न्याय???
👩🎤न्याय ???
न्याय आलयाला लागली आहे घरघर...
विवाह बाह्य संमतीची..आँर्डर.. आँर्डर।
मंगलसुत्रांचे सोनेरी फांस बनणार...
नववधु वस्त्राची वल्कले लोंबणार।
हिरवा चुडा कुरकुर करणार..
रूणझुण पैंजण मुसमुसत राहणार।
एक पत्नी निष्ठा कचकन फुटणार..
नित्य नवे वसन..प्रतिष्ठा बनणार।
गृहस्वामिनी .. मनी मेकींग मशीन बनणार..
सवती -दालनांची मोजदाद करणार।
संस्कृती ची पाळेमुळे खिळखिळी होणार..
वासनांची पालवी नित्य सळसळणार।
संस्कार सुमने कोमेजून गळणार..
मनोविकारांनी त्रिभुवन दुमदुमणार।
नियती बिकट हास्य करणार..
अनाथालये दुथडी भरून वाहणार।
पुन्हा .. जुने ते सोने विचार रूजणार..
विवाह बाह्य संबंध निंद्य ठरणार।
एक ना एक दिवस नक्की येणार..
जीवन चक्र सुदर्शन बनणार।
उन्नती गाडगीळ🌹🙏
न्याय आलयाला लागली आहे घरघर...
विवाह बाह्य संमतीची..आँर्डर.. आँर्डर।
मंगलसुत्रांचे सोनेरी फांस बनणार...
नववधु वस्त्राची वल्कले लोंबणार।
हिरवा चुडा कुरकुर करणार..
रूणझुण पैंजण मुसमुसत राहणार।
एक पत्नी निष्ठा कचकन फुटणार..
नित्य नवे वसन..प्रतिष्ठा बनणार।
गृहस्वामिनी .. मनी मेकींग मशीन बनणार..
सवती -दालनांची मोजदाद करणार।
संस्कृती ची पाळेमुळे खिळखिळी होणार..
वासनांची पालवी नित्य सळसळणार।
संस्कार सुमने कोमेजून गळणार..
मनोविकारांनी त्रिभुवन दुमदुमणार।
नियती बिकट हास्य करणार..
अनाथालये दुथडी भरून वाहणार।
पुन्हा .. जुने ते सोने विचार रूजणार..
विवाह बाह्य संबंध निंद्य ठरणार।
एक ना एक दिवस नक्की येणार..
जीवन चक्र सुदर्शन बनणार।
उन्नती गाडगीळ🌹🙏
Comments
Post a Comment