Posts

Showing posts from September, 2018

मातृदर्शन..💐

🌸मात्रु दर्शन.. I.C.S.E. बोर्ड च्या इ.9 वीच्या मुलांना.. दहा वर्षांपूर्वी ..मी हिंदी शिकवत होते.. एक धडा.. गाडी ओढणारं एक वयस्कर कष्टकरी जोडपे असते.त्यांच्या गाडीत एक श्रीमंत गलेलठ्ठ शेट बसलेला.. खच्चून सामान भरलेले.. रणरणत्या उन्हातून, काट्याकुट्यातून... घामाने निथळत..अर्धपोटी राहून.. वाढते वय झुगारून.. गाडी ओढत राहते. पैसे वसूल करण्यासाठी तो शेठ..त्या जोडीला खूप खूप फिरवतो.निरर्थक.. अथक मेहनत करून घेतो. .. शेठचे क्रौर्य व वयोवृद्ध कष्टकरी जोडप्याचे शौर्य, नेकी,निष्ठा दिसते.. मी धडा शिकवत असता..एरवी टारगट पणा करणारी मुले सुद्धा अश्रू ढाळत होती... मागील आठवड्यात तसेच काही माझ्या कडून घडले.मम मनाला अत्यंत लाजीरवाणे वाटले.. विमानातून उतरल्यावर ..Exit Gate पर्यंत चालणे मला शक्य नसते.नाईलाजाने wheel chair वापरते. विमाना बाहेर उतरताच.. एक सुदृढ, सुंदर अमेरिकन स्त्री माझ्या जवळ आली... हासत.. "Hi.. Are u from India?Pl. come.." मी लगेचच त्या खुर्चीत बसले. क्षणार्धात ती व्हील चेअर ढकलू लागली. एकदम थांबून तिने विचारले.. "Do you know Thane?'" ...

व्यवस्था..💐

👩‍🎤व्यवस्था.. सध्या आम्ही अमेरिकेत, लेकीकडे आहे. लेकीच्या बंगल्याच्या शेजारच्या प्लाँटवर अलिशान वुडन हाऊस बांधकाम चालू आहे... सकाळी 8.30 ला सर्व मजूर कामावर येतात. एका मोठ्या van मधून येतात. सहा..साडेसहा फूट उंच, लालबुंद,तगडे,जीन्स.. जर्कीन्स ,बूट मोजे, रूबाबदार. ऐटीत गळ्यातील ट्रान्झिस्टर खाली ठेवून, Western music च्या संगतीने, तळपत्या उन्हात, रेशीम धारात.अथक ठोकाठोकी..जोडाजोडी चालू असते. दुपारी एक वाजता एक मोठी van या सर्व मजुरांसाठी गरम ताजे जेवण घेऊन येते.रोज ताजे गरम जेवण, त्यानंतर. आईस्क्रीम ची गाडी खास मजुरांसाठी येते. सर्व खर्च बहुतेक प्लाँटधारक करत असावा. हे मजूर .. कष्टकरी कर्मचारी.. त्यांच्या साठी वसाहती सुद्धा सुडौल, अद्ययावत सुविधा युक्त आहेत. त्यांच्या साठी विमा संरक्षण आहे... नकळत भारतातील बांधकाम स्थलावरील मजूर डोळ्यासमोर आले.. दूर प्रांतातील, तोडक्या,मोडक्या वस्तीत,काटक पण फाटके तुटके वस्त्रधारी,मळकट, कळकट,मळक्या फडक्यातील शिळी,कोरडी कांदा.. भाकर खाणारे,तिथलेच गढूळ पाणी पिणारे..पचकन् थुंकणारे,बीड्या फुंकणारे.. गाळुनी घाम..बांधती धाम। निजेला धोंडा...

न्याय???

👩‍🎤न्याय ??? न्याय आलयाला लागली आहे घरघर... विवाह बाह्य संमतीची..आँर्डर.. आँर्डर। मंगलसुत्रांचे सोनेरी फांस बनणार... नववधु वस्त्राची वल्कले लोंबणार। हिरवा चुडा कुरकुर करणार.. रूणझुण पैंजण मुसमुसत राहणार। एक पत्नी निष्ठा कचकन फुटणार.. नित्य नवे वसन..प्रतिष्ठा बनणार। गृहस्वामिनी .. मनी मेकींग मशीन बनणार.. सवती -दालनांची मोजदाद करणार। संस्कृती ची पाळेमुळे खिळखिळी होणार.. वासनांची पालवी नित्य सळसळणार। संस्कार सुमने कोमेजून गळणार.. मनोविकारांनी त्रिभुवन दुमदुमणार। नियती बिकट हास्य करणार.. अनाथालये दुथडी भरून वाहणार। पुन्हा .. जुने ते सोने विचार रूजणार.. विवाह बाह्य संबंध निंद्य ठरणार। एक ना एक दिवस नक्की येणार.. जीवन चक्र सुदर्शन बनणार। उन्नती गाडगीळ🌹🙏

पितृ पंधरवडा..💐

💥पित्रु पंधरवडा.. श्रद्धा म्हणजे मनापासून कृतज्ञता पूर्वक केलेले कर्म. आपल्या वाडवडिलांनी आपल्याला अंगाखांद्यावर खेळवले.. वाढवले..बाळलेण्यांनी सजवले,बाळकडू पाजले,कूशीत जोजवले,संस्कार मुशीत घडवले.. त्या सर्व गोष्टी मुळे आज समाजात मानाचे स्थान, प्रतिष्ठा प्राप्त झाली त्यामागे त्यांचीच पुण्याई,असते. त्यांच्या विषयी कृतज्ञता बाळगण्याचा हा पंधरवडा.. माझ्या जीवन जडणघडणीत माझ्या आजोबांचा मोठा वाटा आहे. प्रथम कृतज्ञता अक्षर पुष्प मी त्यांना अर्पण करते.. *पूर्वतयारी*.. मी इ.चौथी ची परीक्षा दिली व आम्ही भावंडे गुलबर्गा येथे आजी आजोबांकडे गेलो. सकाळी आजीने नेमून दिलेली कामे भराभर करणे.अन् मग दिवसभर हुंदडणे..हा दिनक्रम. एक दिवस भरदुपारी मी भावांसह चिंचेच्या झाडावर चढले होते.आजी भरपूर .. आरडाओरडे.. शिव्या.. वगैरे देऊन गेली होती. पण मांजरीचे दात..☺हासून परत मस्ती चालू. मग आजोबा आले..सावकाश पण ठाम शब्दात सुनावणी झाली.. "उन्नती, सावकाश उतर.आणि खोलीत ये.'" निमूटपणे खाली उतरले.आता.. खोलीत बोलावले म्हणजे भरपूर उपदेश.. मी खोलीत जाताच.. " बस !आता प्राथमिक शाळा ...

पक्व फल लाडू💐

मृणाल चा मेसेज.. मँडम.. गुळ,खोबरे व फळ युक्त प्रसाद करणार आहे. छान पदार्थ शिकवा. पाक,बर्फी वगैरे किचकट नको. अगदी सोपा पदार्थ द्यावा. मी खालील प्रमाणे पदार्थ दिला.. ~~पक्व फल लाडू ~ साहित्य--- 2वाट्या कणीक, 1वाटी बेसन,अर्धी वाटी नाचणी पीठ, अर्धी वाटी शेवया चुरून, अर्धी वाटी नारळ चव,1वाटी गूळ चुरून,1वाटी फळांचा गर(केळी कुसकरून) पिठीसाखर, तूप.1चिमूटभर दालचिनीपूड,2चमचे खारीक पूड. कृती~तुपावर कणिक, नाचणी पीठ, बेसन एकापाठोपाठ भाजून घ्यावे. शेवया मोडून भाजून घेणे.गरम कढईत नारळ चव,गूळ,फळांचा गर,घालून एक.. दोन चटके देणे. खाली उतरवून खारीक पूड, सह सर्व घालून हलवणे. कोमट झाल्यावर लागेल तसतसे पातळ तूप घालून बदाम कतरी,काजू,बेदाणा लावून लाडू वळणे. सूचना.. पीठीसाखर लागेल तशी अगदी थोडीच घालणे. लाडू..पेपरकप/द्रोण मधून द्यावेत. उ।न्नती गाडगीळ🌹🙏

निऱ्या...💐

👩‍🎤निऱ्या.. घूँ..घूँ...करत एक भुंगा खिडकीतून आत येऊन माझ्या.. गालावर, कपाळावर, कानात भणभणत,अवतीभवती भिरभिरत राहिला. मी पीठ मळत होते. एका हाताने त्याला हाकलत होते. पण भिती वाटत होती.. पीठात पडू नये... शेजारी सिंकजवळ बाई(कामवाली) उभ्या होत्या. खुदुखुदु हासत होत्या. मी हाकलताच तो अवखळ भुंगा बाईंच्या जवळ गेला.. छळू लागला.त्यांनी फटकारताच आढ्याला जाऊन बसला. बाईंनी लगेचच स्टूल आणले.स्टुलावर उभ्या राहिल्या... *साडीच्या निऱ्या वर उचलून कमरेला खोचल्या* .... त्याबरोबर मला *सूर नवा ,ध्यास नवा *  मधील सुत्रधार.. स्पृहा (हासरी,खेळकर, चोख भूमिका करणारी गुणी कलाकार) दिसू लागली... मला हसू आवरेना.. बाईंना काही कळेना .. मी का हासते ते! खरचं--- निऱ्या वर उचलून खोचणे हे.फक्त काम करतानाच , हीच आमची समजूत.. एरवी निऱ्या वर खोचून उभे रहाणे म्हणजे.. *अजागळ, अव्यवस्थित, बावळट, जरा वेडसर*...ही विशेषणे लागलीच माथी म्हणून समजायचं!☺ मला आठवते... आमच्या आजोबांचे धोतर निऱ्या करुन गोल फिरवून गाठ मारून मी ठेवायची.. तेव्हा आईचे बारीक लक्ष असायचे.. *निऱ्या एकसारख्या झाल्याच पाहिजेत. वरखाली न...

नक्की काय बंद करायला हवयं .💐

🌸नक्की  काय *बंद* करायला हवे? वीणाताई संतापाने लालबुंद झाल्या होत्या.. "अग, हा गधडा एका दिवसात महिन्याचा पाँकेटमनी उधळून आला. बंद म्हणून मोकाट सुटली कार्टी .. वगैरे!"" अगदी खरं आहे. पेट्रोल, डीझेल भाववाढ झाली, त्याला निषेध म्हणून.. वाहने जाळणे, काँलेजला सुट्टी म्हणून वाहने उडवणे,  हाँटेलिंग करणे,मद्यपान, धुम्रपान करणे,पार्ट्या झोडणे या सर्व गोष्टी उतू जातात. गणेशोत्सव नावावर तर .. लोकांना जेरीस आणून वर्गणी गोळा करून.. श्रद्धा, परंपरा, नावाखाली धांगडधिंगा.. घालणे. संख्यात्मक दर्जा हवा की गुणात्मक हा विचार करणे जरूरी आहे. नक्की काय बंद करायला हवे? *लहान वयात नशापाणी करून, आरोग्य गमावून बसणे हे बंद करणे आवश्यक. * पालकांच्या/ इतरेजनांच्या जीवावर चैन करणे,उत्सव साजरे करणे हे बंद करणे आवश्यक. * सतत बाहेरचे पदार्थ खाणे बंद करणे आवश्यक. * सतत वाहने चालवणे(अगदी नाक्यावर जायचे असेल तरी, मुले वाहनाला * किक् * मारतात. किंवा वस्तू मागवतात. हे सर्व बंद होणे आवश्यक. * काम, अभ्यास,या वेळात मोबाईल, टी.व्ही. f.b. ,w.a. वगैरे अनेक यंत्रे बंद ठेवणे आवश्यक. मुख्य म...

मन..💐

♥मन.. मनाच्याही अंतरातवेगळं विश्व असतं। स्पंदनांच्या निनादात रममाण असतं।। परिव्राजक होऊन संवाद साधत भटकते। पारिजातक बनून गंधाळत मौन साधते। कातरवेळी बावरं मन यमन छेडते। तर उष:काली पाखर मन भूप आळवते।। लाटा बनून उसळते,गगना गवसणी घालते। वाटा बनून, जगताला दीप दर्शवते।। प्रमाधनांविना सुंदर, चिरतरुण भासते। साधनांविना सहज पर्यटन करते।। नाही लागत परवाना वा तिकीट..। क्षणात जळी तर क्षणात अंतराळी उडते सुसाट।। संस्कारांच्या धारेने फोफावते, अभेद्य वृक्ष बनते। आरोपांच्या खीळ्यांने खिळखिळे होते, कोसळते।। त्या अंतर्मनालाही जोखायचं असतं,जपायचंअसतं। कुरवाळत, गोंजारत, सुदृढ बनवायचं असतं।। विकारांच्या जाळ्यात अडकवायचं नसतं। तर विवेकाच्या गोफात गुंफून उजळायचं असतं।। उन्नती गाडगीळ🌹🙏

एकवीस पत्री..💐

🌿एकवीस पत्री.. आषाढ.. श्रावण मनोमिलन... पत्री...पुष्प संमेलन। 1) तुळस मंजिरी गोजिरी..       प्राणवायू दायिनी। 2) श्वेत दुर्वा..हरित दुर्वा..     . चर्मरोगांना म्हणती..           दूर व्हा.। 3) कुंतल पोषक रस       माका..      त्याला कधी दूर सारू       नका। 4) बेल.. डावे पान ब्रह्माचे,       उजवे पान विष्णू चे..      पण.. त्रिदल    .    प्रथमेशाचे। 5) बोर..बदरी..ओकारी,    .   उमासे यावर..      *गोड बातमी,मळमळ        अंतरी..        सेवन करावी नटखट     ..   बदरी। 6)धोतरा..    . गुंगी आणतो हा      धोतरा..   .  जनहो.. तरा जपून       वापरा। 7) पिंपळ..      कावीळ, वाचा दोषांवर       गुणकारी..       सदैव सळसळ.जणू   ...

शिक्षक ...💐

जटिल.. कूट प्रश्नांची उकल, सखोल संशोधन करून.. ज्ञानाच्या.. मर्यादेच्या सर्व सीमा पार करून.. अंतर्मनाने.. प्रेरीत होऊन.. अतीव कष्टाने.. तनमनधन वेचून.. नि:स्प्रूह व्रुत्ती ने.. वेळ खर्च करून.. सडेतोड निर्भिडतेने.. समर्पक उत्तर देऊन.. त्या व्यक्ती ची क्षुधा.. प्यास शांतवतो.. अन् स्वतः समाधान पावतो.. तो खरा शिक्षक.. उन्नती गाडगीळ🌹🙏

स्त्रियांची दहीहंडी

👩‍🎤स्त्रियांची दहीहंडी... बारा वर्षांपासून स्त्री -दहीहंडी ही रुढी समाजात रूजत आहे. फोफावत आहे. अगदी हमरीतुमरीने,हम भी कुछ कम नही। असा आव आणत.. भर रस्त्यावर.. उंच..उंच. ..मनोऱ्यांवर तरुणी झपाझप चढतात... सहा..सात..आठ..दहा..बारा.. थरांवर थर रचले जातात.. श्वास रोखले जातात.. चढाओढ.. इर्षा.. शिट्ट्या.... खाली.. जमाव..आंबटशौकीन.. अचकट,विचकट शब्द तुषार.. पाण्याचे,रंगांचे फुगे.. फवारे... बिभत्स नर्तन.. आणि असभ्य वर्तन ! कळस म्हणजे.. कानठळ्या बसवणारे..D.J...या नेपथ्यावर.. तरुणी..सरसर चढते.. केवळ बक्षीसाच्या आशेने. व शक्ती प्रदर्शन !!! तीन वर्षापूर्वी... एक तरुणी.. वय केवळ24... टाळ्यांच्या.. शिट्ट्यांच्या तालावर बेभान होऊन ,एकेक थर चढली.. अन् अचानक खाली कोसळली. खाली दगड,धोंडे.. तिच्या नाजूक भागला गंभीर इजा झाली.अपंगत्व तर आलेच  अन् अपत्य होण्याची शक्यता गमावून बसली.!!! या लेखनाचा हेतू मुलींना मागे खेचणे हा नाही. पण... रस्त्यावर सुरक्षितता ती किती?खाली मँट/फोम/जाळे/मऊवाळू.. असे काही नसते. पाण्याचा सपकारा..फुग्यांचा जोरदार..मारा .. धूळ, सारेच.. असते. स्त्री.. शक्ती ...