रथम भेट....प्रसंग ...
.. .. दोन वर्षा पूर्वी .. अमेरिकेतील लास्..एँजेलिस विमानतळावर ... जावयांना...नातवाला...bye 🙋 केले अन् थोपवलेले ..अश्रू.... सरसर ओघळू लागले ... समोर बसलेली ...ती... मज जवळ आली, पाठीवर हात ठेऊन , " शांत रहिये । आपका पोता क्या ?" विचारत् मनाची तार छेडली...सूर जुळले..ती... उंच, निटस, सावळी , चमचमते वस्त्र ..लखलखते अलंकार ... भडक मेकअप... खळखळते हास्य  .. मला वाटले बहुदा सिंधी असावी... पण तिने सांगितले की ती पाकिस्तानी आहे !!!
दोन तास दोघींच्या गप्पा रंगल्या... खान- पान, पोषाख, फँशन , तरुणाई, रिती भाती , हवा..पाणी, मेहेंदी , अनेक विषयांवर...
थालीपीठ..कसे करावे  सांगताच , तिने कागद दिला , तो कागद छोटा होता म्हणून मी माझ्या डायरीत ...हिन्दी तून सप्रमाण कृती लिहून कागद कापून तिला दिला ... तो कागद ह्रदयाशी धरुन ती म्हणाली , " आपका हस्ताक्षर हम उपहार समझकर हम गहनों के बक्षेमे रखेंगे। जिंदगी भर संभालेंगे।"
जेव्हा जेव्हा ती थालीपीठ करते तेव्हा तेव्हा ती फोन करते...
खरच मैत्री बंधन... अनाकलनिय !!!
उन्नती गाडगीळ 🌷 🙏 💘

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme