निऱ्या...💐
👩🎤निऱ्या..
घूँ..घूँ...करत एक भुंगा खिडकीतून आत येऊन माझ्या.. गालावर, कपाळावर, कानात भणभणत,अवतीभवती भिरभिरत राहिला. मी पीठ मळत होते. एका हाताने त्याला हाकलत होते. पण भिती वाटत होती.. पीठात पडू नये...
शेजारी सिंकजवळ बाई(कामवाली) उभ्या होत्या. खुदुखुदु हासत होत्या. मी हाकलताच तो अवखळ भुंगा बाईंच्या जवळ गेला.. छळू लागला.त्यांनी फटकारताच आढ्याला जाऊन बसला.
बाईंनी लगेचच स्टूल आणले.स्टुलावर उभ्या राहिल्या...
*साडीच्या निऱ्या वर उचलून कमरेला खोचल्या* ....
त्याबरोबर मला *सूर नवा ,ध्यास नवा * मधील सुत्रधार.. स्पृहा (हासरी,खेळकर, चोख भूमिका करणारी गुणी कलाकार)
दिसू लागली...
मला हसू आवरेना..
बाईंना काही कळेना .. मी का हासते ते!
खरचं--- निऱ्या वर उचलून खोचणे हे.फक्त काम करतानाच , हीच आमची समजूत..
एरवी निऱ्या वर खोचून उभे रहाणे म्हणजे.. *अजागळ, अव्यवस्थित, बावळट, जरा वेडसर*...ही विशेषणे लागलीच माथी म्हणून समजायचं!☺
मला आठवते...
आमच्या आजोबांचे धोतर निऱ्या करुन गोल फिरवून गाठ मारून मी ठेवायची..
तेव्हा आईचे बारीक लक्ष असायचे..
*निऱ्या एकसारख्या झाल्याच पाहिजेत. वरखाली नकोत.गोल फिरवताना एकही निरी सुटली नाही पाहिजे. गाठ मारल्यावर त्याचा पिसारा सुबक दिसला पाहिजे* वगैरे...
निवेदक.. स्पृहा जोशी जेव्हा विस्कळीत वरखाली निऱ्या असलेले वस्त्र परिधान करते.. तेव्हा मला खूप खूप हांसू येते.
पूर्वी प्रभात स्नानानंतर स्त्रिया जे एक वस्त्र उभे लावून घेत..त्या वस्त्राच्या निऱ्या अशा अस्ताव्यस्त.. विस्कळीत असत.
ती आठवण येते खरी!
आणि जे आम्ही.. गबाळं.. बावळं.. अजागळ.. अस्ताव्यस्त म्हणून नावे ठेवायचो.. ती Modern Style रुपात.. झगमगत्या ..विशाल मंचावर येते तेव्हा.. हसू येते..
व..आता ..आई ,आजी ,सासुबाईं नाहीत.. ही.. कसली फँशन!म्हणून खळखळून हासायला.. हातावर टाळी द्यायला..ही उणीव भासते.
*कालाय तस्मै नम:।*
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment