नक्की काय बंद करायला हवयं .💐

🌸नक्की  काय *बंद* करायला हवे?

वीणाताई संतापाने लालबुंद झाल्या होत्या..

"अग, हा गधडा एका दिवसात महिन्याचा पाँकेटमनी उधळून आला. बंद म्हणून मोकाट सुटली कार्टी .. वगैरे!""

अगदी खरं आहे.
पेट्रोल, डीझेल भाववाढ झाली, त्याला निषेध म्हणून.. वाहने जाळणे, काँलेजला सुट्टी म्हणून वाहने उडवणे,  हाँटेलिंग करणे,मद्यपान, धुम्रपान करणे,पार्ट्या झोडणे या सर्व गोष्टी उतू जातात.

गणेशोत्सव नावावर तर ..
लोकांना जेरीस आणून वर्गणी गोळा करून.. श्रद्धा, परंपरा, नावाखाली धांगडधिंगा.. घालणे.

संख्यात्मक दर्जा हवा की गुणात्मक हा विचार करणे जरूरी आहे.

नक्की काय बंद करायला हवे?

*लहान वयात नशापाणी करून, आरोग्य गमावून बसणे हे बंद करणे आवश्यक.

* पालकांच्या/ इतरेजनांच्या जीवावर चैन करणे,उत्सव साजरे करणे हे बंद करणे आवश्यक.

* सतत बाहेरचे पदार्थ खाणे बंद करणे आवश्यक.

* सतत वाहने चालवणे(अगदी नाक्यावर जायचे असेल तरी, मुले वाहनाला * किक् * मारतात. किंवा वस्तू मागवतात. हे सर्व बंद होणे आवश्यक.

* काम, अभ्यास,या वेळात मोबाईल, टी.व्ही. f.b. ,w.a. वगैरे अनेक यंत्रे बंद ठेवणे आवश्यक.
मुख्य म्हणजे यंत्रसाधने वापरणे हे साध्य नसून..
*साधना करण्यासाठी फक्त यंत्राचा वापर करणे हे साध्य मानले तर जीवनाची जडणघडण सुबद्ध होते.

यंत्राचे गुलाम न बनणे .. काही काळ यंत्र बंद ठेवणे आवश्यक.

वरील काही *बंद* आपण मनापासून पाळले तर प्रदूषण नियंत्रण होईल. आरोग्य रक्षण होईल.आणि आवश्यक खर्च करून सुद्धा थोडीफार चैन करता येईल..

अनेक गोष्टींवर निर्बंध घालून, बंद केले ,तर आईला अपशब्द उच्चारण्याची वेळच येणार नाही. तिचे B.P.वाढणार नाही. व प्रत्येक सण आनंदाने साजरा होईल.
उन्नती गाडगीळ.🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme