स्त्रियांची दहीहंडी

👩‍🎤स्त्रियांची दहीहंडी...

बारा वर्षांपासून स्त्री -दहीहंडी ही रुढी समाजात रूजत आहे. फोफावत आहे. अगदी हमरीतुमरीने,हम भी कुछ कम नही। असा आव आणत..

भर रस्त्यावर..
उंच..उंच. ..मनोऱ्यांवर तरुणी झपाझप चढतात...
सहा..सात..आठ..दहा..बारा..
थरांवर थर रचले जातात..
श्वास रोखले जातात..
चढाओढ.. इर्षा.. शिट्ट्या....
खाली.. जमाव..आंबटशौकीन.. अचकट,विचकट शब्द तुषार..
पाण्याचे,रंगांचे फुगे.. फवारे... बिभत्स नर्तन..
आणि असभ्य वर्तन !
कळस म्हणजे.. कानठळ्या बसवणारे..D.J...या नेपथ्यावर..
तरुणी..सरसर चढते..
केवळ बक्षीसाच्या आशेने. व शक्ती प्रदर्शन !!!

तीन वर्षापूर्वी... एक तरुणी.. वय केवळ24...
टाळ्यांच्या.. शिट्ट्यांच्या तालावर बेभान होऊन ,एकेक थर चढली.. अन् अचानक खाली कोसळली. खाली दगड,धोंडे.. तिच्या नाजूक भागला गंभीर इजा झाली.अपंगत्व तर आलेच  अन् अपत्य होण्याची शक्यता गमावून बसली.!!!

या लेखनाचा हेतू मुलींना मागे खेचणे हा नाही. पण... रस्त्यावर सुरक्षितता ती किती?खाली मँट/फोम/जाळे/मऊवाळू.. असे काही नसते.

पाण्याचा सपकारा..फुग्यांचा जोरदार..मारा ..
धूळ, सारेच.. असते.

स्त्री.. शक्ती प्रदर्शन.. असे दूषित स्थळी?
मुळात आपल्या धर्मात अनेक रीती..रुढी आहेत. रोजच्या जीवनाचे व्याप..ताप..साहताना.. त्या रुढी संभाळणे.. अवघड जाते, त्यात केवळ पुरूषांच्या बरोबरीने.. वागण्याच्या नादात नवीन रुढी का बरं निर्माण करायच्या?आणि त्या अश्या प्रकारे?

स्त्री शक्ती दाखवून देण्यासाठी कितीतरी क्षेत्रे आहेत. आधी सुरक्षा निर्माण करणे महत्त्वाचे.

आज गोकुळाष्टमी.. निमित्ताने.. आपण आपली शक्ती, युक्ती, बुद्धी, चातुर्य,धैर्य ,शौर्य.. समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा प्रयत्न करुया.

मनोभावे श्री कृष्णाला पुजन.. प्रत्येक स्त्रीत्व सुरक्षित रहावे. व त्यासाठी झटण्याची,लढण्याची मला शक्ती दे..प्रार्थना करुया.
जय श्री कृष्ण।

उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme