व्यवस्था..💐

👩‍🎤व्यवस्था..

सध्या आम्ही अमेरिकेत, लेकीकडे आहे.

लेकीच्या बंगल्याच्या शेजारच्या प्लाँटवर अलिशान वुडन हाऊस बांधकाम चालू आहे...
सकाळी 8.30 ला सर्व मजूर कामावर येतात. एका मोठ्या van मधून येतात.

सहा..साडेसहा फूट उंच, लालबुंद,तगडे,जीन्स.. जर्कीन्स ,बूट मोजे, रूबाबदार.

ऐटीत गळ्यातील ट्रान्झिस्टर खाली ठेवून,
Western music च्या संगतीने, तळपत्या उन्हात, रेशीम धारात.अथक ठोकाठोकी..जोडाजोडी चालू असते.

दुपारी एक वाजता एक मोठी van या सर्व मजुरांसाठी गरम ताजे जेवण घेऊन येते.रोज ताजे गरम जेवण, त्यानंतर. आईस्क्रीम ची गाडी खास मजुरांसाठी येते.
सर्व खर्च बहुतेक प्लाँटधारक करत असावा. हे मजूर .. कष्टकरी कर्मचारी.. त्यांच्या साठी वसाहती सुद्धा सुडौल, अद्ययावत सुविधा युक्त आहेत. त्यांच्या साठी विमा संरक्षण आहे...

नकळत भारतातील बांधकाम स्थलावरील मजूर डोळ्यासमोर आले..

दूर प्रांतातील, तोडक्या,मोडक्या वस्तीत,काटक पण फाटके तुटके वस्त्रधारी,मळकट, कळकट,मळक्या फडक्यातील शिळी,कोरडी कांदा.. भाकर खाणारे,तिथलेच गढूळ पाणी पिणारे..पचकन् थुंकणारे,बीड्या फुंकणारे..

गाळुनी घाम..बांधती धाम।
निजेला धोंडा.. खायला कोंडा.. अशी अवस्था.
कोणतीच नाही त्यांच्या साठी व्यवस्था!

कायम दुरावस्था, दुर्लक्षित.
भटका..विटका..फाटका घटक!!!
1मे ला फक्त.. श्री फल व वस्त्र देऊन.. टाळ्यांचा कडकडाट...

एरवी मात्र.. खडखडाट!

विचार करून मन विषण्ण झाले खरे.

नकळत तुलना करु लागले. डोळे पाणावले.असो.
नसीब अपना.. अपना!!!

उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme