पितृ पंधरवडा..💐

💥पित्रु पंधरवडा..

श्रद्धा म्हणजे मनापासून कृतज्ञता पूर्वक केलेले कर्म.

आपल्या वाडवडिलांनी आपल्याला अंगाखांद्यावर खेळवले.. वाढवले..बाळलेण्यांनी सजवले,बाळकडू पाजले,कूशीत जोजवले,संस्कार मुशीत घडवले..

त्या सर्व गोष्टी मुळे आज समाजात मानाचे स्थान, प्रतिष्ठा प्राप्त झाली त्यामागे त्यांचीच पुण्याई,असते. त्यांच्या विषयी कृतज्ञता बाळगण्याचा हा पंधरवडा..

माझ्या जीवन जडणघडणीत माझ्या आजोबांचा मोठा वाटा आहे.
प्रथम कृतज्ञता अक्षर पुष्प मी त्यांना अर्पण करते..

*पूर्वतयारी*.. मी इ.चौथी ची परीक्षा दिली व आम्ही भावंडे गुलबर्गा येथे आजी आजोबांकडे गेलो.

सकाळी आजीने नेमून दिलेली कामे भराभर करणे.अन् मग दिवसभर हुंदडणे..हा दिनक्रम.

एक दिवस भरदुपारी मी भावांसह चिंचेच्या झाडावर चढले होते.आजी भरपूर .. आरडाओरडे.. शिव्या.. वगैरे देऊन गेली होती. पण मांजरीचे दात..☺हासून परत मस्ती चालू.

मग आजोबा आले..सावकाश पण ठाम शब्दात सुनावणी झाली..

"उन्नती, सावकाश उतर.आणि खोलीत ये.'"

निमूटपणे खाली उतरले.आता.. खोलीत बोलावले म्हणजे भरपूर उपदेश..

मी खोलीत जाताच..

" बस !आता प्राथमिक शाळा पार करणार.इ.5वीत जाणार, म्हणजे प्राथमिक वयातील हूड पणा बंद करून.. जरा जीवन विकास विचार करणे. भगवद्गीता नुसती पाठ आहे.. आता आचरणात आणणे..सतत सद्कर्म करणे...

आता इंग्रजी भाषा. नवीन विषय. तर ती शिकणे.प्रत्येक गोष्ट आधी आत्मसात करणे.. अव्वल स्थान निर्माण करणे.

मग काय.. रोज.. मोठी लिपी.. छोटी लिपी.. शब्द.. अर्थ.. काळ.. छोटीशी वाक्य रचना करणे.पर्यंत मजल गेली.

जून महिन्यात शाळा सुरू झाली, सर्व वर्ग A..B..C..
शिकत असताना, मी धडाधड धडे वाचत होते..

वाक्य प्रयोग करून दाखवले.. अर्थात अव्वल आले.

मग संस्कार मनावर ठसला.. प्रत्येक गोष्टींचीजय्यत पूर्वतयारी करायची..
त्यामुळे गडबड, गोंधळ, फजिती, नुकसान, होत नाही.

क्षेत्र कोणतेही असो. आपण आधीच सावध रहायचे. तन,मन,कान,नजर.. त्या कर्मासाठी तयार करायची.

हा संस्कार मनवर ठसला..
पुढील पीढीला पण दिला.

आज कै.आजोबा नाहीत, पण संस्कार रुपाने सतत अंतरात आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme